शिवसेनेची सत्तेसाठी घुसमट
संपादकीय पान गुरुवार दि. 05 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शिवसेनेची सत्तेसाठी घुसमट
शिवसेनेला सध्या बाहेरुन आपण विरोधात आहोत असे दाखवायचे आहे मात्र त्याचबरोबर सत्ताही उपभोगायची आहे. सत्तेत मोठा भाऊ असलेल्या भाजपाने शिवसेनेचा हा डाव बरोबर ओळखला आहे. त्याचबरोबर भाजपाची मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकाविण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही, त्यामुळे शिवसेनेचे सर्व पातळ्यांवर खच्चीकरण करण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. मात्र शिवसेना आपला प्रत्येक वेळी होणारा अपमान मूग गिळून सत्तेचे गाजर खाता येत असल्यामुळे थंड आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री बदलताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत संतप्त शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले. विशेषत: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडून काढून घेतल्याने त्यांनी अधिक आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवडयात काही पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये आदलाबदल केली. तर काही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या जोडीला सहाय्यक पालकमंत्रीही ठेवले. हा फेरबदल करीत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेषत: महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. मात्र त्यांच्याकडून ते काढून घेण्यात आले असून तेथे भाजपाच्या राज्यमंत्री मदन येरावार यांची नियुक्ती केली आहे. संजय राठोड यांच्याकडे तेथे केवळ सहपालकमंत्री म्हणून ठेवले. संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले असून तेथे मदन येरावार यांना सहपालकमंत्री पद दिले आहे. त्यामुळे संजय राठोड कमालीचे संतापले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे. पालकमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे, त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण असते. तसेच आगामी काळात जिल्हा परिषदांच्या निवडणुका येऊ गातल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री ज्या पक्षाचा असतो त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत ही होत असते. यवतमातळ जिल्ह्यातील राजकारणावर संजय राठोड यांनी चांगली पकड घेतली होती. संजय राठोड हे आक्रमक आहेत. ते भाजपाच्या दबावाला जुमानत नाहीत. यापूर्वीही त्यांनी राज्यमंत्री म्हणून आपल्याला कामच करू दिले जात नाही, अशी जाहीर तक्रारच केली होती. यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून दूर केल्यानंतर संतप्त झालेल्या राठोड यांनी थेट मातोश्रीवर धाव घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढून पाठविले होते. राठोड यांच्या प्रमाणेच दिवाकर रावते यांच्याकडून नांदेड जिल्हा काढून घेऊन त्यांच्याकडे उस्मानाबादचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे, त्यामुळे ते नाराज झाले आहेत. तसेच दीपक सावंत यांच्याकडून उस्मानाबाद जिल्हा काढून घेतल्याने त्यांचीही नाराजी आहेच. शिवसेनेतला आक्रमकपणा मात्र म्यान झाला आहे, हे नक्की. निदान भाजपाच्या आक्रमक शैलीला तोंड घ्यायला तरी ते कमी पडत आहेत.

0 Response to "शिवसेनेची सत्तेसाठी घुसमट"
टिप्पणी पोस्ट करा