संपादकीय पान शुक्रवार दि. ३ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
ई कॉमर्सची विस्तारणारी क्षितीजे
---------------------
एक काळ असा होता की आपल्याला कोणतीही बाब खरेदी करण्यासाठी एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करावी लागत होती. आता मात्र हे दिवस संपुष्टात येत आहेत. तुम्हाला कोणतीही गोष्ट आता घर बसल्या खरेदी करता येणे आता शक्य झाले आहे. इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्यापासून तुम्ही कोणत्याही वस्तूंंची खरेदी सहजरित्या घरी करु शकता. अगदी किराणा मालापासून ते विमानाचे तिकिट असो किंवा पर्यटनाची सहल असो तुम्ही हे सर्व एका झटक्यात घरी करु शकता. अशा प्रकारे ई कॉमर्सव्दारे होणार्या या व्यवहारांना आज केवळ शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन वर्षात या ई कॉमर्सचे व्यवहार १५० टक्क्यांनी वधारले आहेत. जागतिक पातळीवरील अनेक नामवंत सल्लागार कंपन्यांनी केलेल्या एका पाहणीनुसार, भारतात ई कॉमर्सचे व्यवहार भविष्यात झपाट्याने वाढणार आहेत. आपल्याकडे विदेशाच्या तुलनेत इंटरनेटचा प्रसार तेवढ्या झपाट्याने झालेला नाही. इंटरनेटची मागणी सर्वत्र जोरात आहे. परंतु ती पुरविली जात नाही. जर येत्या काही वर्षात गावोगावी इंटरनेट पोहोचले तर ई व्यवहार आणखी झपाट्याने वाढतील. सध्या दरवर्षी हे व्यवहार सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे होतात. मात्र एका अंदाजानुसार, २०२१ साली हे व्यवहार ७६ अब्ज डॉलरवर पोहोचतील. सध्या आपल्याकडे ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे २० कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. पुढील महिन्याभरात ही संख्या २१कोटींवर पोहोचेल. ऑनलाईन व्यवहार वाढू लागल्याने यात अनेक नवीन उद्योजक उतरत आहेत. सद्या असलेल्या २० कोटी इंटरनेट कनेक्शन्सपैकी साडे सहा कोटी कनेक्शन्सही ग्रामीण भागातली आहेत. मोठ्या शहरातून एखाद्या मालाची ऑर्डर आली तर त्याचा पुरवठा करणे हे अवघड जात नाही. मात्र लहान व मध्यम आकारातील शहरात मात्र माल पोहोचविणे हे मोठे आव्हान ठरते. सध्या त्यामुळे इंटरनेटव्दारे व्यवहार करणार्या कंपन्या फारशा नफ्यात नाहीत. मात्र त्यांची व्याप्ती वाढत असल्याने तसेच व्यवहाराची उलाढाल वाढत असल्याने त्या कंपन्या आकर्षक वाटतात. अनेक जणांनी विविध व्यवसाय व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन वेबसाईट तयार केल्या आहेत. यातील तामीळनाडून चेन्नई शहरात एक वेबसाईट सुरु करण्यात आली आहे ती, सुका कचरा घरोघरी जाऊन उचलायचे काम करते. सध्या त्यांचे १५ हजार सदस्य आहेत. त्यांनी वेबसाईटव्दारे कळविले की, ते घरी येतात व सर्व प्रकारचा सुका कचरा घेऊन किलोवर विकत घेेऊन घेऊन जातात. अशा प्रकारे विविध ऑनलाईन सेवा आता सुरु झाल्या आहेत. एवढेच कशाला आता घरातील जुन्या वस्तू विकण्यासाठीही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. अनेकदा आपल्याला या वस्तूंसाठी नेमके कुठे गिर्हाईक आहे त्याची कल्पना नसते. अशा वेळी विकणारा व विकत घेणारा यांच्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरु शकते. तसेच अनेक लहान वमध्यम आकाराच्या उद्योगांनाही आपले उत्पादन विकण्याची संधी उपलब्ध होईल. भविष्यात अनेक उद्योग हे इंटरनेटच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे भविष्य या उद्योगातच आहे. अमेरिकेत वृत्तपत्र बंद पडत असून इंटरनेटवर वृत्तपत्रे वाचण्याची लोकांना सवय लागली आहे. अथार्र्त हे बदल आपल्याकडे यायला काही वेळ लागणार नाही. इंटरनेटवरील व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारे इ कॉमर्सची विस्तारणारी क्षितीजे आपल्याला फायदेशीर ठरणारी आहेत.
-------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा