-->
सेरेनाचा नवा विक्रम

सेरेनाचा नवा विक्रम

संपादकीय पान बुधवार दि. 1 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
सेरेनाचा नवा विक्रम
ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून आफ्रिकन वंशाच्या अमेरिकी सेरेना विल्यम्सने टेनिस इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले. तिने हे विजेतेपद तब्बल 23 वेळा पटकाविले आहे. आता सर्वाधिक 22 विजेतेपदे जिंकणारी जर्मनीची टेनिसपटू स्टेफी ग्राफचा विक्रम त्यामुळे मोडीत निघाला. पुरुषांमध्ये जेतेपद फेडररने पटकाविले. त्याचे हे 18 वे जेतेपद होते. स्टेफी व सेरेना यांच्यात 12 वर्षाचे अंतर आहे. दोघींनी विम्बल्डन प्रत्येकी सात वेळा जिंकले आहे, तर सहा वेळा यूएस ओपन जिंकणारी सेरेना एका जेतेपदाने स्टेफीच्या पुढे आहे. या दोघींच्या संपूर्ण करिअर ग्राफचा अभ्यास केल्यास स्टेफी तब्बल 377 आठवडे प्रथम क्रमांकावर होती तर सर्वाधिक 308 ग्रॅण्ड स्लॅम विजयाचा विक्रम सेरेनाच्या खात्यावर आहे. या दोघींची भिन्न देहबोली, शैली, खेळातील ताकद भिन्न तर आहेच शिवाय त्यांची खेलम्यातली नजाकतही वेगळी आहे. त्यामळेे या दोघींंचा खेळ पाहणे ही एक आनंददायी पर्वणीच असते. पुरुष व महिला टेनिसचा खेळ हा कौशल्याबरोबरच ताकदीचाही खेळ ठरला आहे. चेंडूचा वेग व खेळाडूंचे चापल्य टेनिसचे नवे वैशिष्ट्य ठरते. यात या दोघीही नेहमीच सरस ठरल्या आहेत. एक मोठी मानसिक क्षमता, संतुलन तर बाळगावे लागतेच शिवाय जबरदस्त स्टॅमिना असावा लागतो. नव्या दमातील खेळाडूंची क्षमता जास्त असते, असे असले तरीही निवृत्तीच्या दिशेने झुकलेल्या खेळाडूलाही आपला फॉर्म कायम टिकवायचा असले तर हा स्ट्रमिना कायम ठेवणे बाग पडते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तर यंदा अंतिम सामन्यात पस्तिशी पार केलेल्या विल्यम्स भगिनी एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या, तर पस्तिशी ओलांडलेला रॉजर फेडरर व तिशी पार केलेला राफेल नदाल यांच्यात पुरुषांचा अंतिम सामना झाला. तरी देखील कुणाचाही स्ट्रमिना संपला नव्हता. एकाद्या तरुणाला लाजवेल असाच खेळ झाला. सेरेनाप्रमाणेच वाढत्या वयाचा आपल्या खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही, याचाच प्रत्यय फेडररने दिला. भारतात टेनिसस्टार जन्माला आले मात्र त्यात सानिया मिर्झा हीने आपली चांगलीच झलक दाखवून दिली. परंतु ती नेहमीच एकेरी गटात खेळम्यापेक्षा दुहेरी गटात चांगली चमकली आहे. यावेळी मात्र तिचे स्वप्न भंगले आहे. मात्र भारतात ज्यावेळी सेरेना किंवा फेडरर जन्माला येईल तो दिन आपल्यासाठी मोठ्या भाग्याचाच असेल.
--------------------------------------------------------------

0 Response to "सेरेनाचा नवा विक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel