डॉक्टरांची अनास्था
संपादकीय पान गुरुवार दि. 05 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
डॉक्टरांची अनास्था
राज्यातील सार्वजनिक वैद्यकीय सेवेची पुरता बोजवारा उडालेला असताना विविध ग्रामीण भागांत असलेल्या जवळपास 581 डॉक्टर्सनी सरकारी वैद्यकीय सेवा सोडल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली आहे. राज्यातले उच्चशिक्षित शेकडो डॉक्टर्स सरकारी सेवेत काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक सेवा आणि त्यावर सरकारचा असलेला अंकुश याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर कोणतेही कारण न देता सेवा सोडून जाणे, आपल्या पदाचा राजीनामा न देणे आणि सरकारची परवानगी न घेता वैयक्तिक व्यवसाय करणे अशा वैद्यकीय अधिकार्यांना सरकारने फरार घोषित केले आहे. या फरार वैद्यकीय अधिकार्यांपैकी आतापर्यंत 104 जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच या डॉक्टर्सवर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे करण्यात आली होती. सेवेत रुजू असताना कोणताही पत्रव्यवहार न करता सेवा सोडून गेल्यानंतर अशा अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी आवश्यक असते. या विभागाच्या परवानगीनंतर या वैद्यकीय अधिकार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येते. त्यानुसार अद्याप 477 अधिकार्यांवर कारवाई होणे बाकी आहे. सेवा सोडून गेल्यानंतर अशा रिक्त जागांवर सरकारकडून त्वरित कायमस्वरूपी पद भरणे शक्य नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात पदे भरली जातात. त्यामुळे सेवेवर तितकासा परिणाम होत नाही. सरकारने आपल्याकडे चांगले उच्चशिक्षित डॉक्टर का येत नाहीत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एक तर डॉक्टरांना त्यांच्या शिक्षणाच्या तुलनेत सरकारने चांगला पगार देण्यास सुरुवात केली पाहिजे. तसेच त्याचबरोबर त्यांची शासकीय सेवा वगळता अन्य वेळात त्यांना खासगी प्रॅक्टीस करण्याची परवानगी दिली पाहिजे. ग्रामीण भागात त्यांची पोस्टींंग करताना त्यांना निवास व्यवस्था, वाहन सोय या पुरविल्यास सरकारी नोकरीकडे आकृष्ट होऊ शकतील. आज अशी अवस्ता आहे की शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व सुख सोयी आहेत मात्र डॉक्टर नाहीत. चांगल्या इमारती बांधल्या आहेत, मात्र ते चालवायला डॉक्टर नाहीत. डॉक्टारंना सक्ती करुन ते काही शासकीय सेवात येत नाहीत, त्यामुळे सरकारला वेगवेगळे उपाय योजावे लागतील. हे उपाय डॉक्टरांच्या गरजा ओळखून योजणे गरजेचे आहे. यातूनच सरकारी नोकरीची डॉक्टरांना वाटत असलेली अनास्था दूर होऊ शकते.
-------------------------------------------------------------

0 Response to "डॉक्टरांची अनास्था"
टिप्पणी पोस्ट करा