संपादकीय पान--चिंतन--10 डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
शहरातील बेघर वाढले; ग्रामीण भागातले कमी झाले
------------------------------
स्वांतत्र्यानंतर ६५ वर्षे लोटली असली तरी आपण आपल्या नागरिकांना अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक बाबींची पूर्तता करु शकलो नाही. देशात सत्तेत असलेल्या कॉँग्रेसचे हे एक मोठे अपयश आहे. अन्नासाठी आपण कायदा केला. असे आपण अनेक कायदे केले. शिक्षणाच्या हक्काचाही कायदा केला पण त्याची अंमलबजावणी होते का? हा प्रश्न आहे. अन्न, वस्त्र व त्याच्या जोडीला निवारा हा एक मोठा प्रश्न आपल्याल भेडसावितो आहे. पण त्याबाबत सरकार गांभीर्याने काही करीत नाही. अलीकडच्या जनगणणेनुसार, आपल्याकडे शहरातील बेघरांची संख्या वाढली आहे. मात्र ग्रामीण भागातील बेघर कमी झाले आहेत. शहरातील बेघर वाढले आहेत म्हणजे ते ग्रामीण भागातून स्थलांतरीत झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे बेघरांची संख्या कायम आहे. फक्त ग्रामीण भागातील बेघर कमी झाले म्हणजे ग्रामीण भागातले बेघर हे शहरात आले आहेत. ग्रामीण भागातील ६६,००० घरांतील लोक पूर्वी जे बेघर होते त्यांना आता निवारा लाभला आहे. तर शहरातील ६९,००० घरातील लोक बेघर म्हणून वाढले आहेत. शहरात जे बेघर आहेत त्यांच्यासाठी निवासस्थान हे रेल्वे स्थानक, प्रार्थनास्थळे, मंडप, जीने, फ्लायओव्हर, पाईपमध्ये किंवा थेट रस्त्यावर राहातात.
विविध राज्यांचा विचार करता राजस्थानमध्ये सर्वाधिक लोक हे बेघर आहेत. हरियाणा व पश्चिम बंगाल या राज्यातील बेघरांची संख्या कमी होण्यात यश मिळाले आहे. देशातील एकूण चार राज्यात एकूण बेघरांच्या ५० टक्के लोक राहातात. ही चार राज्ये म्हणजे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश ही आहेत. तसेच चंदीगढ व दिल्ली या दोन शहरातही बेघरांची संख्या मोठी आहे. सर्वात कमी बेघर असलेल्या राज्यात मिझोराम, अंदमान, मेघालय, आसाम व केरळ यांचा समावेश आहे. एकूण असलेल्या बेघरांमधील मुलांची संख्या मात्र कमी झाली आहे. तर बेघर मुलांची ग्रामीण भागातील लोकसंख्याही झपाट्याने घटली आहे. बेघरांतील साक्षरता मात्र गेल्या काही वर्षात वाढली आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे अनेक स्वयंसेवी संघटना बेघरांना साक्षर करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कामामुळे आपल्याला काही सकारात्मक परिणाम दिसले आहेत. २००१ साली बेघरांमधील साक्षरता २७ टक्के होती. ती दहा वर्षानंतर वाढून ३९ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षात आपल्या देशातील साक्षरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरासरी आपल्याकडे ७३ टक्के साक्षरता झाली आहे. याचा परिणाम म्हणून बेघरांची साक्षरताही वाढली आहे. गेल्या दहा वर्षात देशाच्या एकूण लोकसंख्येची साक्षरता जेवढी झाली त्यापेक्षा जास्त प्रमाणात साक्षरता बेघरांची झाली आहे. म्हणजे बेघरांना साक्षरतेची जाणीव जास्त झाली आहे. त्याचबरोबर बेघर लोकांचा काम करण्याकडेही जास्त कल असल्याचे आढळले आहे. सर्वसाधारणपणे ४० टक्के लोक हे काम करण्यास उत्सुक असतात. तर ५२ टक्के बेघर लोक हे कामसाठी उत्सुक आहेत. म्हणजे या बेघरांना काम करुन आपली परिस्थिती सुधारावी असे वाटते. आपल्या देशातील नागरिकाला घर नसणे हा आपल्यावरील मोठा शाप समजला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला बेघरांसाठी थंडीच्या दिवसात निवासाची सोय करण्यास बजावले आहे. त्यानुसार अनेक शहरात सरकारने तात्पुरते निवारे बांधले आहेत. परंतु ही हंगामी स्थिती झाली आणि न्यायालयाने आदेश दिल्यावर सरकार व्यवस्था करते हे चुकीचे आहे. देशात कुणीही बेघर असता कामा नये, असे ठरवून सरकारची त्यादृष्टीने पावले पडली पाहिजेत.
--------------------------------
-------------------------------------
शहरातील बेघर वाढले; ग्रामीण भागातले कमी झाले
------------------------------
स्वांतत्र्यानंतर ६५ वर्षे लोटली असली तरी आपण आपल्या नागरिकांना अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक बाबींची पूर्तता करु शकलो नाही. देशात सत्तेत असलेल्या कॉँग्रेसचे हे एक मोठे अपयश आहे. अन्नासाठी आपण कायदा केला. असे आपण अनेक कायदे केले. शिक्षणाच्या हक्काचाही कायदा केला पण त्याची अंमलबजावणी होते का? हा प्रश्न आहे. अन्न, वस्त्र व त्याच्या जोडीला निवारा हा एक मोठा प्रश्न आपल्याल भेडसावितो आहे. पण त्याबाबत सरकार गांभीर्याने काही करीत नाही. अलीकडच्या जनगणणेनुसार, आपल्याकडे शहरातील बेघरांची संख्या वाढली आहे. मात्र ग्रामीण भागातील बेघर कमी झाले आहेत. शहरातील बेघर वाढले आहेत म्हणजे ते ग्रामीण भागातून स्थलांतरीत झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे बेघरांची संख्या कायम आहे. फक्त ग्रामीण भागातील बेघर कमी झाले म्हणजे ग्रामीण भागातले बेघर हे शहरात आले आहेत. ग्रामीण भागातील ६६,००० घरांतील लोक पूर्वी जे बेघर होते त्यांना आता निवारा लाभला आहे. तर शहरातील ६९,००० घरातील लोक बेघर म्हणून वाढले आहेत. शहरात जे बेघर आहेत त्यांच्यासाठी निवासस्थान हे रेल्वे स्थानक, प्रार्थनास्थळे, मंडप, जीने, फ्लायओव्हर, पाईपमध्ये किंवा थेट रस्त्यावर राहातात.
--------------------------------
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा