
समजावून घ्या कमॉडिटी बाजार |
Published on 16 Jan-2012 ARTHPRAVA |
प्रसाद केरकर, मुंबई |
प्रश्न- ‘कमॉडिटी एक्स्चेंज’ काय असते? भांडवली बाजारातील स्टॉक एक्स्चेंज अर्थात शेअर बाजाराप्रमाणे कमॉडिटी एक्स्चेंज हे कमॉडिटीजमध्ये (विविध जिनसांचे) वायदे- सौदे करणार्या विविध कंपन्या आणि उद्यम आस्थापनांचे संघटित मंडळ आहे. नव्या धाटणीची राष्ट्रीय स्तरावर कार्यरत झालेल्या एक्स्चेंजेसचे कंपनीकरण/ डिम्युच्युअलायझेशन केले गेले आहे. आजघडीला भारतात तीन राष्ट्रस्तरीय मान्यता असलेली तीन एक्स्चेंजेस आहेत, तर 22 प्रादेशिक एक्स्चेंजेस आहेत. राष्ट्रीय एक्स्चेंजेसमध्ये मुंबईतील मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स), नॅशनल कमॉडिटीज अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि नॅशनल मल्टी कमॉडिटीज एक्स्चेंज आदींचा समावेश होतो. प्रश्न - कमॉडिटी म्हणजे काय? ज्या वस्तूला व्यापारी मूल्य आहे आणि जिची निर्मिती, खरेदी, विक्री आणि उपभोग केला जाऊ शकतो अशा सर्व जिनसांना ‘कमॉडिटी’ म्हणता येईल. या जिनसा प्रामुख्याने मूळ कच्च्या व प्रक्रिया न केलेल्या स्वरूपातील असतात. पण देशाच्या प्राथमिक क्षेत्रातून (कृषी-ग्रामोद्योग क्षेत्र) उत्पादित आणि रचित वस्तूंचेही कमॉडिटी एक्स्चेंजवर व्यवहार केले जातात. भारतात व्यवहार होणार्या कमॉडिटीजमध्ये मौल्यवान धातू, लोहयुक्त व बिगर लोहयुक्त धातू, मसाले, डाळी, बागायती पिके, साखर आणि अन्य मृद जिनसांचा समावेश होतो. प्रश्न - कमॉडिटीज मार्केटमध्ये सहभागी असणारे विविध घटक कोणते? प्रश्न - कमॉडिटी बाजारात ट्रेडिंग कसे केले जाते? शेअर बाजारातील ऑनलाइन ट्रेडिंगप्रमाणेच कमॉडिटी बाजारातही प्रामुख्याने ऑनलाइन प्रणालीअंतर्गतच व्यवहार होतात. हे एक मागणीप्रवण, पारदर्शक ट्रेडिंग व्यासपीठ आहे, जे विविध सहभागीदारांना इंटरनेट, व्हिसॅट आणि देशभरात पसरलेले सदस्य किंवा सब-ब्रोकर्सच्या माध्यमातून उपलब्ध होते. प्रश्न - ‘वायदे करार’ (फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट)चा अर्थ काय? हा एक दोन पक्षांतर्गत विहित प्रमाणातील आणि निश्चित गुणवत्तेच्या कमॉडिटीजसाठी भविष्यातील ठरावीक कालावधीसाठी व (करार करतेवेळी मान्य केलेल्या) ठरलेल्या किमतीवर होणारा करार आहे. असे व्यवहार हे मुख्यत: सुनियमित कमॉडिटी एक्स्चेंजेसवरच केले जातात. प्रश्न- स्पॉट मार्केट आणि फ्युचर्स मार्केटमधील फरक काय? प्रश्न - हेजिंगचा अर्थ काय? प्रत्यक्ष बाजारपेठेच्या विपरीत फ्युचर्स व ऑप्शन्स मार्केटमध्ये घेतल्या जाणार्या सौदा स्थितीला ‘हेजिंग’ म्हटले जाते. असे केल्याने दरातील अतार्किक फेरबदलांमुळे संभवणार्या जोखमीपासून संरक्षण प्राप्त होते. अशी पद्धत सुरू करण्याचा हेतू एका बाजारपेठेत होणार्या नुकसानीला अन्य बाजारपेठेच्या माध्यमातून भरून काढले जाण्याची मुभा मिळावी असा आहे. prasadkerkar73@gmail.com |
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा