सुखकर्ता, दुख:हर्ता...
बुधवार दि. 04 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
सुखकर्ता, दुख:हर्ता...
दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन काल झाले आहे. आता पुढे पाच दिवसांच्या व नंतर दहा दिवसांच्या गणपतींना निरोप दिला जाईल. काल झालेले बहुतांशी विसर्ज हे शांततेत पार पडले आहे. अर्थात दीड दिवसांचे गणपती हे प्रामुख्याने घरगुतीच असतात त्यामुळे फारसा तणाव नसतो. सार्जनिक गणपतींच्या विसर्जनाच्या वेळी अनेकदा अनावश्यक वाद निर्माण करुन तणाव निर्माण होत असतात. आपल्याकडे प्रामुख्याने महारष्ट्रात गणपतीच्या सणाला विशेष महत्व आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे लोकमान्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव येथेच सुरु केले व लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरण्यासाठी एक निमित्त करुन दिले. वरवर दिसणारा हा उत्सव असला तरी त्यामागची लोकमान्यांची प्रेरणा फार महत्वाची होती. श्रावणात सण सुरु झाले की सर्वच वातावरण एक प्रकारचे मंतरलेले असते. निर्सगाच्या हिरवेगारपणामुळे त्यात आणखीनच भर पडते. गणेशोत्सवाचे आपल्याकडे आता खूपच विभत्सिकरण झाले आहे. एकतर त्यात बाजारीपणा आला आहे. तसेच आपण गणपतीच्या मूर्ती देखील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या करण्यावर भर दिल्याने पुन्हा एकदा आपम निसर्गाच्या विरोधात काम करीत आहोत. गेल्या वर्षी डॉल्बीच्या मुद्यावर मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यंदाही न्यायालयाचा अवमान होईल असे काही करणे योग्य ठरणारे नाही. गणेशोत्सव साजरा करणे ही आपली संस्कृती आहे परंतु आपण ज्या प्रकारे तो साजरा करीत आहोत ती आपली निश्चितच संस्कृती नाही. त्यात सुधारणा करण्यासाठी आता समाजातील प्रमुख व्यक्तींनी पुढे आले पाहिजे. आपल्याकडे जनता परिवर्तनाचा स्वीकार करते. अशी परिवर्तने ही धीम्या गतीने असतात, परंतु त्यात समाजसेवकांनी ठरवून काम केल्यास हे बदल निश्चतच आपल्याला दिसतात. हे बदल करण्याचे माध्यम काय असू शकेल वा तो लोकांच्या कलाने जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा मार्ग कोणता यावर बरेच काही अवलंबून असते. ज्या काही वाईट रूढी-परंपरा आहेत, त्यात बदलाची चिन्हे दिसू लागतात व हा बदल जीवनोपयोगी असेल तर लोक त्या बदलाकडे शिक्षीत समाजही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. आपल्याकडे मोठ्या संख्येने असलेल्या अढळ श्रद्धाळू समाजापुढे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही कल्पना जेव्हा मांडली गेली व त्यासाठी शाडू मातीच्या गणेशबाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा विचार पुढे येऊ लागला. तेव्हा ही बाब समाजमनाविरुद्ध होती आणि गणेशभक्तांना पटणारी नव्हती. त्या कल्पनेला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून प्रचंड विरोध झाला. शाडू माती बाप्पाबरोबरच गणेश मूर्तीदानाला कडाडून विरोध केला गेला. विरोधाची धार लक्षात घेता हा विचार म्हणा की परिवर्तनाचे हे पाऊल जागीच थांबते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली होती. मात्र गेल्या दशकभरात ज्या वेगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार समाजाने स्वीकारला, अंगीकारला, एवढेच काय, प्रत्यक्ष कृतीत उतरवला तो पाहता परिवर्तन लोकांच्या पचनी पडले. अर्थात अजूनही हे सर्वत्र मान्य झालेले नाही. किंवा जेवढे गणपती आपल्याकडे आहेत त्याचा विचार करता प्रमाणही तसे कमीच भरावे परंतु हळूहळू हे मान्य झाले, ही त्यातली सकारात्मक बाब. देशभर विविध ठिकाणी लोकांच्या पुढाकाराने भरणार्या शाडू मातीच्या कार्यशाळा. आपल्याकडे कोणत्याही कार्याचा शुभारंभ आधी वंदू तूज मोरयाने होतो. या पार्श्वभूमीवर गणपतीबाप्पाची मूर्ती शाडू मातीची असावी की पीओपीची हा मुद्दा श्रद्धेच्या आड येणारा ठरला असता. परंतु पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यांशी जेव्हा ही बाब जोडली गेली तेव्हा गणेशभक्तांनी बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवली. परिवर्तन हे जगाच्या कल्याणासाठी, समाजाच्या भल्यासाठी व भावी पिढीच्या आरोग्यासाठी आहे, हे पटल्यानंतर परिवर्तनाचा वेग वाढत चालला आहे. शाडू माती तसेच पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती यांच्या दरामध्ये मोठी तफावत आहे. या एका कारणामुळे सुरुवातीला गणेशभक्तांकडून पीओपीच्या मूर्तीला मागणी असायची. त्याशिवाय या मूर्तीची उंची, सुबकता, आकर्षकपणा या बाबींनाही अग्रकम दिला जात असे. पण जसे पर्यावरणपूरकतेचा बदल रुजत गेला तशी शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. रायगड जिल्ह्यातही हे लोण पोहोचले आहे. रद्दीच्या पेरपासून गणेश मूर्ती बनविण्याची एक चळवळ आता आकार घेत आहे. असा प्रकारच्या चळवळींनी भविष्यात चांगला वेग घेतल्यास एक चांगले चित्र पहावयास मिळेल. त्याचबरोबर सध्या गणपतीपुढे जे विभत्स डान्स चालातात किंवा जी गाणी लावली जातात त्याला आळा घालण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. हळूहळू काळाच्या ओघात आपण हे देखील थांबवू शकतो. यातून गणेशोत्सवाचे एक चांगले रुप जे लोकमान्यांना अभिप्रेत आहे ते येऊ शकते. अर्थात ही काही झपाट्याने होणारी प्रक्रिया नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पनाही आपल्याकडे काही गावात राबविली जाते. मात्र त्याला व्यापक स्वरुप येण्याची आवश्यकता आहे.
-------------------------------------------------

0 Response to "सुखकर्ता, दुख:हर्ता..."
टिप्पणी पोस्ट करा