-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
राकेश मारिया इन् ऍक्शन... 
--------------------------
मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त राकेश मारिया हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले असले तरीही त्यंाना मुंबईच्या गुन्हेगारीची नस बरोबर ठाऊक आहे. गुन्ह्यांमागची नेमकी कारणे कोणती? गुन्हे होऊन नयेत यासाठी नेमके काय केले पाहिजे? यासाठी पोलिसांनी सर्वात पहिल्यांदा पावले टाकली पाहिजेत. गुन्हा झाल्यावर गुन्हेगारांचा छडा लावणे ही पुढची बाब झाली. मुंबई असो की, राज्यातील कुठल्याही भागातील पोलीस ठाणी, तेथे लोकांना पाय ठेवायला भीती वाटते. तेथे जाऊन आपली तक्रार मांडणे गे दुरचे झाले. पगरंतु आता मारिया यांनी काही सकारात्मक पालवे टाकण्याचे ठरविलेले दिसते. एखाद्या अत्याचारांची तक्रार नोंदवण्यासाठी पीडित महिला किंवा मुलीला आता पोलिस ठाण्यात धाव घेण्याची गरज नाही. १०३ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधताच जवळच्या पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारीच थेट अशा महिलेच्या घरी जाऊन त्यांची तक्रार नोंदवून घेणार असून महिला, किंवा लहान मुलांबाबतचे गुन्हे खपवून घेऊ नका, असे आदेशच नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पोलिस खात्यास दिले आहेत. महिलांच्या छेडछाडीला प्रतिबंध करण्यासाठी मोबाइल पेट्रोलिंग, त्यांच्या तक्रारींची तड लावण्यासाठी जलतगती तक्रार निवारण कक्षाची स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचारांप्रती असलेली पोलिस दलाची मानसिकताच बदलण्यासाठी विशेष ट्रेनिंग आणि व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांची सुरक्षा आणि त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी मारिया यांनी हे महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. अत्याचार झाल्यानंतर प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या महिलांना पोलिस ठाण्यात येऊन त्या अत्याचारांचा पाढा वाचावा लागणे हा तितकाच वाईट प्रकार असतो. त्यामुळे या महिलांनी १०३ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर फोन केल्यास पोलिसांकडून त्यांना सर्वोतोपरी मदत दिली जाईलच पण, तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनाच त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे, असे आदेश मारिया यांनी देऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. हरवललेली मुले आणि महिलांच्या तक्रारी हद्दीच्या वादात न पडता कोणत्याही पोलिस ठाण्यात नोंदवून घ्याव्यात, असेही आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितलेे. त्याचबरोबर महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात जलदगती तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. शाळा, कॉलेजांचा परिसर, रेल्वे स्टेशन्, मंदिरे आणि वर्दळीच्या रस्त्यांवर होणारे महिला छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे विशेष पथक आणि मोबाइल पेट्रोलिंग सुरु करण्यात येणार आहे. पोलिसांना प्रत्येक गुन्हे हे टाळता येणार नाहीत. परंतु गुन्हे टाळता कसे येतील याकडे पाहिल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. पोलिस हा जनतेला आपला मित्र वाटला पाहिजे. प्रत्येक पोलिसाच्या मानसिकेत त्यासाठी बदल करावयास हवा. ही बाब काही एका झटक्यात होणारी नाही. परंतु पोलिसांनी जनतेशी कशा प्रकारे संवाद साधावा, एखादा तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यास त्याला कशी वागणूक मिळावी यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आपण जनतेचे सेवक आहोत आणि लोकांच्या मदतीला आपण धावले पाहिजे, ही भावना पोलीसांनी रुजविली पाहिजे. सध्या ज्या प्रकारे साधी तक्रार घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला झगडावे लागते ते पाहता पोलिसांना आपल्यातील माणूस जागा करावा लागणार आहे. अन्यथा पोलिसांनी अत्याधुनिक होऊन तक्रारी इंटरनेटव्दारे करण्याची सोय करावी. मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या मारियांना मुंबईची सर्व माहिती चांगलीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मारिया आता इन् ऍक्शन आहेत... त्यांचा उत्साह टिकावा व मुंबईत काही चांगले घडावे हीच इच्छा.
------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel