-->
संपादकीय पान गुरुवार दि. ३० जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
वाघा सीमेवरील व्यापारात पुन्हा तणाव
---------------------------
भारत-पाक सीमेवरील वाहतुकीच्या अत्यंत महत्वाच्या समजल्या गेलेल्या वाघा या सीमेवर गेले बारा दिवस तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने होणारी माल तसेच प्रवासी वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. दोन देशांमधील तणाव निवळण्यासाठी गेले काही वर्षे चर्चेच्या विविध फेर्‍या सुरु असताना वाघा सीमेवर अशा प्रकारचा वाहतूक पूर्णपणे बंद होण्या इतपत तणाव कधीच झाला नव्हता. सुमारे बारा दिवसापूर्वी पाकिस्तानातून येणार्‍या एका ट्रकमध्ये ११४ किलो ब्राऊन शुगर सापडल्याने भारताने लगेचच या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आणि तणाव सुरु झाला. या चालकाला त्वरीत सोडावे यासाठी अन्य पाकिस्तानी चालकांनी आपले ट्रक बंद करुन आंदोलन सुरु केले. हा तणाव वाढत गेला आणि वाघा सीमेवरुन होणारी सर्व प्रवासी व माल वाहतूक ठप्प झाली. यानंतर इस्लामाबादच्या विनंतीवरुन आयोजित केलेली चर्चेची फेरीही फिसकटली. या प्रश्‍नावरुन दोन तास चर्चा मात्र त्यातून काही तोडगा निघू शकलेला नाही. भारतीय अधिकार्‍यांच्या सांगण्यानुसार, ही चर्चा म्हणजे फुकट वेळ दवडण्याचा प्रकार होता. यामुळे सुमारे २० भारतीय ट्रक पाकिस्तानच्या भागात तर भारतीय बाजूला सुमारे ५० ट्रक अडकले आहेत. एकदा चर्चा फिसकटल्याने आता पुन्हा एकदा तातडीने चर्चेच्या फेर्‍या होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढत चालला आहे. भारताने जप्त केलेले ब्राऊन शुगर व ट्रक चालक अशा दोन्ही बाबी आम्हाला परत द्याव्यात अशी पाकिस्तानची मागणी आहे. पगरंतु ही मागणी भारतीय बाजू काही मान्य करायला तयार नाही. यातून ही चर्चा फिसकटली आहे. उभय देशातील करारानुसार जर व्यापारा दरम्यान कुणी गुन्हेगारी कृत्य केले तर तर पकडलेल्या देशाने त्यांच्या देशात असलेल्या कायद्यानुसार कारवाई करावी. या नियमांनुसार, भारताने कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे. यासंबंधी भारताची भूमिका रास्त आहे आणि कायद्यानुसार कारवाई व्हावी असे म्हणणेही योग्य आहे. गेल्या काही वर्षात भारत-पाकिस्तान देशांमध्ये वेळोवेळी तणावाचे वातावरण असले तरी उभयतांतील व्यापार मात्र वाढत चालला आहे. त्यामुळे हा व्यापार वाढण्यासाठी वाघा सीमा निर्बंध मुक्त व्हावी व जास्तीत जास्त व्यापार व्हावा यासाठी प्रयत्न होत होते. परंतु भारत-पाक देशांमध्ये तणाव कमी होण्यासाठी ज्यावेळी काही सकारात्मक पावले पडत असतात त्यावेळी एखादी घटना हमखास घडते आणि सीमेवरील तणाव पुन्हा वाढतो. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना त्यांनी सीमेवरील व्यापार व प्रवासी वाहतूक वाढावी यासाठी बस सेवा सुरु केली होती. त्यानंतर वाघा सीमेवरुन उभय देशांचा व्यापार वाढत गेला. गेल्या आर्थिक वर्षात भारत-पाकिस्तान दरम्यान व्यापार सुमारे २.३ अब्ज डॉलरचा झाला. खरे तर उभयतांत हा व्यापार १० अब्ज डॉलरवर पोहोचू शकतो. परंतु उभय देशात असलेले अनेक व्यापार निर्बंध पाहता व्यापारावर अनेक मर्यादा येतात. सध्या वाघा सीमेवरुन फक्त दिवसाउजेडीच व्यापार होतो. हा व्यापार जर संपूर्ण दिवस चालला तर आणखी उलाढाल वाढेल. २०१४ सालापर्यँत या दोन्ही देशांनी परस्परातील व्यापार सएात अब्ज डॉलरवर नेण्याचे उदिष्ट निश्‍चित केले होते. मात्र हे आता तरी साध्य होईल असे काही दिसत नाही. सध्याच्या स्थितीत निर्माण झालेला व्यापाराच्या दळणवळणातील तणाव लवकरात लवकर सुटला पाहिजे. या सीमेवरुन गुन्हेगारी होणार असले तर कोणताच देश सहन करणार नाही हे देखील तेवढेच खरे आहे. मात्र उभय देशांतील व्यापार वाढला पाहिजे, कारण यात दोन्ही देशांचे हीत आहे.
-------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel