-->
संपादकीय पान--चिंतन-- १९ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
साईबाबांच्या नावाने धंदा
-------------------------
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या देवळात आता काकड आरती, दुपारच्या व संध्याकाळच्या आरतीसाठी भक्तींना पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी २०१० पासून शनिवार व रविवारी आरतीसाठी प्रवेश फी आकारण्यास सुरुवात झाली होती. अशा प्रकारे र्साभक्तांच्या खिशावर डल्ला मारण्यास साई संस्थानाने सुरुवात केली आहे. साईबाबांच्या नावाशाली अशा प्रकारे धंदा करण्यास कोणाचाही विरोध राहिल. साईबाबांवर लोकांची श्रद्धा आहे तिचा अशा प्रकारे लिलाव करणे कुणत्याही साई भक्ताला आवडणारे नाही. परंतु त्याविरुध्द आवाज उठविण्यास कुणी तयार नाही ही खेदजनक बाब आहे. यापूर्वी देखील साईबाबांच्या पादुका अमेरिकेला नेऊन त्यातून काही करोडो रुपये कमविण्याचा घाट याच ट्रस्टींनी घातला होता. परंतु लोकांनी याला केलेला विरोध पाहता हा प्रस्ताव बारगळला. साीईबाबांचे जे भक्त आहेत त्यांची जर श्रध्दा आहे तर त्यांनी अमेरिकेतून शिर्डीला यावे. त्यासाठी पादुका अमेरिकेला नेण्याची काय गरज? असा प्रश्‍न त्यावेळी निर्माण झाला होता आणि तो रास्त होता.
साईबाबांचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु त्याचे उगमस्थान कुठे आहे हे काही समजलेले नाही. परंतु साईबाबा हे खरोखरीच एक समाजसेवक होते. त्यांनी त्याकाळी आपल्या हातून जे काही लोकांचे भले करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. साईबाबांचे उगमस्थान कुठून आहे याचा कुणालाच पत्ता नाही. तेे कोणत्या धर्माचे आहेत हे कुणी ठोसपणे सांगू शकत नाही. काहींच्या मते ते हिंदु होते तर काहींच्या मते ते मुस्लिम. कुणी म्हणतात साईबाबा हे १८५७च्या बंडात सहभागी होते. ते या पहिल्या स्वातंत्र्ययुध्दातील स्वातंत्र्यसेनानी होते. मात्र याबाबतचे पुरावे काहीच उपलब्ध नाहीत. त्यांच्याबाबत त्यामुळे आख्यायिकाच जास्त आहेत. परंतु ते एक सर्वमान्य समाजसेवक होते हे वास्तव आपण सगळेच जाणतो. त्यांची ओळख आपल्याला आहे ती, ते शिर्डी येथे स्थायिक झाल्यावरची आणि त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेत आपल्याला वाहून घेतले. सर्वधर्मसमभाव त्यांनी खर्‍या अर्थाने पाळला होता. त्यामुळेच आज सर्वधर्मिय शिर्डीला भेट देतात. साईबाबा सर्व धर्मीयांना आपलेसे वाटतात. त्याकाळी साईबाबांनी चमत्कार केले अशा आख्यायिका आहेत. हे चमत्कार खरेच होते की त्यामागे काही आख्यायिका आहेत हे आपण ठोसपणे सांगू शकत नाही. मात्र एक बाब सत्य आहे की, साईबाबा हे सर्वमान्य असे एक व्यक्तीमत्व होते. त्यांनी रंजल्यागांजल्यांची सेवा केली. अशा या महान व्यक्तीमत्वाच्या नावाने धंदा करणे म्हणजे साईंच्या नावाचा दुरुउपयोग करण्यासारखेच आहे. सध्या साईबाबा संस्थांनाकडे करोडो रुपये भक्तांच्या देणग्यातून जमा होत असतात. भक्तमंडळी केवळ पैशाच्या रुपाने नाही तर विविध मार्गाने संस्थांनाला करोडो रुपये देत असतात. या पैशातून संस्थान अनेक समाजउपयोगी कामे करीत देखील असते. रुग्णालये, महाविद्यालये उभारुन साईबाबा संस्थानाने समाजाच्या उपयोगी पडतील अशी कामेही केली आहेत. यात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक बातम्याही येत असतात. पंरतु सध्या येणार्‍या देणग्यातून साईबाबा संस्थानाचे पोट काही भरत नाही असचे वाटते. कारण भक्तांच्या भावीकतेचा फायदा उठवून जेवढा जास्तीत जास्त पैसा मिळेल तेवढा कमविण्याकडे संस्थानाचा कल आहे. सध्या आरतीसाठी पैसे आकारण्याचा घेतलेला हा निर्णयही त्याच ह़व्यासापोटी घेण्यात आलेला आहे. साईबाबा संस्थांनाच्या या निर्णयाविरुध्द उभे राहाण्यासाठी साईभक्तांनी आता दंड थोपटावेत. साईबाबांच्या दरबारी जाण्यासाठी किंवा आरतीला जाण्यासाठी एक पैसादेखील आकारता कामा नये अशी ठाम भूमिका घेऊन संस्थानाचा हा निर्णय हाणून पाडावा, ही साईभक्तांना आमची विनंती.
---------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel