संपादकीय पान--अग्रलेख--०९ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
कॉँग्रेस भुईसपाट
----------------------
लोकसभेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या गेलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेल्या कॉँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला आहे. कॉँग्रेस पक्ष असा प्रकारे मार खाणार हे अपेक्षितच होते. कारण जनतेने कॉँग्रेसवर विश्वास टाकून त्यांना पुन्हा सत्ता हातात दिली असली तरी त्यांनी जनउपयोगी कोणतीही ठोस कामे गेल्या साडेचार वर्षात केलेली नाहीत. तसेच त्याजोडीला असलेल्या गेल्या दोन वर्षातल्या महागाईच्या भडक्यात भडक्यात कॉँग्रेस पक्ष पार जळून खाक झाला आहे. कॉँग्रेसच्या विरोधातली ही लाट दिल्लीत आम आदमी पार्टीने आपल्या शिडात भरली तर अन्य राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने भरली. सत्ताधार्यांच्या नर्केपणामुळे हा विजय झालेला असल्यामुळे विरोधकांच्या यशाला हातभार हा सत्ताधारी कॉँग्रेस पक्षानेच लावला आहे, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही. या पाच राज्यातील निवडणुकीत एकूण १२ कोटी मतदार सहभागी झाले होते. देशातील एकूण मतदारांची संख्या पाहता ही लोकसंख्या पाव टक्केही नाही. असे असले तरीही लोकांचा एकंदरीत मूड या निवडणुकीतून समजू शकतो. मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली व छत्तीसगढ या चारही राज्यात कॉँग्रेस आता सत्तेवर नाही. यातील त्यांची राजस्थान व दिल्लीची सत्ता भाजपाने खेचून घेतली आहे. तर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा नव्याने स्थापन झालेल्या पक्षाने चांगलीच मुसंडी मारुन दुसर्या क्रमांकाच्या जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे यावेळच्या झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाच्या वाटेला पूर्णपणे निराशाच आली आहे. देशात आता कॉँग्रेसच्या विरोधात वातावरण तापण्यास मोठी मदत या निवडणुकीनंतर होणार आहे. गेल्या वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील निवडणूक सलग तिसर्यांदा जिंकल्यापासून देशात दौरे करण्यास सुरुवात केली होती. केंद्रात सलग दहा वर्षे असलेल्या कॉँग्रेसच्या सरकारच्या विरोधात आता वातावरण आहे, जनता कॉँग्रेसच्या कारभारावर नाराज आहे हे वेळीच ओळखून नरेंद्र मोदींनी आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदींचा प्रचार हा अगदी टोकाचा होता. वेळ पडल्यास त्यांनी मुझफ्फरनगरमधील दंगलीत सहभागी असलेल्या नेत्यंाचा सत्कार करण्यासही मागे पुढे पाहिले नाही. अर्थातच भाजपाच्या हिंदू मतांच्या केंद्रीकरणाच्या राजकारणाचा हा भाग होता. मोदींच्या या कृत्यामुळे मुस्लिमांची मते एकगठ्ठा कॉँग्रेसच्या पारड्यात पडतील व आपण पुन्हा किमान राजस्थान व दिल्लीत सत्ता पुन्हा स्थापन करु असा कॉँग्रेसचा होरा होता. परंतु तो सपशेल खोटा ठरला आहे. कॉँग्रेसच्या पराभवाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाचाही मोठा हातभार लागला आहे. दोन वर्षांपूर्वी अण्णांनी जनलोकपाल विरोधी जे जनमत संघटीत केले त्यातून सत्ताधार्यांविषयी असलेला राग व्यक्त झाला होता. अण्णांच्या आंदोलनावर त्यावेळी झालेली टीका आपण बाजूला ठेवू. मात्र त्यावेळी अण्णांच्या सभांंना होत असलेली गर्दी ही केवळ बघ्यांची नव्हती. यातूनच केजरीवाल यांच्या पक्षाचा पाया तयार झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांच्या विषयी असलेल्या चांगल्या प्रतिमेचाही कॉँग्रेसला उपयोग होऊ शकला नाही. ऐवढेच काय शिला दिक्षीतांना आपली आमदारकीही गमवावी लागली आहे. एवढ्या दारुण पराभव होण्यामागे दिल्लीत झालेले अण्णांचे आंदोलन आणि दिल्लीतील बलात्काराच्या घटनानंतर त्याविरोधात संघटीत झालेले जनमत ही कारण अवलंबून आहेत. दिल्ली हे शहर मुंबईप्रमाणे बहुभाषिक जसे आहे तसेच सुक्षिशित मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाच्या काळात किंवा दिल्लीतील गाजलेल्या बलात्कार प्रकरणानंतर मेणबत्या पेटविणार्यांनी यावेळी घराबाहेर पडून कॉँग्रेस विरोधात मतदान केले आहे, ही एक चांगली बाब झाली. अशा प्रकारे कॉँग्रेस सत्तेत असताना त्यांचा नकर्तेपणा बरोबर ओळखून त्याच फायदा उठवित नरेंद्र मोदी यांनी जसे रान उठविले तसेच दिल्लीत आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल हे देखील कॉँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्यात यशस्वी ठरले. नरेंद्र मोदी व अरविंद केजरीवाल यांचे हे राजकीय यश आहे. त्याचबरोबर या निमित्ताने कॉँग्रेसचे तरुण नेते राहूल गांधी यांचे अपयश आता जगजाहीर झाले आहे. कॉँग्रेसजन अर्थातच या पराभवाचे माप कॉँग्रेस नेतृत्वाच्या पदरात, मुख्यत: पक्ष नेतृत्व जर गांधी घराण्याचे असेल तर कधीच टाकीत नाही. तशी त्या पक्षात पध्दत नाही. हे वास्तव आपण एक वेळ मान्य केले तरीही राहूल गांधी हे काही मते खेचणारे मशीन नाही हे या निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. उलट राहूल गांधींनी ज्या भागात प्रचार सभा घेतल्या तेथे कॉँग्रेसच्या पदरी निराशाच आली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा विजय झाल्यास पुढील पंतप्रधानपद अर्थातच राहूल गांधींकडे चालत येणार होते. परंतु आता ही शक्यता मावळली आहे. कारण कॉँग्रेसचा पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पराभव हा नक्की आहे. यातून राहूल गांधी यांचे नेतृत्व सध्याच्या स्थितीपर्यंत कॉँग्रेसला काही यश देणारे ठरलेले नाही. कर्नाटकच्या मागच्या झालेल्या निवडणुका हाच काय तो अपवाद. अर्थात तिकडे भाजपातील बंडखोरी व तेथील भ्रष्ट सरकारचा फायदा कॉँग्रेसला मिळाला. आताच्या या निकालानंतर भाजपाला आपण सहजरित्या केंद्रात सत्तेवर येऊ असे वाटत असेल तर तो त्यांचा एक भ्रम ठरेल. अजूनही भाजपासाठी दिल्ली बहोत दूर आहे. कारण त्यांना अजून बरेच मित्र पक्ष जमवायचे आहेत. एकट्याच्या जीवावर भाजपा सत्तेत येणे अशक्य आहे. आता मात्र या निकालानंतर जे कुंपणावर होते ते भाजपाच्या कळपात झटकन जातील असे दिसते. त्याची सुरुवात येत्या महिनाभरातच होईल. या निवडणुकीत एक बाब प्रामुख्याने पुढे आली ती म्हणजे सोशल मिडियाचा मतदारांवर पडलेला प्रभाव. गेल्या दोन-चार वर्षात तयार झालेले हे नवीन माध्यम अत्यंत प्रभावी ठरले आहे. अमेरिकेतील ओबामांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोशल मिडियाने महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र भारतात इंटरनेट तळागाळापर्यंत पोहोचले नसताना हे माध्यम प्रभावी ठरेल का, अशी अनेकांना शंका वाटत होती. सोशल मिडियासाठी देखील ही एक सत्वपरीक्षाच ठरली होती. परंतु आपल्या देशातही सोशल मिडिया हे माध्यम बर्यापैकी रुजले आहे हे आताच्या निकालावरुन सिध्द झाले आहे. भविष्यात निवडणूक असो किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम सोशल मिडियाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच भविष्यात हे प्रचाराचे एक महत्वाचे साधन ठरेल. पाच राज्यातल्या या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग येण्यास प्रारंभ होणार हे नक्की. भाजपा अधिकच आक्रमक होईल आणि त्यांना सत्तेच्या चाव्या आपल्या हातात आल्याचा भास होईल. खरे तर कॉँग्रेस विरोधी या लाटेवर तिसरी आघाडी स्वार झाली पाहिजे. कारण कॉँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकांना खरा चांगला सशक्त पर्याय हा तिसर्या आघाडीच्या रुपाने मिळू शकतो. यासाठी आता दिल्लीत तिसर्या आघाडीने मोर्चेबांधणी करण्याची आवश्यकता आहे.
----------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा