पुढील काळातील ‘हायब्रीड’ मोटारी महागड्या इंधन समस्येवर पर्याय
पुढील काळातील ‘हायब्रीड’ मोटारी
महागड्या इंधन समस्येवर पर्याय
Published on 13 Jan-2012 KIYAMA
इंधनाच्या किमती एकीकडे गगनाला भिडत असताना कच्च्या तेलाचा साठाही जगात पुरेसा उपलब्ध नाही. अशा वेळी या इंधनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरू झाले आहेत. पर्यायी इंधन शोधत असताना सौरऊर्जा व पवनऊर्जा हे दोन पर्याय प्रामुख्याने पुढे आले. हे पर्याय काही प्रमाणात पर्याय ठरू शकणार असले तरी मोटार चालवण्यासाठी हे योग्य ठरणारे नाहीत. म्हणून मोटारींना योग्य इंधन कोणते, असा विचार जगात सुरू झाला.
सीएनजीवरील वाहने हा एक उत्तम पर्याय ठरला असला तरी त्यात अनेक अडचणी असल्याचे आढळले आहे. सीएनजी हा पूर्णपणे शंभर टक्के पर्याय खनिज तेलाला ठरू शकत नाही हे सिद्ध झाल्याने जगातील संशोधकांसमोर नवीन पर्याय शोधणे हे मोठे आव्हान उभे राहिले. यातूनच हायब्रीड मोटारींचा पर्याय आला आहे.
हायब्रीड मोटारी या बॅटरी व सीएनजी अशा दोन्हींवर चालवल्या जातात आणि पेट्रोल, डिझेलवर चालणार्या गाड्यांएवढी त्यांची क्षमता असते असे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात हायब्रीड गाड्या याच योग्य पर्याय ठरणार आहेत. जगातली पहिली अशा दोन्ही इंधनांचे मिर्शण करून चालवलेली पहिली मोटार 1901 मध्ये चालवण्यात आली. मात्र, याचे व्यापारी उत्पादन लगेचच करणे काही शक्य नव्हते. 1997 मध्ये टोयाटा या जपानी कंपनीने पहिल्यांदाच हायब्रीड मोटार व्यापारी तत्त्वावर निर्माण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार हे लक्षात येताच होंडाने अशा प्रकारातली मोटार बाजारात आणण्याचे ठरवले. अलीकडेच मुंबईत टाटा मोटार्सने अशा प्रकारच्या हायब्रीड बस बाजारात आणल्या.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या बेस्टने या बस आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या आणि देशातील पहिली हायब्रीड बस पहिल्यांदा धावली. मुंबईतला हा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता असून लवकरच बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढवणार आहे. नुसत्या इलेक्ट्रिकवर बस चालू शकते. मात्र, त्यांना वेग पकडता येत नाही. तसेच जास्त वजनही अशा प्रकारची बस वाहून नेऊ शकत नाही. अशा वेळी इलेक्ट्रिकवर चालणार्या बसला सीएनजीची जोड दिल्यास तिला चांगला वेग घेता येतो आणि मोठय़ा प्रमाणात ती वजनही वाहून नेऊ शकते.
दहा वर्षांतील संशेधनातून अनेक बदल
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर जी हायब्रीड कार तयार करण्यात आली होती. त्यात गेल्या दहा वर्षांत बरेच मोठय़ा प्रमाणात संशोधन करून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल व डिझेलवर चालणारे वाहन ज्या प्रकारे चालू शकते तसेच आता हायब्रीड वाहन चालू शकते. त्यामुळे महागड्या इंधनावर हायब्रीड मोटारी हा योग्य पर्याय असला तरी यात अजूनही बरेच संशोधन करण्याची गरज आहे. कारण या मोटारींच्या किमती अजूनही जास्त आहेत. या किमती कमी करण्यासाठी संशोधन झाल्यास खनिज तेलाला हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. अर्थात हा दिवस काही लांब नाही. केवळ पुढील दोन ते चार वर्षांतच हे शक्य आहे. त्यामुळे हायब्रीड मोटारी हाच एक पर्याय ठरणार आहे.
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "पुढील काळातील ‘हायब्रीड’ मोटारी महागड्या इंधन समस्येवर पर्याय"
टिप्पणी पोस्ट करा