-->
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अर्थ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अर्थ

रविवार दि. १७ जानेवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अर्थ
------------------------------------------
राज्यातील १८ नगरपंचायती व दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ३३१ जागा होत्या. त्यातील १०७ जागा कॉँग्रेसने जिंकून पहिला क्रमांक पटकाविला आहे तर त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसने ८४ जागा पटकावून दुसरा क्रमांक पटकाविला. तर सत्ताधारी असणार्‍या शिवसेनेला ५८ व भाजपाला केवळ ३२ जागांवर समाधान मानावे लागलेे. शिवसेना-भाजपाच्या सरकारबाबत अशा प्रकारे मतदारांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भाजपासह शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी हा एक मोठा धडा आहे. सरकारविरोधातील रोष अशा प्रकारे मतदारांनी व्यक्त केल्याने सत्ताधार्‍यांसाठी ही धोक्याची घंटाच ठरावी अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जिथे जिथे भाजपाचे खासदार निवडून आले होते, त्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपाची पिछाडी झाली. याची कारणे काय आहेत?
--------------------------------------------
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका म्हणजे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या राज्यातील सर्वच भागात झाल्यामुळे ही एक मिनी विधानसभेची निवडणूक ठरली होती. मात्र जनतेने भाजपाला एकमताने झिडकारले आहे. एकूणच पाहता भाजपाच्या विरोधात एक लाटच तयार होत आहे असे सार्वत्रिक चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसह राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार राजाने सत्ताधार्‍यांना एकूण जागांत तीन व चार क्रमांकावर फेकून चांगलीच चपराक दिली. राज्यातील १८ नगरपंचायती व दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ३३१ जागा होत्या. त्यातील १०७ जागा कॉँग्रेसने जिंकून पहिला क्रमांक पटकाविला आहे तर त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसने ८४ जागा पटकावून दुसरा क्रमांक पटकाविला. तर सत्ताधारी असणार्‍या शिवसेनेला ५८ व भाजपाला केवळ ३२ जागांवर समाधान मानावे लागलेे. शिवसेना-भाजपाच्या सरकारबाबत अशा प्रकारे मतदारांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भाजपासह शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी हा एक मोठा धडा आहे. सरकारविरोधातील रोष अशा प्रकारे मतदारांनी व्यक्त केल्याने सत्ताधार्‍यांसाठी ही धोक्याची घंटाच ठरावी अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जिथे जिथे भाजपाचे खासदार निवडून आले होते, त्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपाची पिछाडी झाली. याची कारणे काय आहेत? सरकारची धोरणेच त्याला जबाबदार आहेत. विकासाच्या मुद्यावर भाजपाने विधानसभा निवडणुकीत मोठे रान उठविले होते. मात्र प्रत्यक्षात सत्ता हाती आल्यावर जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक झालेली नाही. निदान प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने कोणतीच पावले पडलेली नाहीत. त्यामुळे जनतेला वास्तव केवळ दीड वर्षात समजले. त्यामुळे जनतेने सत्ताधार्‍यांना या निवडणुकीत हिसका दिला आहे.
रायगड जिल्ह्यात खालापूर येथे शेतकरी कामगार पक्षाने जोरदार मुसंडी मारुन एक हाती सत्ता कमावली आहे. तर तळा, पोलदपूर शिवसेनेकडे तर म्हसळा, माणगाव येथे राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम टिकविण्यात यश मिळविले आहे. शेकापला खालापूरात मिळालेले यश हे लक्षणीयच म्हटले पाहिजे. आजवर शेकापला खालापूर ग्रामपंचायत असताना एकहाती सत्ता कधी मिळाली नव्हती. आता मात्र नगरपंचायत झाली असताना पहिल्यांदा मतदारांनी शेकापच्या हाती सत्ता देऊन विकासाच्या दृष्टीने आपला कौल दिला आहे. आजवर खालापूरमध्ये कॉँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर अलिकडच्या काळात शिवसेनेने आपला वरचश्मा येथे कायम टिकविला होता. आता मात्र जनतेने या दोघांनाही बाजुला सारुन शेकापच्या हाती सत्ता दिली आहे. खालापूरचे म्हणून काही स्वतंत्र प्रश्‍न आहेत. तेथे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढले होते. त्यातील काही कारखाने बंद पडले आहेत. त्याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे स्थानिकांचे जे प्रश्‍न निर्माण झाले आहेत त्याबाबतच शेकापच उत्तरे शोधू शकतो असा विश्‍वास खालापूरकरांना वाटल्याने त्यांनी ही संधी त्यांना दिली आहे. खालापूर हे ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणची बाजारपेठ लुटल्यावर येथील साभाई मंदिरातच आपला पहिला मुक्काम ठोकला होता. त्याचबरोबर अष्टविनायकातील वरदविनायकाचे स्थान येथीलच. खालापूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. इंग्रजांनी या भागाचे वैशिष्ट्य ओळखून तेथे तहसिल कार्यालय स्थापन केले होते. आता पुढील पाच वर्षात खालापूरचा विकास करण्याचे काम शेकापला करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या या निवडणुकीत भाजपा व मनसे या दोन्ही पक्षांना शून्य भेदता आलेले नाही. मुंबईची एक जागा शिवसेनेने आपल्याकडे राखण्यात य्श मिळविले तर अहमदनगरमध्येही त्यांना एका जागा विजय मिळाला आहे. नवी मुंबई व पिंपरी-चिचंवड येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील दोन नगरपालिका कॉँग्रेसने ताब्यात घेतल्या असून तेथे भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या. याच जिल्ह्यातील गोडपिंपरीमध्ये भाजपाला सहा ठिकाणी यश आले असले तरीही तेथील चाव्या अपक्षांच्या हाती आल्या आहेत. त्यामुळे तेथे भाजपाला सत्ता मिळविण्यासाठी पक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. गृहराज्यमंत्री व भाजपाचे नेते राम शिंदे यांच्या जामखेडमध्येही भाजपाची स्थिती दयनीय झाली असून २१ पैकी फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे. भाजपाला रायगडबरोबर नंदुरबारमधील सातही नगरपालिकांमध्ये एकही जागा मिळालेली नाही. अन्य जिल्ह्यातही तीन नगरपालिकांमध्ये भाजपाच्या हाती भोपळाच लागला आहे. २०१४ची लोकसभा निवडणूक सोडली तर त्या नंतरच्या सर्व निवडणुकांत भाजपाला यश मिळालेले नाही, याचाच स्पष्ट अर्थ असा की, भाजपाची लाट आता संपुष्टात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेच्या प्रश्‍नांना जरुर हात घातला व भावनीक प्रश्‍न करुन लोकांना मोठी प्रलोभने दाखविली. शेवटी सत्ता आल्यावर हातातून काहीच घडले नाही. याचा परिणाम म्हणून लोकांनी नैराश्येपोटी भाजपाला मतदान केलेले नाही. भाजपाला मतदान करायचे नाही म्हणून नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळाले आहे.
सत्तेत आल्यावर मांडलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकामुळे भाजपा आणि त्यांचे नेते मोदी हे शेतकरी विरोधी आहेत, हे पहिल्या प्रथम शेतकर्‍यालाच कळले. त्यानंतर महागाई, भ्रष्टाचार, काळा पैसा याबाबत दिलेली आश्‍वासने सरकारला पूर्ण करता आलेली नाही. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहावयास मिळाला आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अर्थ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel