संपादकीय पान--अग्रलेख- १६ ऑक्टोबर २०१३साठी-
-------------------
सत्तेच्या सीमोलंघनाची घाई
---------------
नुकताच दोन दिवसांपूर्वी दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला. पुढील वर्षीचा दसरा येईपर्यंत दिल्लीत नवीन सरकार स्थापन झालेले असेल. हे सरकार कुणाचे येणार या विषयीचा निर्णय आपली जनता जरुर घेईल. परंतु दसर्याच्या निमित्ताने प्रत्येकाला सत्तेचे सीमोलंघन करण्याची किती घाई झाली आहे हे मात्र दिसले. यातील सर्वात मोठी घाई झाली आहे ती भाजपाला आणि त्यांची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय संवयंसेवक संघाला. भाजपाला सत्तेत येण्याची मोठी घाई झाली आहे. सध्या त्यांचे पंतप्रधानदपाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे जयललीता, अकाली दल व शिवसेना या मित्रांव्यतिरिक्त अन्य आणखी मित्र जमिविण्यात यशस्वी झालेले नाहीत. म्हणजेच कुणी नाही आले तर स्वबळावर त्यांना सत्ता काबीज करावयाची आहे. यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसर्याच्या मेळाव्यात सरसंघचालकांनी, संघ राजकारण करीत नसला तरी जन्मजातच राजकारण माहित आहे असे सांगून आपणच स्वत: संघाचे पितळ उघडे केले आहे. संघाचे राजकारण हे नेहमीच छुपे असते. ते उघडपणे राजकारण करीत नाहीत आणि राजकारण करुनही आपली संघटना ही सांस्कृतिक असल्याचे सांगतात किंवा भासवितात. हा त्यांचा दांभीकपणा स्वातंत्र्यापासून सुरु आहे. खरे तर संघाने उघडपणे राजकारण करण्याचे धारिष्ट्य दाखवावे, यातून त्यांच्या राजकारणातील पारदर्शकता स्पष्ट होईल. अर्थातच राजकारण करीत नाही असे सांगणारे संघवाले मात्र आपले मत हटकून भाजपालाच देतात. कारण त्यांना तसा आदेश येतो. संघाला आता नरेंद्र मोदी रुपाने मिळालेला नेता दिल्लीच्या तख्तावर नेऊन पोहोचवेल असे वाटते. परंतु त्यांचा हा भ्रम आहे. सोशल मिडीयाच्या भरवशावर दिल्लीचे तख्त काबीज करता येत नाही. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता हवा. गुजरातमधील दंगलींमुळे मोदींची मलीन झालेली प्रतिमा देश विसरणे शक्य नाही. त्याचबरोबर इशरत जहॉँ प्रकरणाने तर मोदी सरकारचे धर्मांद धोरण उघडे पडले आहे. अशा स्थितीत मोदी हे तरुणांचे नेते आहेत असे भासवून तरुणांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपा व संघाचा चालू आहे. परंतु देशातील तरुण असल्या भावनिक आवाहनाला बधणार नाही. गुजरातमध्ये तीनदा सत्ता आली म्हणून त्याबळावर आपण देश काबीज करु असे म्हणणे मुर्खपणाचे ठरणार आहे. तरुणांनी शतप्रतिशत मतदान करावे हे सरसंघचालकांचे आवाहन म्हणजे त्यांना असे म्हणायचे आहे की, तरुणांनी भाजपाला मतदान करावे. परंतु सध्याचा तरुण भाजपाच्या जातीयवादी, धर्मांद राजकारणाची साथ करणार नाही. त्याला विकास जरुर हवा आहे. मात्र विकास करणारी व्यक्ती ही सर्वधर्मसमभाव पाळणारी हवी आहे. स्ध्याच्या आधुनिक व विज्ञानाच्या युगात धर्मांधशक्तींना या समाजात थारा नाही. त्यामुळेच मोदींचे व भाजपाचे सत्ती काबीज करण्याचे स्वप्न काही प्रत्यक्षात उतरणार नाही. संघाच्या पुढील दसरा मेळाव्यात कवायत करताना गेल्या वर्षी आपली सत्तेचे सीमोलंघन करण्यात घाईच झाली हे त्यांना पटलेले असेल. संघाचा मेळावा नागपूरात होत असताना त्याच शहरात कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील सत्तेची सूत्रे बदलू शकतात याचे सुतोवाच केले. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योगसमूहाच्या व्यासपीठावरुन बोलताना शरदरावांनी राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो असे सांगून राजकारणातील नवी गणिते मांडली जाऊ शकतात असे सुचित केले. म्हणजेच शरद पवारांनी राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही असे सांगून भाजपाशी निवडणुकीनंतर संधान बांधण्यासाठी आत्तापासून दरवाजे किलकिले करुन ठेवले आहेत. यासाठी त्यांनी व्यासपीठही निवडले ते गडकरींच्या पूर्ती समूहाच्या कार्यक्रमाचे. शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचे असेल तर पुढील वर्षीच नेम सााधावा लागेल. कारण कॉँग्रेसच्या गेल्या दहा वर्षातील कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा कॉँग्रेस सत्तेत येमे अश्यक्य आहे. त्याचबरोबर भाजपा स्वबळावर सत्तेत येऊ शकत नसल्याने त्यांना अन्य पक्षांची गरज भासल्यास आपल्याला त्यात स्थान मिळवून उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचता येऊ शकते असा ठोकताळा पवारांनी बांधला असावा. आणि जर भाजपा सत्तेत येणार नाही व तिसरी आघाडी आल्यास त्यात त्यांचे मित्र आहेतच. बरे पवारांच्या पक्षाची ताकद ही काही दोन आकड्यावर जाऊ शकत नसली तरीही पैशाची जुळवाजुळव करुन सत्तेची समिकरणे जुळवून आणण्यात त्यांची हातोटी आहे. अशा प्रकारे कोणताही पक्ष वा आघाडी येवो आपण सत्तेच्या केंद्रभागी राहू असा विश्वास पवारांना वाटतो. यासाठी त्यांना त्यांची सर्वपक्षीय मैत्री उपयोगी ठरु शकेल. सत्तेच्या सीमोलंघनात अशा प्रकारे पवारांनीही आघाडी घेतली आहे. मुंबईत तर मनसे व शिवसेना या दोन्ही पक्षात सीमोलंघन सुरुच असते. पुढील काळात निवडणुकांचे सनई-चौघडे जसे जोरात वाजू लागतील तसे या सीमोलंघनाला वेग येईल. ज्यांना केवळ सत्तेचेच राजकारण करवयाचे आहे त्यांच्यासाठी सद्या सत्तेच्या सीमोलंघनाची वेळ आहे. परंतु देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्याविषयी त्यांना काही देणेघेणे नाही. या वर्गाच्या हिताचा विचार हे पक्ष करुच शकत नाहीत. त्यामळेे या कष्टकर्यांना स्वतंत्रपणे विचार करावा लागणार आहे आणि त्यांचे सीमोलंंघन हे भांडवलशाही संपविण्याचे असेल.
------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा