संपादकीय पान--चिंतन--९ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
व्टिटरचा आता चिवचिवाट आता शेअर बाजारात
------------------------
सोशल मिडीयात अग्रस्थानी असलेल्या व्टिटरची नोंदणी आता न्यूयॉर्क शेअर बाजारात झाल्याने नव्या पिढीतील या कंपनीचे भांडवल आता जनतेसाठी खुले झाले आहे. व्टिटरच्या समभागाची नोंदणी झाल्यावर या समभागांना ऐवढी जबरदस्त मागणी आली की हा समभाग दुट्टीने वाढला. अशा प्रकारे समभाग नोंद होताच दुपट्टीने वाढण्याचे फार क्वचितच घडते. मात्र हा मान व्टिटरला मिळाला आहे. आठ वर्षांपूर्वी ट्विटरची स्थापना झाली त्यावेळी १४० शब्दांचा हा संदेश सर्वांना देण्याची संकल्पना काही क्लीक झाली नव्हती. परंतु ट्विटरला खर्या अर्थाने सदस्य मिळाले ते गेल्या पाच वर्षात. गेल्या अमिरेकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोशल मिडियाने महत्वाची भूमिका बजावली आणि सोशल मिडियाचे महत्व सर्वांना पटू लागले. त्यापाठोपाठ इजिप्त व त्याच्या शेजारच्या देशात झालेल्या लोकशाहीच्या आंदोलनातही सोशल मिडियाने मोलाची कामगिरी केली होती. ऐवढेच कशाला आपल्याकडे अण्णांच्या आंदोलनातही सोशल मिडियाचा मोठा वापर झाला होता. एकूणच काय तर गेल्या चार-पाच वर्षात सोशल मिडिया व त्यात व्टिटरकडे अनेकांचा ओढा वाढला. व्टिटरच्या समभागांची प्राथमिक खुली विक्री ही २६ प्रती डॉलर अशी करण्यात आली होती. मात्र या समभागांची नोंदणी झाल्यावर हा समभाग ५० डॉलरवर पोहोचला. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे एका झटक्यात दुपट्टीने वाढले. नवीन पिढीतील तंत्रज्ञान कंपनीत समभाग विक्ीनंतर अशा प्रकारे भांडवलवृध्दी सर्वाधिक करण्याचा विक्रम व्टिटरने केला आहे. गेल्या वर्षी फेसबुकनेही आपल्या समभागांची विक्री केली होती. त्यांच्या नोंदणीनंतरही एवढी भांडवलवृध्दी झाली नव्हती. व्टिटर हे इंटरनेटवरील एस.एम.एस. असल्याचे म्हटले जाते. या सेवेतून त्यांना आर्थिक उत्पन्न काही मिळत नाही. उलट या कंपनीला या सेवा पुरविण्यासाठी ३० कोटी डॉलर खर्च करावे लागतात. सोशल मिडियाचा गेल्या दोन-तीन वर्षात जसा प्रभाव वाढत गेला तसे व्टिटरला मोठे ग्लॅमर तयार झाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून पोपपर्यंत १४० शब्दांमध्ये आपला संदेश यात मांडतात आणि त्यांचे चाहते हा संदेश काय आहे ते मोठ्या उत्सुकतेने वाचतात किंवा त्याकडे टक लावून असतात. अशा प्रकारे लोकप्रिय झालेल्या व्टिटरच्या पाच कोटी समभागांचे नोंद झाल्यावर लगेचच एका तासात व्यवहार झाले. मात्र फेसबूकचे तर समभाग नोंदणी जाल्यावर काही सेकंदातच आठ कोटी समभागांचे व्यवहार झाले होते. सध्या व्टिटरचे जगभरात एकूण ५० कोटी लोक सदस्य आहेत. यातील ३५ कोटी लोक दररोज आपला संदेश पाठवितात. अशा प्रकारे जगातील सर्वात बिझी वेबसाईट असलेल्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक पहिल्या दहात आहे. परंतु त्यांच्याकडे एवढे ग्राहक असूनही त्यातून त्यांना अजून उत्पन्न साध्य करता आलेले नाही. असे असतानाही त्यांच्या समभागांना जो प्रतिसाद मिळाला त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणत्याही कंपनीचे मूल्य हे त्याच्या उत्पन्नावर व नफ्यावर ठरत असते. व्टिटर या कोणत्याही साच्यात योग्यरित्या बसत नाही. असे असतानाही त्यांच्या समभाग विक्रीला अमाप प्रतिसाद मिळाला व एवढेच नव्हे तर त्यांच्या समभागांच्या नोंदणीनेही विक्रम केला. यातून सर्वच गणिते बदलत चालली आहेत. कोणताही गुंतवणूकदार हा भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक करीत नाही. मात्र व्टिटरच्या बाबतीत असे घडलेले नाही, असेच म्हणावे लागते. भविष्यात व्टिटरला मोठ्या प्रमाणावर जाहीरातींचे उत्पन्न मिळेल व चांगला नफा कमविला जाईल असा अंदाज आहे. परंतु या जर तरच्या गप्पा झाल्या. सध्या तरी व्टिटर हे काही फेसबुकप्रमाणे पैसा कमविणारे मशिन नाही. त्यामुळे व्टिटरचा हा चिवचिवाट शेअर बाजारात कितपत टिकतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
----------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा