संपादकीय पान--चिंतन--०७ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
नेल्सन मंडेलांवरील साहित्य संपदा
---------------------------
नेल्सन मंडेला यांच्यासारख्या जगप्रसिध्द व्यक्तीमत्वाचा ठाव घेणारी हजारो पुस्तके गेल्या दोन दशकात प्रकाशित झाली. यातील काही पुस्तकांचा जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. मंडेलांसारख्या एका क्रांतिकारकाचे आयुष्य कसे होते, त्याच्या जीवनातील घडामोडी कशा घडत गेल्या हे जाणून घेण्याची वाचकांची इच्छा यातील अनेक पुस्तकांनी पूर्ण केली आहे. यातील काही मोजक्या पुस्तकांचा आपण आढावा घेऊ. नेल्सन मंडेलांनी लॉँग वॉक टू फ्रिडम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील स्वातंत्र्यलढ्यापासून ते त्यांच्या वैयक्तीक जीवनातील घटना त्यांनी मांडल्या आहेत. २००८ साली याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि या पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडल्या. यातून मंडेला यांचे व्यक्तिमत्व आपल्याला जवळून पाहता येते. तसेच नेल्सन मंडेलांची भाषणे व त्यांचे लेख यावर खास पुस्तक प्रकाशित झाले आहे. सिलेक्टेड स्पिचिस अँड रायटिंंग ऑफ नेल्सन मंडेला या पुस्तकात मंडेलांची अध्यक्षपदी झालेल्या निवडीपासून ते विविध आन्तरराष्ट्रीय पातळीवर झालेली भाषणे यात वाचावयास मिळतात. त्याशिवाय त्यांनी तुरुंगात असताना लिहिलेले लेख तसेच अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक राष्ट्रप्रमुखांना लिहिलेली पत्रे वाचनिय आहेत. मडिबा ए टू झेड: मेनी फेसिस ऑफ नेल्सन मंडेला हे पुस्तक डॅनी स्कूच्शर या अमेरिकन पत्रकाराने लिहिले आहे. डॅनी हा लघुपटांची निर्मितीही करतो. त्याने मंडेलावर सहा लघुपट तयार केले होते. या पुस्तकात मंडेलांचा स्वभाव, त्याचे वागणे, कामाची पध्दत व एक राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेली कामे या सर्वांचे बारकाईने निरिक्षण करण्यात आले आहे. डॅनीने एक पत्रकार म्हणून दक्षिण आफ्रिकेचा स्वातंत्र्य लढा व मंडेला यांनाही अतिशय जवळून पाहिले होते. त्यामुळे अनेकांचे मत आहे की मंडेलांवरचे हे सर्वात उत्कृष्ट पुस्तक ठरावे. नेल्सन मंडेला यांच्यावर आणखी एक पत्रकार रिचर्ड स्टींगल याने एक पुस्तक लिहिले आहे. हे देखील पुस्तक एकेकाळी गाजले होते. मंडेला यांच्या व्यक्तीमत्वाचा लहान मुलांना परिचय व्हावा म्हणून एस.जी. मॅचीन याने हू इज नेल्सन मंडेला हे छोेटेखानी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक दहा वर्षाखालील मुले डोळ्यापुढे ठेवून लिहिले गेले आहे. तरुण पिढीला मंडेलांचा परिचय व्हावा यासाठी लिहिलेले हे पुस्तक अतिशय छान आहे. त्याचबरोबर १० लिडरशीप लेसन्स फॉम नेल्सन मंडेला हे एक पुस्तक आहे. यात मंडेलांचे दहा नेतृत्वगुण दाखवून त्यावर चर्चा केली आहे. तसेच हे दहा गुण वाचक आपल्यात कसे आत्मसात करु शकतो हे देखील दाखविण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे मंडेलांच्या नेतृत्वगुणांचे केलेले विश्लेषण ठरावे. यातून वाचकांना वेगळेच मंडेला समजतात. यात मंडेला यांनी कारावासात घालविलेले दिवस ते १९९५ साली उत्साहात भरविलेला फुटबॉल वर्ल्ड कप हे सर्व करीत असताना त्यांचे जे नेतृत्व कौशल्य दिसले ते या पुस्तकात मांडले आहेत. इव्हान फ्रेसर या नामवंत लेखकाने मंडेला हे त्यांच्यावर लिहिलेले पुस्तकही बरेच गाजले होते. अशा प्रकारे विविध पुस्तकातून आपल्याला मंडेलांचे दर्शन जवळून होते. यातून आपल्याला मंडेला यांचे व्यक्तीमत्व, त्यांचा स्वभाव, त्यांचे जीवन, त्यांचा लढा या सर्व बाबी जवळून समजतात. अशा प्रकारे जगातील नामवंत व्यक्तींवर शेकडो पुस्तके निघाली. तशीच मंडेला यांच्यावरही शेकडो नव्हे तर हजारो पुस्तके प्रकाशित झाली. यातून या क्रांतिकारकाचा परिचय जनतेला झाला आहे.
------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा