-->
संपादकीय पान मंगळवार दि. २५ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
रामपाल प्रकरणाचा धडा
हरयाणातील रामपाल या तथाकथित महाराज म्हणवणार्‍या बुवाल अखेरीस पोलिसांनी मुसक्या बांधून न्यायालयात हजर केले आहे. रामपाल महाराजाला अटक करण्यासाठी पंजाब -हरयाणा उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होतेे. पोलिसांकडून केल्या जाणार्‍या अंमलबजावणीला रामपालच्या समर्थकांचा विरोध होता. त्यासाठी हजारो समर्थक रामपालच्या आश्रमात जमले आणि त्यांना पोलिसाबर दगडङ्गेक तसेच गोळीबार केला. या तथाकथित महाराजाचा असाही  प्रभाव आणि उद्दामपणा या निमित्ताने पुढे आला. आपण कोणताही कायदा मानत नसल्याचे रामपालचे म्हणणे आहे. त्यामुळेच तो कोर्टासमोर यायला तयार नव्हता. कायदा हाच सर्वश्रेष्ठ मानल्या जात असलेल्या देशात हा प्रकार अत्यंत गंभीरच म्हटला पाहिजे. त्यामुळेच त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. रामपाल हा तथाकथित संत आपली स्वत:ची वेगळी संरक्षण व्यवस्था उभी करतो. ज्यात केवळ खासगी सुरक्षा रक्षकच नाहीत तर रायफलपासून बॉम्बचाही समावेश असतो. हा संत आपल्या आश्रमाभोवती ५० ङ्गूट उंचीचे तटरक्षक उभे करतो. विशेष म्हणजे इतके सारे होईपर्यंत सरकारी यंत्रणा निद्रिस्त राहते. अशा प्रकारचे उदाहरण असणारा रामपाल हा एकमेव संत नाही. या देशात किंबहुना नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत हिंदूत्त्ववादी म्हणवणार्‍या अशा संत-महंतांना अधिक संरक्षण मिळेल काय, अशी भीती वाटते. कारण जो रामदेेव बाबा काही वर्षांपूर्वी रामलीला मैदानावरून स्त्री वेष परिधान करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, त्याच रामदेव बाबा या तथाकथित संत-योगी पुरूषाला भारत सरकारने आता झेड प्लस सुरक्षा व्यवस्था दिली आहे. हरयाणातील हिस्सारमध्ये जो काही प्रकार घडला तो एका रात्रीतील नाही. गेली अनेक वर्षे त्या आश्रमात जाणारे तथाकथित श्रध्दावान भक्तगण रामपाल यांच्या सूचनेनुसार हे सारे उद्योग करत असले पाहिजेत हे निर्विवाद. कारण पोलिस यंत्रणेलाही भीक न घालणारी मंडळी या आश्रमातून हिंसक कारवाया घडवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ उघड आहे की, ते श्रध्दावान शिष्य वगैरे काही नाहीत तर रामपाल या संताने जोपासलेली एक गुंडांची टोळी होती. त्यामुळे तिला तातडीने आळा घालण्याची आवश्यकता होती. असेच प्रकार यापुढेही घडत राहणार असतील तर भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असे म्हणणे केव्हाही उचित ठरणार नाही. अलीकडच्या काळात अनेक साधू-संत मंत्रीमंडळाच्या शपथविधीच्या वेळी रंगमंचावर अत्यंत विश्‍वासाने आणि निर्भिडपणे वावरताना दिसत आहेत. हे चित्र देशाच्या एकात्मतेसाठी घातक म्हणावे लागेल. बरे, शपथविधी समारंभाला उपस्थित राहणारी संत मंडळी खरोखरीच परमेश्‍वराचे अवतार आहेत का, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. अलीकडेच एका संतांच्या एका समितीने शिर्डीचे साईबाबा हे परमेश्‍वराचे अवतार आहेत का, याचा शोध घेऊन ते परमेश्‍वर नाहीत, असा निर्णय दिला होता. तरीही शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरातील गर्दी अर्ध्या टक्क्यानेही कमी झालेली नाही. ही संतमंडळी हळुहळू आपला प्रभाव वाढवत असतात. पाया भक्कम करत जातात आणि त्या त्या वेळी त्यांना राजकीय नेते मदत करताना दिसतात. उदाहरणार्थ, केंद्रात वा राज्यांमध्ये कोणाचीही सत्ता येत असताना, मंत्रीमंडळ शपथविधीपूर्वी दिल्ली वा त्या त्या राज्यांच्या राजधानीत ज्योतिषी, संत-महंत, बुवाबाजी करणारे आणि रामपालसारखे स्वत:ला ईश्‍वराचा अवतार मानणारे भोंदूबाबा राजकारण्यांभोवती पिंगा घालताना दिसतात. ही सारी मंडळी राजकीय नेत्यांना मंत्री होण्यासाठी हा खडा वापरा, हा अंगारा लावा, हा गंडा बांधा अशा तर्‍हेचे सल्ले देताना दिसतात. परंतु त्या क्षणी यापैकी एकालाही कोणा राजकीय नेत्याने विरोध केल्याचे किंवा हे प्रकार थांबवण्याचे प्रयत्न केल्याचे कधीच दिसून येत नाही. किंबहुना, अशा भोंदूबाबांना राजकीय नेत्यांकडून प्रोत्साहनच दिले जात असल्याचे पहायला मिळते. विशेष म्हणजे अशा प्रोत्साहन देणार्‍यांमध्ये सर्वोच्चपदी विराजमान असणारे सनदी अधिकारीही असतात. हे अधिकारी योग्य ठिकाणी आणि मालामाल करणारे पोस्टींग मिळावे म्हणून बुवा मंडळींना प्रोत्साहन देतानाची उदाहरणे पहायला मिळतात. यातील अनेकांना तर मंत्र्यांच्या किंवा अधिकार्‍यांच्या कचेरीत, निवासात जाताना प्रवेशपत्राचीही आवश्यकता राहत नाही.
एचएमटीचे घड्याळ हवेतून काढून दाखवणारे सत्य साईबाबा किंवा इंदिरा गांधींना योग शिकवणारे धिरेंद्र ब्रम्हचारी असे किती तरी स्वत:ला योगी पुरूष म्हणवणारे अनेकदा संकटात सापडलेले दिसतात. या सार्‍या परिस्थितीत सामान्य माणूस श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांची सीमारेषा ओलांडताना दिसत नाही. त्याच प्रमाणे राजकीय नेतेही त्याचा शोध घेताना दिसत नाहीत. परिणामी रामपालसारखा संत आणि आसाराम बापूसारखा संत समाज तसेच प्रशासनावर शिरजोरी करू शकेल इतका मस्तवाल होत आहे. या प्रकारात नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखा समाज सुधारक मारला जातो. या सार्‍या घडामोडी समाजाचा अभ्यास करणार्‍या प्रत्येकाने चिंताकूल होऊन अभ्यासल्या पाहिजेत आणि त्यावर काही तरी जालीम उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरयाणातील सोनपत येथे आठ सप्टेंबर १९५१ रोजी जन्मलेल्या रामपालचे शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत झाले. हरयाणाच्या सिंचन आणि सार्वजनिक आरोग्य विभागात ज्युनियर इंजिनिअर म्हणून तो कार्यरत होता. परंतु ते २००० मध्ये त्याला हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बडतर्ङ्ग करण्यात आले. स्वामी रामदेवानंद यांच्याकडून दिक्षा घेतल्याने रामपालने रोहतक जिल्ह्यातील कर्रोथा येथे स्वत: चा आश्रम उभारला. स्वत:ला कबीराचा अवतार मानणार्‍या रामपालला आता जेलची हवा खावी लागत आहे. जनतेने अशा संत-महंताना साथ देणे टाळले पाहिजे. असे झाले तरच पुन्हा असे रामपाल जन्माला येणार नाही.
--------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel