-->
एवढे घोटाळे होऊनही भ्रष्टाचारात शंभरीच्या आत
आपला देश भविष्यात महासत्ता होईल किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. निदान सध्याचे राज्यकर्ते तरी आपल्याला तशी स्वप्ने दाखवित आहेत. त्यादृष्टीने आपली पावले तर काही पडत नाहीत. महासत्ता सोडा मात्र भ्रष्टाचारामध्ये तरी आपण शंभराच्या आत म्हणजे ९४वे स्थान पटकाविले आहे. यावरुन आपल्या राज्यकर्त्यांची भ्रष्टाचारातली कार्यक्षमता तरी दिसते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गेले दोन वर्षे आपण हा नंबर कायम टिकविला आहे. खरे तर टू जी स्कॅम, कोळसा स्कॅम व अन्य घोटाळे लक्षात घेता आपला क्रमांक हा आणखी वर यवयास पाहिजे होता. कदाचित आपल्याकडच्या घोटाळ्यांची कल्पना भ्रष्टाचाराचा क्रमांक काढणारी आन्तरराष्ट्रीय संस्था ट्रान्परन्सी इंटरनॅशनलला माहिती नसावी असेच दिसते. डेन्मार्क व न्यूझीलंड या दोन देशात शून्य भ्रष्टाचार आहे. तर सोमालिया हा सर्वात जास्त भ्रष्टाचार असलेला देश आहे. या संस्थेने प्रत्येक देशाचा अभ्यास करुन ज्यांच्याकडे शून्य भ्रष्टाचार त्या देशाला शून्य गूण दिले आहेत. तर १०० गूण मिळणार्‍या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. या पाहणीत भारताला ३६ गुण मिळाले असून भारतात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असे म्हटेल आहे. ब्रिक्स देशांच्या पंक्तीत सर्वाधिक भ्रष्टाचार हा रशियात होतो. रशियाचा १२७ वा क्रमांक लागतो. तर त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. तर चीन ८०, दक्षिण आफ्रिका व ब्राझील यांचा ७२ वा क्रमांक लागतो. आपल्या शेजारच्या राष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो. त्यामुळे या यादीत पाकिस्तानचा क्रमांक १२७, नेपाळ ११६, बांगलादेश १३६, थायलंड १०२, इजिप्त ११४, व्हिएतनाम ११६, इराण १४४ असे क्रमांक लागतात. भ्रष्टाचाराच्या या यादीत अमेरिकेलाही १९वा क्रमांक लाभला आहे. आपल्याकडचे राज्यकर्तेच या भ्रष्टाचाराला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. स्वातंत्र्यापासून सर्वाधिक सत्ता ही कॉँग्रेस पक्षाकडे असल्याने त्याचीं जबाबदारी अर्थातच या पक्षाकडे येते. आपल्याकडे भष्टाचाराचे समर्थन करताना सगळ्याच देशात भ्रष्टाचार होतो असे सागंतात. परंतु त्यात तथ्य नाही कारण १७७ देशात दोन देश असेही आहेत की ज्यांच्याकडे शून्य भ्रष्टाचार आहे. मग आपण त्यांचा आदर्श का ठेऊ नये. परंतु आपल्याकडे जे वाईट आहे त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला जातो ही दुर्दैवाची बाब आहे. फिनलँड, अस्ट्रेलिया, स्वीडन, नॉर्वे, सिंगापूर, स्वित्झर्लँड, नेदरलँड, कॅनडा हे देश देखील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत येतात. सर्वात आर्श्चयाची बाब म्हणजे जगातील काळा पैसा स्वीकारुन त्यावर आपली अर्थव्यवस्था चालविणारा स्वित्झर्लंडमध्ये कमी भ्रष्टाचार आहे. हे आपल्याला धक्कादायक वाटते. परंतु हे खरे आहे. म्हणजे भ्रष्टाचारी पैशाचे नियोजन करणार्‍या देशात मात्र भ्रष्टाचार कमी आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षात प्रामुख्याने आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यापासून भ्रष्टाचार कमी होईल अशी अपेक्षा होती. परंतु झाले उलटे. भ्रष्टाचार कमी व्हाएच्या एवजी वाढतच गेला. काळा पैसा देखील गेल्या काही वर्षात वाढत गेला आहे. ज्यावेळी आपल्याकडे प्राप्ती कराचे प्रमाण जास्त होते त्यावेळी काळा पैसा त्यामुळे निर्माण होतो असे बोलले जायचे. परंतु उदारीकरण सुरु झाल्यावर सरकारने प्राप्तिकराची फेररचना केली आणि त्यात कर कमी करण्यात आला. असे केल्यावर काळा पैसा कमी होईल असे वाटले होते. मात्र काळा पैसा वाढतच गेला आहे. भ्रष्टाचार व काळा पैसा हे एकमेकांच्या हातात हात घालून वावरत असतात. या दोन्ही गोष्टींचा आपल्याकडे धुमाकूळ चालू आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्यकर्यात्यांचीच आहे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel