संपादकीय पान--अग्रलेख--१३ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
शास्त्रीय दृष्टीकोन आवश्यक
-----------------------
समलैंगिकता हा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा गुन्हा ठरविल्याने सनातनवाद्यांचे फावणार आहे. परंपरा आपणच जपत आहोत आणि हे आधुनिक जगाचे पुरस्कर्ते हे सुधारणांच्या नावाखाली, विज्ञानाची साक्ष देत आपली संस्कृती कशी बुडवित आहेत याची नेहमीच ओढ सनातनवाद्यांना म्हणजेच प्रतिगामी शक्तींना लागलेली असते. आता या निकालाने या शक्तींना बळ मिळणार आहे, हा सर्वात या निकालाची दुदैवी भाग म्हटला पाहिजे. यापूर्वी २००९ साली दिल्ली उच्च न्यायालयाने परस्परांच्या परवानगीने समलिंगी संबंध ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या निकालाच्या आधारावर अनेक समलिंगी संबंध ठेवणार्यांनी लग्ने केली होती किंवा ते एकत्रपणे राहात होते. आता मात्र नव्या निकालानुसार त्यांचे संबंध हा कायद्याने गुन्हा ठरेल. आपल्याकडे यासंबंधीचा कायदा हा ब्रिटीशांनी दीडशे वर्षापूर्वी केलेला आहे आणि सध्याच्या स्थितीत तो कालबाह्य ठरला आहे. समलिंगी संबंध ठेवणार्यांना शिक्षेची तरतुद करणे ही मध्ययुगीन मानसिकता झाली. जो कायदा आपल्याकडे ब्रिटनने केला त्याने मात्र हा कायदा त्यांच्या देशात कधीच बदलला आहे आणि आपण मात्र हा जुना कायदा अजून बाळगून आहोत. त्यामुळे याबाबत सरकारनेच यासंबंधीचा कायदा बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण पूर्वी ब्रिटीशांनी केलेला या कायद्याला बायबलचा आधार होता. परंतु बदलत्या परिस्थितीचा आढावा घेत ब्रिटनसह अनेक युरोपीयन देशांनी या कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आता आपल्यालाही जुनी मानसिकता बदलत असताना या कायद्यात बदल करावा लागणार आहे. आपल्याकडे एकूणच लैगिंकता या विषयावर पडद्याआड बोलण्याचा प्रघात आहे. याबाबत खुलेपणा नसल्याने यातून अनेक गैरसमज व चुकीच्या समजुती निर्माण होतात. लैंगिकता ही पुरुष-स्त्रीची वैध मानली जाते तसेच समान लिंगाच्या मानवाने ठेवलेले संबंध हे देखील योग्य आहेत. अशा प्रकारे संबंध ठेवण्यात काहीही गैर नाही. यात शास्त्रीय दृष्टीकोनाचा विचार केल्यासही चुकीचे काहीच नाही. अशा प्रकारच्या वैद्यानीक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवूनच युरोप, अमेरिकेसारख्या देशांनी समलिंगी संबंधांना परवानगी दिली. त्यामुळे आपल्याकडेही यासंबंधी वैद्यानिक दृष्टीकोनच डोळ्यापुढे ठेवून हा नवीन कायदा केला जावा. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना वैद्यानिक दृष्टीकोन न बाळगता पारंपारिक कायद्याचा आधार घेत निकाल दिला आहे ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे. त्यामुळे आता घटनेतील ३७७ वे कलम रद्द ठरवून सरकारने समलिंगी संबंध ठेवणार्यांना न्याय दिला पाहिजे. या विरुध्द दाद मागणार्या नाझ फाऊंडेशनने आता या निकालावर पुन्हा एकदा फेरविचार करण्यासाठी अर्ज करण्याचेे ठरविले आहे. त्यामुळे या अर्जावर पुन्हा सर्वोच्च न्यायालय कोणता निकाल देते ते पहावे लागेल. चार वर्षांपूर्वी आपल्याकडे दिल्ली उच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना मान्यता दिल्यावर आपल्याकडील समलिंगी संबंध ठेवणार्यांना एक प्रकारे मानसिक पाठबळ लाभले होते. आपल्याकडे लैंगिकतेविषयी असलेल्या अपसमजुतीतून तसेच गैरसमजुतीतून अनेक लोक दडपणाखाली वावरत असतात. यासंबंधी आपण खुला वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याची आवश्कता आहे. यातून अनेक गैरसमजुतींना आवर बसेल आणि समाजात एक खुलेपणा येऊ शकेल. युरोप व अमेरिकेत पोपच्या विरोधांना डावलून अशा प्रकारचे कायदे झाले आहेत. हॉलिवूडमधील अनेक अभिनेते व अभिनेत्री खुले आमपणे आपण समलिंगी संबंध ठेवित असल्याचे मान्य करतात. आपल्याकडे कायद्याने याला संमंती मिळताच तेवढा खुलेपणा आपल्याकडेही येईल. गेल्या चार वर्षात त्यादृष्टीने पावले देखील पडली होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पुन्हा आपण मागे रेटलो गेले आहोत. गेल्या दशकात आपल्याकडे झपाट्याने बदल झाले आहेत. यातील अनेक महत्वाचे बदल हे लैंगिक सुखाबाबत झाले आहेत. आपण एकीकडे अमेरिकेकडील विकसीत देशांकडे आदर्श म्हणून पाहतो तर दुसरीकडे आपल्याकडील बुरसटलेले विचार काही टाकून द्यावयास तयार नाही. शिक्षणाचा वाढता प्रसार, आधुनिक जीवनपध्दती, आर्थिक समृध्दी तसेच वैज्ञानिक प्रगती यामुळे आपण झपाट्याने बदलत चाललो आहोत. लैंगिक सुखाच्या कल्पनाही झपाट्याने बदलत चालल्या आहेत. सध्याच्या आधुनिक काळात लग्न या संस्थेविषयी देखील नव्याने विचार सुरु झाला आहे. पूर्वीच्या काळात एकदा लग्न झाले की आयुष्यभर त्या जोडप्याने परस्परांची साथ मान्य नसली तरी समाजाच्या दडपणाखाली निभावायची अशी परिस्थिती होती. आता गेल्या काही वर्षात स्त्री जशी स्वत:च्या पायावर उभी राहू लागली तसा तिच्यात बदल झाला. जर नवर्याशी जुळत नसेल, नवरा तिला छळत असले किंवा अन्य कोणत्याही कारणाने तिचे जर पटत नसेल तर ती घटस्फोट घेण्यास तयार होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. अर्थात याचा अतिरेकही होऊ लागला आहे. परंतु पूर्वी याविषयी समाजात जो साचलेपणा होता तो सध्या तरी दूर झाला आहे. समलिंगी संबंध ठेवणार्यांबाबतही असेच झाले आहे. आपण या प्रश्नाकडे पाहाताना शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. जुने ते प्रत्येक चांगले असे न समजता खुलेपणाने काही बाबी स्वीकारण्याची वेळ आता आली आहे.
--------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा