-->
सोमवार दि. २४ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी पान १वर --
-------------------------------------------
नव्या स्वरुपात कृषीवल
वाचकहो,
आजपासून कृषीवल नवीन स्वरुपात, नव्या ढंगात देताना आम्हाला आनंद होत आहे. कृषीवलने आजवर आपल्या ७८ वर्षाच्या वाटचालीत ध्येयधोरणांशी फारकत न घेता आपल्यात अनेक बदल केले. वाचकांच्या गरजा, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आमच्या असंख्य वाचकांनीही त्याला भरभरुन पाठिंबा दिला. आजपासून कृषीवल आता आपल्याला दररोज सलग १२ पानांचा उपलब्ध होईल. यापूर्वीही कृषीवलने दररोज १२ पाने वाचकांना दिली आहेत. मात्र आठ पानांचा मुख्य अंक व चार पानांची पुरवणी अशी एकूण १२ पाने होती. मात्र याबाबत वितरकांच्या पुरवणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत. त्यामुळे वाचकांनाही कधीकधी पूर्ण अंक मिळत नसे. वितरक व वाचकांच्या या मागणीला मान देऊन आता मुख्य अंकातच पुरवणीचा समावेश करुन एकत्रित १२ पानांचा अंक आम्ही दररोज वाचकांना देत आहोत. त्यासाठी कृषीवलने आपल्या प्रेसमध्ये आणखी सुसज्जता आणण्यासाठी नवीन मशिनरी जोडली. आता टप्प्याटप्प्याने १२ पैेकी ८ पाने रंगीत देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एवढ्या संख्येने रंगीत पाने देणारे कृषीवल हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील एकमेव दैेनिक ठरले आहे. अर्थात हे करीत असताना शेतकरी, कामगार व कष्टकर्‍यांच्या बातम्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या लढ्याचे व्यासपीठ म्हणून कृषीवल आजपर्यंत जी भूमिका बजावत आला आहे ते यापुढेही सुरुच राहिल, यात काहीच शंका नाही. कृषीवल हे केवळ वृतपत्र म्हणून न राहता ती एक चळवळ म्हणून उभी आहे. केवळ नफ्यातोट्याचे गणित न पाहता जिल्ह्यातील एक अग्रगण्य दैनिक म्हणून त्याची असलेली ख्याती यापुढेही टिकविली जाईल. समाजातील प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक वयोगटातील वाचाकांना आपलेसे वाटावे यासाठी कृषीवलने सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक विषयांची नवी सदरे पुढील काळात सुरु केली जाणार आहेत. प्रामुख्याने तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बातम्या, लेख प्रसिध्द करण्याकडे आमचा कल असेल. गेल्या वर्षभरात आम्ही सुरु केलेल्या व्हॉटस् ऍप न्यूजला तरुणाईने जो भरभरुन प्रतिसाद दिला आहे त्यावरुन वाचकांविषयी आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, हे स्पष्ट जाणवते. तसेच कृषीवलच्या वेबसाईटने केवळ दहा महिन्यात वीस लाखांच्या हिटस् गाठल्या आहेत. दररोज ५६ देशातून कृषीवल इंटरनेटव्दारे मोठ्या आतुरतेने वाचला जातो. यातून प्रेरणा घेऊनच आता आम्ही कृषीवल नव्या ढंगात, नव्या स्वरुपात सादर करीत आहोत. आमचा हा प्रयत्न आपल्या पसंतीस उतरेल अपेक्षा आहे.
आपला,

सही
प्रसाद केरकर,
मुख्य संपादक, कृषीवल.
--------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel