-->
संपादकीय पान बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
निवडणुकांचे पडघम
---------------------------
लोकसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून गेल्या वेळच्या २६ व २२ याच जागावाटपाचे सूत्र यावेळी कायम राहाणार आहे. राष्ट्रवादी आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी गेले काही महिने उड्या मारीत होती. परंतु कॉँग्रेसने आपला दबाब वाढवत नेत गेल्या वेळच्या जागांवर समाधान मानण्यास त्यांना भाग पाडले आहे. आता कदाचित काही मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यात रायगडची सध्या असलेली कॉँग्रेसच्या वाट्याची जागा राष्ट्रवादीला जाईल अशी चर्चा आहे. अर्थात ही जागा कोणाच्याही वाट्याला गेली तरी येथून कॉँग्रेस वा राष्ट्रवादीचा पराभव नक्कीच आहे. गेल्या काही दिवसात देशात हळूहळू निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. टी.व्ही, रेडिओ, वृत्तपत्रे यामधून सरकारी तसेच विविध पक्षांच्या जाहीरातींचा ओघ वाढत चालला आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा तर प्रचार गेले वर्षभर सुरु आहे. देशातील तसेच गुजरातमधील अनेक भांडवलदार त्यांच्या प्रचारासाठी आपल्या थैल्या रीत्या करीत आहेत. त्यामुळे भाजपातर्फे असे वातावरण तयार करण्यात आले आहे की, जणू आता निवडणुका झाल्यावर फक्त नरेंद्रभाईंचा केवळ शपथविधीच बाकी आहे. परंतु भाजपासाठी अजून दिल्ली बहोत दूर आहे. भाजपाने आपला जाहीरनामा तयार करण्याठी अनेक नामवंत भाडोत्री अर्थतज्ज्ञांना आमंत्रित केले आहे. कॉँग्रेसचे व भाजपाचे आर्थिक भांडवली धोरण यात तसूरही फरक नाही. उलट आपण सत्तेवर आल्यावर भांडवलदारांना खूष करण्यासाठी ते अधिक वेगाने आर्थिक उदारीकरण व खासगीकरणाचे घोडे दामटणार आहेत. परंतु यातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे भाजपाची आर्थिक धोरणे ही काही कॉँग्रेसपेक्षा काही वेगळी असतील असे नव्हे. उलट सत्तेवर आल्यावर त्यांना काही बाबतीत धोरण घेतना अनेक अडचणी येतील. यातील उत्तम उदाहरण म्हणजे रिटेलमधील थेट विदेशी गुंतवणुकीच्या धोरणाबाबत. भाजपाने रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीला कडवा विरोध केला होता व सत्तेत आल्यास हे धोरण बदलू असे जाहीर केले आहे. भाजपाने एका विरोधी पक्ष म्हणून या धोरणाला विरोध केला असला तरीही मनापासून त्यांचा रिटेलमधील विदेशी भांडवलाला विरोध नाही हे उघड आहे. त्यामुळे खरोखरीच सत्तेत आल्यास भाजपाची या धोरणावरुन गोची होणार आहे. एकीकडे भाजपाने जोरदार तयारी सुरु केली असताना दुसरीकडे सत्ताधारी कॉँग्रेसनेही आपला प्रचार आता वाढविण्यास सुरुवात केली आहे. प्रसार माध्यमातून एक तर भारत निर्माणच्या जाहीरीती सरकारी खर्चाने प्रकाशीत केल्या जात आहेत. या जाहिराती व वास्तव यात जमीन आसमानचे अंतर आहे की लोक या जाहीरातींची थट्टा करीत आहेत. यावेळी कॉँग्रेसने आपले लक्ष्य केवळ आम आदमीवर न ठेवता मध्यमवर्गीयांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांना ाता समजून चुकले की, देशातील मध्यमवर्गीयांची जी २५ कोटी लोकसंख्येची जी अवाढव्य बाजारपेठ आहे ती आता जागृत झाली आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीत निवडून आणण्यात शिक्षित मध्यमवर्गीयाचा मोठा हातभार लागला ाहे. त्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षीत ठेवलेल्या या मतदाराची जाग कॉँग्रेसला आली आहे. नेहमी हा वर्ग मतदानापासून लांब राहतो अशी समजूत होती. मात्र गेल्या वेळच्या चार राज्याच्या विदानसभा निवडणुकीत याच मतदाराने आपली मत आम आदमी पक्षाला देऊन आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखविली आहे. आपल्या देशातील अंदाजे १२३ कोटी लोकसंख्येपैकी २७ कोटी लोक हे दारिद्—य रेषेच्या खाली राहातात. तसेच २५ कोटी लोक हे मध्यमवर्गीय आहेत. तत्यामुळे हे वजा करता ७१ कोटी लोक शिल्लक राहिले. यांच्यासाठी कॉँग्रेसने आता विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु गेल्या दहा वर्षात कॉँग्रेसच्या आघाडी सरकराने आम आदमीसाठी कोणतेही ठोस कार्यक्रम न आखल्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना विटली आहे. अशा स्थितीत लोकांसमोर जाताना कॉँग्रेसला मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे सध्या जो प्रचार सुरु आहे तो बिनबुडाचा ठरणार आहे. श्रीमंत, मध्यमवर्गीय व दारिद्—य रेषेच्यावरचे असे ७० कोटी लोकांना यावेळी कॉँग्रेसने टार्गेट करण्याचे ठरविले आहे. कारण मध्यमवर्गीय हे कॉँग्रेसला मतदान करीत नाहीत हे सिध्द झाले आहे. सध्या मध्यमवर्गीयांवर आम आदमी पक्षाचा पगडा आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खालचा व दारिद्—यरेषेच्या वरचा असा नवीन मतदार आपल्याला मत देईल अशी कॉँग्रेसची भाबडी समजूत आहे. या वर्गालाच खूष करण्यासाठी अलीकडेच कॉँग्रेसने स्वयंपाकाच्या सवलतीतील गॅसची संख्या १२वर नेली आहे. त्याचबरोबर दिल्लीत ईशान्येकडील एका मूलाच्या झालेल्या हत्या प्रकरणी राहूल गांधींनी निदर्शनाच्या स्थळी भेट दिली होती. भाजपाने सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली होती. त्याधर्तीवर कॉँग्रसनेही सोशल मिडियात आता चंचूप्रवेश केला आहे. त्याव्दारे राहूल गांधींची प्रतिमा कशी उंचावेल हे पाहिले जात आहे. परंतु याचा कॉँग्रेसला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. कारण सोशल मिडियामध्ये कॉँग्रेस विरोधी लाटेचा जो प्रचार सुरु आहे तिला अडविणे कॉंग्रेसला कठीण जाणार आहे. तसेच आता वेळही कमी शिल्लक आहे. अजून निवडणुकीची घषणा झालेली नसताना निवडणुकीचे हे पडघम वाजू लागले आहेत. एकदा का निवडणूक जाहीर झाली की, हे पडघम आणखी जोरात वाजतील.
------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel