संपादकीय पान सोमवार दि. १३ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
स्वागतार्ह निर्णय
---------------------------
सध्या प्रॅक्टीस करीत असलेल्या होमियोपथी डॉक्टर्सना यापुढे ऍलोपथीची प्रॅक्टीस करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रमंडळाने घेतला असून त्याचे स्वागत झाले पाहिजे. त्यासाठी त्यांना पात्र ठरण्यासाठी होमियोपाथ डॉक्टरांना एक वर्षाचा फार्माकॉलॉजीचा अभ्यासक्रम पास करावा लागणार आहे. त्यानंतरच ते पात्र ठरतील. अर्थात या निर्णयाच्या विरोधात ऍलोपथी डॉक्टर दंड थोपटणार असून आपल्या आंदोलनाचा मार्ग लवकरच जाहीर करणार आहे. परंतु ऍलोपथी डॉक्टरांच्या या धमकीला न घाबरता सरकारने या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली पाहिजे. सध्या नाही तरी ऍलोपथीची प्रॅक्टीस होमियोपथी व आयुर्वेदीक डॉक्टर सर्रास करीत असतात. त्यामुळे त्यांना आता ही प्रॅक्टीस अधिकृतपणे करता येणार आहे. सरकारने केवळ होमियोपथीच नव्हे तर आयुर्वेदीक व युनानी या डॉक्टर्सना सरकारने अशा प्रकारे ऍलोपथी प्रॅक्टीस करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. आपल्याकडे या चार वैद्यकीय उपचार पध्दती या चांगल्याच रुजलेल्या आहेत. डॉक्टरांमधील ही चार्तुवर्णीय व्यवस्था असल्याचे आपण याचे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आपल्याकडे ऍलोपथी डॉक्टर आपल्याला श्रेष्ठ समजत असल्याने ते अन्य पॅथीचे डॉक्टरांना आपल्यापेक्षा कमी लेखतात. त्यामुळेच ऍलोपथी डॉक्टर होण्यासाठी प्रचंड गर्दी तर असतेच शिवाय येथे प्रवेश मिळाण्यासाठी लोखे रुपयांची कॅपिटेशन फी द्यायला ते तयार असतात. अर्थात ऍलोपथी हे शास्त्र प्रगत झाल्याने यात मोठे संशोधन जागतिक पातळीवर केले. हे संशओधन प्रामुख्याने औषध कंपन्यांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी केले. आयुर्वेद, ऍलोपथी व युनानी या पुर्वापार चालत आलेल्या पध्दती असून त्यात संशोधन फारसेे झालेले नाही. याचे कारण त्यांच्याकडे औषध निर्मितीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या नाही आहेत. त्यामुळे या पथी संशोधनात मागे पडल्याने मागास राहिल्या. आपल्याकडे या क्षेत्रात जे पूर्वी संशोधन झाले त्यावरच त्यांची गाडी अडकली. त्यामुळे या पथी मागे पडल्या. त्यामुळे येथे जाणार्या विद्यार्थ्यांची संख्याही कमीच राहिली. ऍलोपथीला प्रवेश मिळाला नाही तर नाईलाज म्हणून अन्य पथीचे डॉक्टर होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. याचा अर्थ या पथी कालबाह्य झाल्या आहेत असे नव्हे. या पथींचे शिक्षण घेणारे हे देखील डॉक्टरच आहेत आणि अभ्यास करुन रुग्णांना बरे करण्याचेच ब्रत घेतले आहे. बरे हे डॉक्टर नाही तरी रोग्यांना किरकोळ रोगांवरच नाही तरी उपचार करीत आसतात. आपल्याकडे मनुष्याला कोणत्याही रोगापासून बरे होण्यासाठी बेसिक ६० औषधांची गरज भासते. ऍलोपथीतील कंपन्यांच्या रॅकेटमुळे औषधांची संख्या ७० हजारांवर पोहोचली आहे. ऍलोपथीत जास्त औषधे आहेत म्हणजे हे शास्त्र जास्त प्रगत आहे असे नव्हे. बरे फार कमी संख्येने विद्यार्थी ऍलोपथीकडे जातात. सध्या आपल्या देशात चार लाख आयुर्वेद व दोन लाख होमियोपाथ प्रॅक्टीस करीत आहेत. दरवर्षी देशात सात लाख नवीन डॉक्टर आपले शिक्षण पूर्ण करतात. त्यापैकी केवळ चार टक्के ऍलोपाथ असतात. अन्य डॉक्टर हे होमियोपाथ व आयुर्वेदिक असतात. त्यामुळे आपल्याकडील देशांच्या नागरिकांच्या आरोग्याची खरी देखभाल हे ऍलोपाथ नव्हे तर अन्यपॅथीवालेच घेत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सरकारी आकडेवारीनुसार २०१२ साली देशात ७.२ लाख नोंदणीकृत डॉक्टर्स आहेत. त्यातील ऍलोपाथ फक्त २३,२३१ असून २.२३ लाख होमियोपॅथ व अन्य आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ऍलोपाथ डॉक्टर आपल्या विषयी अभिमान बाळगतात तर मग त्यांनी ग्रामीण भागाकडे पाठ वळविणे आता बंद करावे. चांगले पैसे देणार्या शहरी भागातच या डॉक्टरांचा प्रॅक्टीस करण्याकडे कल असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो जनता ही आयुर्वेद व होमियोपाथ डॉक्टरांवर अवलंबून असते. खरे तर हा असमतोल भरुन काढण्यासाठी ऍलोपाथ डॉक्टरांवर किमान पाच वर्षे ग्रामीण भागात प्रॅक्टीस करण्यावर सक्ती केली पाहिजे. अगदी वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर एक वर्ष सुध्दा हे डॉक्टर ग्रामीण भागात जाऊन काम करण्यास तयार नसतात. त्यासाठी वेळ पडल्यास दंड भरावयाची त्यांची तयारी असते. अशा प्रकारे जर ऍलोपाथ डॉक्टरांना आपल्या सेवेचा गर्व असेल तर तो त्यांनी आपल्याकडेच ठेवावा. इकडे ग्रामीण भागांसाठी डॉक्टरांची जी कमतरता भासते ती भरुन काढण्यासाठी सरकारला अशा प्रकारे अन्य पॅथीच्या डॉक्टरांना आणखी ज्ञान देऊन ऍलोपथीची प्रॅक्टीस करण्यास परवानगी दिल्यास कोठे चुकले असा सवाल आहे. होमियोपॅथी हे शास्त्र जर्मनीत मान्यता पावलेले आहे आणि ऍलोपथीच्या जोडीने त्याला जर्मन सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे ऍलोपथी डॉक्टरांनी अन्य पॅथीच्या डॉक्टरांना कमी लेखण्याचे सोडून द्यावे. आपल्याकडे लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण भागासाठी काही खास अभ्यासक्रम करुन नवीन डॉक्टर तयार करण्याचीही योजना सरकारने आखली पाहिजे. आज आपल्याकडे खेडोपाडी लोकांना सर्दी-खोकला-तापाच्या औषधासाठी वणवण भटकावे लागते. अशा वेळी जर होमियोपाथ किंवा आयुर्वेदीक डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून आल्यास त्याचा त्यांना निश्चितच उपयोग होणार आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे व त्याचे सर्वांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेने जोरदार स्वागत केले पाहिजे.
-------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा