संपादकीय पान--चिंतन--१३ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
म्हैसूरचा शेवटचा राजपुत्र काळाच्या पडद्याआड
--------------------------------
देश स्वातंत्र्य झाल्यावर वल्लभभाई पटेलांनी सर्व संस्थाने खालसा केली आणि देश एकसंघ केला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी या संस्थांनाचे तनखे बंद केले आणि त्यांची त्यानंतर खर्या अर्थाने आर्थिक नाकेबंदी झाली. असे असली तरीही अनेक संस्थांने ही श्रीमंत म्हणून ओळखली गेली होती. या संस्थांनांचे वारसदार हे संस्थान खालसा झाले तरीही एक संस्थानिक म्हणून वावरत असत. अर्थात जी संस्थाने श्रीमंत होती त्यांना हे शक्य होते. यातील म्हैसूर संस्थान हे एक मोठे व श्रीमंत संस्थान म्हणून ओळखले जाई. या संस्थानांची आठवण होण्याचे कारण म्हणजे म्हैसूर संस्थानचा शेवटचा राजपुत्र म्हणून ओळखलेले गेलेले श्रीकांतदत्ता नरसिमहाराज वोडेयार यांचे नुकतेच झालेले निधन. म्हैसूरचे शेवटचे राजे जयचंद्रमहाराज वोडेयार यांचे ते एकमेव पुत्र होते. दोन दिवसांपूर्वी वयाच्या ६०व्या वर्षी निधन पावलेले श्रीकांतदत्ता नरसिमहाराज वोडेयार हे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व होते. क्रिकेटवीर, व्यवसायिक, फॅशन डिझायनर, क्रिकेटचे उत्तम प्रशासक आणि राजकारणी असे त्यांचे व्यक्तीमत्व केवळ म्हैसूकरांना माहित नव्हते तर ते देशात अनेकांना परिचित होते. उच्चशिक्षित असलेले वोडेयार यांनी पदवीला राजकीय विज्ञान या विषयात सुवर्णपदक पटकाविले होते. कॉँग्रेसच्या तिकिटावर ते चार वेळा म्हैसूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. तर दोन वेळा ते निवडणूक हरले होते. ते कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले असले तरीही त्यांची राजकीय कारर्किद कधीच गाजली नाही किंवा फुलली नाही. ते फक्त खसादार म्हणूनच वावरले. म्हैसूरच्या जनतेने त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता त्यांना मोठ्या प्रमाणात मानीत असे. वोडेयार राजघराणे हे सुधारमावादी म्हणून नेहमीच ओळखले गेले होते. त्यांनी नेहमीच सामाजिक न्याय व विकासासाठी जनतेत काम केल्याने त्यांच्याविषयी नेहमीच आदर होता. त्यांना म्हैसूरचा राजपुत्र म्हणून सर्व जनता ओळखीत असे. परंतु त्यांनी आपल्या सत्तेचा कधीच गर्व केला नाही. पारंपारिक काही दिवस वगळता ते कधीही आपल्या सिंहासनावर बसले नाहीत हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय ठरले.२००४ साली त्यांनी लोकसभेसाठी अर्ज भरला त्यावेळी त्यांची मालमत्ता १५२२ कोटी रुपयांची दाखविली होती. अलीकडे त्यांच्या बहिणी व त्यांच्यात संपत्तीवरुन वाद निर्माण झाले होते. म्हैसूर व बंगलोरच्या राजमहालावर आपला दावा दाखवून सरकारच्या निर्णयाला आव्हानही दिले होते. खरे तर त्यांच्याकडे ऐवढी संपत्ती होती की, त्यांना महालात बसून ऐशोआराम करता आला असता. मात्र त्यांनी असे कधी केले नाही. ते एक यशस्वी उद्योजक म्हणून म्हैसूरकरांना परिचित होते. अलीकडेच त्यांनी काही नवीन हॉटेल्स उभारण्याचा, नवीन खासगी विद्यापीठ स्थापण्याचा, खासगी विमानसेवा सुरु करण्याच मनोदय व्यक्त केला होता. म्हैसूर सिल्कला जागतिक दर्जा मिळावा यासाठी त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्थान निर्माण केले. वोडेयार हे क्रिकेटप्रेमी होते. स्वत: ते उत्तम क्रिकेट खेळत असत. तसेच ते क्रिकेटच्या संघटनांचे ते एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जायचे. बरीच वर्षे ते कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. म्हैसूरवर खर्या अर्थाने प्रेम करणार्या या राजपुत्राने म्हैसूरच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. असा हा राजपुत्र कालाच्या पडद्याआड गेला आहे.
-----------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा