-->
संपादकीय पान सोमवार दि. १३ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
देशाची शान वाढविणारा मुंबईचा आन्तरराष्ट्रीय विमानतळ
---------------------
आधुनिक जगात सर्वात प्रथम त्या देशाबद्दल मनात प्रतिमा तयार होते ती विमानतळ पाहिल्यावर. जगातील अनेक विकसीत तसेच विकसनशील देशात विमानतळ ही त्या देशाची शान समजली जाते. कारण जो परदेशी पर्यटक विमानतळावर उतरतो त्याला विमानतळ पाहिल्यावर त्या देशाची स्थिती, लोकांची मानसिकता काय असते हे एका झटक्यात समजते. त्यामुळे आपल्यासारख्या विकसनशील देशात आन्तरराष्ट्रीय विमानतळ उत्कृष्ट दर्ज्याचा असणे ही काळाची गरज होती. दिल्लीचा आन्तरराष्ट्रीय विमानतळ हा चार वर्षांपूर्वी अतिशय सुंदर करण्यात आला. सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे त्याचे स्वरुप करण्यात आले. त्यापाठोपाठ मुंबई आन्तरराष्ट्रीय विमानतळाची पाळी होती. यातील टर्मिनल २ चे उद्दघाटन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय चकाचक व जागतिक दर्ज्याचा असलेले हे नवीन टर्मिनल देशाची शान जगात वाढविणारे आहे. आपला देश विकसनशील असला तरीही विकास, आधुनिकता याची आपण कास धरली आहे हे यातून जगातील पर्यटकांना आपण दाखवू शकतो. बिजिंगचा आन्तरराष्ट्रीय विमानतळ हा पाहिल्यावर आपल्या देशाची मान शरमेने खाली जात होती. आता मात्र या विमानतळाशी तुलना करता येईल असा आलिशान विमानतळ आपण उभारला आहे. मुबंईसारख्या महानगरात जागेला इंच-इंच महत्व आहे. त्यामुळे कमीत-कमी जागात भव्य विमानतळ बांधणे त्याचबरोबर सध्याची विमानसेवा खंडीत न करता याची उभारणी करणे हे एक मोठे कौशल्य होते. यात आपले तंत्रज्ञ व वास्तुविशारद पास झाले आहेत. छत्रपती शिवाजी आन्तरराष्ट्रीय विमानतळाचे हे आधुनिकीकरण तब्बल ५५०० कोटी रुपये खर्चुन करण्यात आलेले आहे. दिल्लीचा विमानतळही ५१२८ एकर विभागावर पसरलेला आहे. तर मुंबईचा हा विमानतळ फक्त १४०० एकरवर पसरलेला आहे. त्याउलट हैदराबाद, बंगलोर हे विमानतळ ५५०० एकर वर पसरलेले आहेत. देशातील १९ टक्के प्रवाशांची व २९ टक्के मालवाहतुकीची मुंबईच्या या विमानतळावरुन ये-जा होत असते. असे असूनही हा जगातील सर्वात लहान विमानतळ आहे. गेल्या वर्षी या विमानतळावरुन सुमारे तीन कोटीहून जास्त प्रवाशांची ने-आण झाली. आता या नवीन टर्मिनलमुळे चार लाख स्केअर मीटर्स जागा उपलब्ध झाली आहे. चार कोटी प्रवाशांची हाताळणी येथून आता सहजरित्या होऊ शकेल. एकूण १० हजार प्रवाशांना बसण्याची केलेली सोय, १०२ शौचालये, १६१ लिफ्ट, प्रति तासाला ९६०० बॅगांची हाताळणी, २०८ काऊंटर असे या नवीन टर्मिनलचे वैशिष्ट्य ठरावे. मुंबईतील मर्यादीत जागा लक्षात घेता हे नवीन टर्मिनल उभारण्यात आले आहे. येथे उभारलेली १५ मीटर उंचीची ग्लास ही जगात प्रथमच उभारण्यात आलेली आहे. मुंबईच्या विमानतळावर दिखाव्यासाठी २.२६ लाख स्केअर फूट विभाग उपलब्ध होणार आहे. येथे जय हे या शिर्षकाखाली डिस्ल्पे दाखविले जाणार आहेत. याचे अंतर हे जवळपास तीन कि.मी.ऐवढे अंतर असेल. मुंबईच्या या विमानतळामुळे आपली जगात शान वाढणार आहे. े सरकारने या विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेले पाऊल महत्वाचे ठरावे. मुंबईचा सध्याचा विमानतळ हा जुना बांधलेले आहे. त्याच्या आधुनिकीकरणाची गरज तर होतीच. आपल्याकडे विमानतळाच्या बाहेर असलेल्या झोपड्या आपल्या सर्वांच्या नजरेत भरतात. परंतु या झोपड्या आहेत हे वास्तव स्वीकारुन आपल्याला विकास करावयाचा आहे हे लक्षात ठेवून आपण आधुनिकीकरण केले आहे. यामुळे विमानतळाची क्षमता वाढली आहे आणि आपण विकसाचे पाऊल टाकीत आहोत हे देखील आपण दाखवून दिले आहे.
---------------------------------    

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel