-->
राजकारणात येणार का ?

राजकारणात येणार का ?

राजकारणात येणार का ?
प्रसाद केरकर, मुंबई Published on 11 Feb-2012 PRATIMA
सो निया गांधी यांचे जावई व प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका निवडणूक प्रचारसभेतील रॅलीत सहभागी झाले होते. प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट हे दोघेही राजकारणात आता लवकरच येणार अशा बातम्या चॅनल्सनी लगेचच देऊन टाकल्या. रॉबर्ट वढेरा यांची पत्रकारांशी झालेली चर्चा पाहिल्यास त्यांनी कुठेही राजकारणात येण्याची स्पष्टपणे वाच्यता केलेली नाही. थोडक्यात पत्रकारांनीच त्यांच्या तोंडी राजकारण प्रवेश वदवून घेतला असावा असेच दिसते.
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील राहणारे वढेरा कुटुंब हे गर्भर्शीमंत म्हणूनच ओळखले जाते. रॉबर्ट यांचा जन्म 18 एप्रिल 1969 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजिंदर वढेरा. त्यांची शेती तर होतीच, शिवाय त्याच्या जोडीला विविध उद्योगधंदे होते. स्कॉटलंडला जन्मलेली त्यांची बायको मेरून ही लग्नानंतर भारतात आली. रॉबर्ट यांना आणखी दोन भावंडे होती. एक भाऊ व एक बहीण. 18 फेब्रुवारी 1997 मध्ये रॉबर्टचे प्रियंका गांधींबरोबर लग्न झाल्यावर वढेरा कुटुंबीय सर्वात प्रथम प्रकाशझोतात आले. मात्र, या कुटुंबाने प्रकाशझोतात येण्याचे नेहमीच टाळले. त्यामुळे त्यांच्याविषयी कधीच विशेष माहिती कुणालाच उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या दहा वर्षांत वढेरा कुटुंबात दुर्दैवी घटनांची एक मोठी मालिकाच झाली आहे. रॉबर्ट यांचा भाऊ रिचर्ड वढेरा हा दिल्लीतील पॉश वस्ती म्हणून ओळखल्या जात असलेल्या वसंत विहार येथील एका घरात सप्टेंबर 2003 रोजी मृत आढळला. त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, तर रॉबर्टची बहीण मिशेल हिचा 2001 मध्ये मोटार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर रॉबर्टचे वडील राजिंदर वढेरा यांनी 2 एप्रिल 2009 रोजी आत्महत्या केली. वढेरा कुटुंबाचे इटलीच्या क्वात्रोची कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची चर्चा होती; परंतु यात कुणीच पुरावा देऊ शकलेले नसल्यामुळे यात काही तथ्य नाही. रॉबर्ट वढेरा यांचा मुख्य व्यवसाय हा दागिने व हस्तशिल्प निर्यात करणे हा आहे. एअरटेक्स ही त्यांची छोटी कंपनी वीस वर्षांपासून अस्तित्वात आहे. देशातील सर्वात मोठी रियल इस्टेट उद्योगातील कंपनी डीएलएफ लि., या कंपनीने त्यांच्या कंपनीला कज्रे दिली आहेत. या कर्जानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रॉबर्ट आणि त्यांची आई मेरून वढेरा यांच्या मालकीची स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी प्रा.लि. ही कंपनी असून दक्षिण दिल्लीतील साकेत या ठिकाणी असलेले हिल्टन गार्डन इन हे हॉटेल या कंपनीच्या मालकीचे आहे. डीएलएफ लि. या रियल इस्टेट कंपनीने स्काय लाइट या कंपनीलादेखील 2009 मध्ये 25 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याशिवाय रॉबर्ट यांच्या मालकीच्या ब्ल्यू ब्रिझ ट्रेडिंग प्रा.लि., नॉर्थ इंडिया आयटी पार्क्‍स प्रा.लि., रियल अर्थ इस्टेट्स प्रा.लि., स्काय लाइट रियॅल्टी प्रा.लि. या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांची एकूण उलाढाल किती असेल हे सांगणे कठीण आहे. गांधी घराण्याशी संबंध आल्यापासून गेल्या 15 वर्षांत वढेरा यांनी कधीही राजकारणात उतरण्याचे सूचित केलेले नाही. आजपर्यंत तरी त्यांनी आपल्या उद्योगधंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "राजकारणात येणार का ?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel