-->
पंतप्रधान म्हणतात..

पंतप्रधान म्हणतात..

संपादकीय पान मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
पंतप्रधान म्हणतात..
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फारसे बोलत नाहीत. ७ रेस कोर्स रोडवर रहायला जाण्यापूर्वी ते कॉंग्रेसला लक्ष्य करुन नेहमी देशहितासाठी जनतेशी संवाद साधत. मात्र, त्यांचा हा संवाद गेल्या अडीच वर्षांत आता कमी झाला आहे. मात्र, उरी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी रविवारी दोन वेळा संवाद साधला. पहिला संवाद होता तो रेडिओवरील त्यांच्या ङ्गमन की बातफ या भाषणाद्वारे आणि दुसरा संवाद होता त्यांनी केरळमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले कार्यकर्त्यांसमोरील भाषण. यातील ङ्गमन की बातफमध्ये त्यांनी उरी प्रश्‍नावर विधान केले. पाकिस्तानसंबंधी त्यांची जी निवडणूकपूर्व भूमिका होती व आत्ताचे त्यांचे विधान यात जमीन-अस्मानचा फारक आहे. पूर्वी ते पाकिस्तानला धडा शिकविण्याची भाषा करीत, तर आता या हल्ल्यातील दोषींना शिक्षा केली जाईल, असे सावध विधान ते करतात. सत्तेत असताना व विरोधात असताना कशी भाषा बदलते, हे यावरुन स्पष्ट जाणवते. उरी हल्ल्यानंतर जनतेमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. मोदींच्या निवडणूकपूर्व भाषणांप्रमाणे गेल्यास त्यांनी खरे तर आता पाकिस्तानवर हल्ला करुन त्यांना धडा शिकविला पाहिजे. मात्र, आता ते हल्ला करण्याची भाषा पूर्णपणे टाळून चर्चेद्वारे प्रश्‍न सोडविता येतात, असे नमूद करतात. एकूणच, त्यांची भूमिका ही मवाळ झाली आहे. दोषींना शिक्षा केली जाईल, म्हणजे नेमके पंतप्रधानांना काय म्हणावयाचे आहे, ते त्यांनी स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. कारण, यात दोषी व पडद्यामागचा सूत्रधार पाकिस्तानच आहे. दोषींना शिक्षा करणे म्हणजे पाकिस्तानला शिक्षा करणे, असाच त्याचा अर्थ अभिप्रेत आहे काय, असा प्रश्‍न पडतो. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात मुस्लिमांना आपलेसे करा, असे आवाहन केले आहे. म्हणजे, याचा अर्थ स्पष्ट आहे की, आजवर भाजप या राष्ट्रीय पक्षाच्या मनात मुस्लिमांच्या बाबतीत अडी आहे, हे त्यांनी स्पष्टपणे कबूलच केले. आपल्यासारख्या लोकशाही व सर्वधर्मसमभाव याचा पाया असलेल्या देशातील पंतप्रधानांनी असे विधान करावे, ही बाब लाजिरवाणी आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आजवर भाजपने जातीयतेचे राजकारण करुन मते आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम यांच्यात जातीय संघर्ष पेटवायचा व हिंदूंची मते एकत्रित करुन आपण हिंदूंचे हितरक्षक आहोत असे सांगत सत्ता मिळवायची हे राजकारण भाजपने केले आहे. हिंदूंनादेखील यामागचे राजकारण लक्षात आले नाही, ही दुर्दैवी बाब ठरावी. आता उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात हे राजकारण चालणार नाही, असे दिसू लागल्यावर पंतप्रधान मोदींनी मुस्लिमांना आपलेसे करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूक भाजपला आता कठीण जाणार आहे, असेच दिसते. त्यामुळे भाजपने आपली भूमिका बदलण्याचे ठरविलेले दिसते.

0 Response to "पंतप्रधान म्हणतात.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel