लातूर आता तृप्त
संपादकीय पान बुधवार दि. २८ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लातूर आता तृप्त
यंदाच्या दुष्काळात सर्वात जास्त होरपळलेल्या लातूरमध्ये यंदा भरपूर पाऊस झाल्याने लातूरची सर्व धरणे आता पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे लातूर आणि लातूरकरांना पुढची किमान पाच वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष भोगावे लागणार नाही, असा विश्वास प्रशासनाला वाटतो. लातूर आता खर्र्या अर्थाने तृप्त झाले आहे, असे म्हणता येईल. यंदाच्या दुष्काळात लातूरला मिरजेहून रेल्वेने लाखो लीटर पाणी आणावे लागले होते. परंतु, यंदा पाऊस चांगला झाल्याने लातुरात पूरसदृश्य स्थिती होती. येथील मांजरा धरण ही लातूरची खर्या अर्थाने जीवनवाहिनी आहे. येथून दररोज शहराला व आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा होतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता नऊ हजार दशलक्ष क्युबिक फूट एवढी आहे. आता हे धरण ९७ टक्के भरले असून, यातील पाणी बाहेर सोडण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. लातूर शहराची रोजची पाण्याची गरज ६० दशलक्ष लीटर एवढी आहे. गेल्या उन्हाळ्यात हे धरण १०० टक्के आटले होते. त्याचा कधीच तळ पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे लातूरकरांचे तोंडचे पाणी पळाले होते. येथील आणखी एक धरण लोअर तेरणा हेदेखील यंदा पूर्ण भरले आहे. यंदा चांगला पाऊस पडल्याने ही धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे लातूरचा पाणीप्रश्न सध्यातरी सुटला आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे लातूरकरांनी सध्या तरी सुसस्कारा सोडला असला, तरी लातूरवर गेल्या वर्षीची परिस्थिती का आली व तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आत्तापासून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. लातूरची भूगर्भातील पाण्याची पातळी बरीच खाली गेली होती. आता ही पातळी यंदाच्या पावसामुळे वाढली असण्याची शक्यता आहे. मात्र, पाणी जपून वापरण्याची सवय लावली पाहिजे. तरच भविष्यात लातूर असेच तृप्त राहील.

0 Response to "लातूर आता तृप्त"
टिप्पणी पोस्ट करा