-->
संपादकीय पान--अग्रलेख--१२ ऑक्टोबर २०१३
---------------------
अखेर तो क्षण आलाच!
----------------------
क्रिकेटरसिकांना ज्या क्षणाची सतत गेले काही वर्षे धास्ती वाटत होती... तो क्षण अखेर आलाच. क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. येत्या १४ नोव्हेंबरला आपली २००वी कसोटी क्रिकेटची मायभूमी असलेल्या मुंबईत खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये जायला परतेल तो पुन्हा खेळायला न येण्यासाठीच. सचिन शिवाय सामना हे समीकरण अजूनही क्रिकेटरसिकांना पटणारे नाही. परंतु निवृत्ती ही प्रत्याकालाच घ्यावी लागते. कधी तरी आपल्या कामाचा पूर्णविराम घ्यायचा असतो, हे सत्य कुणालाही चुकलेले नाही.
खरे तर त्याने गेल्या वर्षी एक दिवसीय सामान्यातून निवृत्ती घेऊन आपण आता हळूहळू निवृत्तीच्या दिशेने झुकत आहोत हे सुचित केलेच होते. गेले २३ वर्षे झंझावती धावा काढणारा आपला सचिन आता सामन्यात नसणार हे वास्तव आता क्रिकेटप्रेमींना स्वीकारावे लागणार आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी सचिनचा धावा काढण्याचा वेग मंदावला होता. त्यावेळी सचिनने आता निवृत्त व्हावे असा सल्ला अनेकांनी दिला होता. परंतु सचिनने आपला गवसलेला फॉर्म पुन्हा मिळवून आपल्या विरोधकांची तोंडे गप्प केली होती. एखाद्याने उच्च शिखरावर असताना निवृत्त होण्यात एक वेगळा आनंद आहे. सचिनने हा आनंद मिळवला आहे हे त्याच्या यशाचे मोठे गमक आहे. अन्यथा क्रिकेट नियामक मंडळावर जर त्याला निवृत्त करणयची पाळी आली असती तर सचिनच्या करिअरच्या ग्राफला मोठा काळीमा लागला असता. परंतु तसे सचिनने होऊ दिले नाही. त्याने निवृत्त होताना त्याच्या जगात पसरलेल्या करोडो जीवाला त्याने चटका लावला. क्रिकेट या खेळाभोवती आता मोठे वलय निर्माण झाले आहे. त्यात पैशाची बरसात होते. ललना तुमच्या भोवती फेर देऊन नाचत असतात. आय.पी.एल.ने या सर्वांचा कळस गाठला होता. असे असताना केवळ क्रिकेटमध्येच रममाण होणे हे सोपे नसते. सचिनने हे करुन दाखविले. त्यावरुन त्याचे या खेळावरील प्रेम, निष्ठा ठळकपणे जाणवते. आपल्या कारर्किदीत सचिनने कोणताही बट्टा लावून घेतला नाही यात त्याचे मोठेपण आहे. क्रिकेट हा खेळापेक्षा व्यवसाय झाला असला तरीही त्यातील सट्टेबाजी आणि त्यात क्रिकेटपटूंचा सहभाग या सर्वांपासून सचिन नेहमीच अलिप्त राहिला. वयाच्या १६ व्या वर्षी रणजीत खेळलेला सचिन वयाची चाळीशी पार केली तरी खेळतच आहे. जगातील फार क्वचित क्रेकटपटूंच्या नशिबी एवढी मोठी कारर्किद आली असेल. आणि ऐवढे असूनही वयाच्या चाळीशीनंतर त्याने खेळतच राहावे, निवृत्त होऊ नये असे क्रिकेटरसिकांना वाटणे यात त्याच्या यशाचे फार मोठे गमक आहे. दहावीच्या परिक्षेत नापास होणारा विद्यार्थी सहसा आयुष्यातील सर्वच परिक्षांत फेल होणार असा सर्वांचा सर्वसाधारणपणे समज असतो. अर्थातच पुस्तकी ज्ञानातील अभ्यास हा प्रत्येकवेळी करिअर ग्राफ उंचावण्यासाठी काही उपयोगी पडत नाही, हे सचिनने दाखवून दिले आहे. सचिनला क्रिकेटरसिकांना देवत्व दिले. त्याच्या क्रिकेटमधील महानतेचा तो एक सर्वोच्च बिंदू होता. परंतु या देवत्वामुळे सचिनच्या खेळावर कधीच परिणाम झाला नाही. त्या देवत्वामुळे च्या डोक्यात हवा जाऊन आपल्या कार्यापासून कधीच ढळला नाही. त्यामुळे त्याचे देवत्व हे अधिकच बळकट झाले. सुनिल गावस्कर पाठोपाठ अशा प्रकारे एवढे प्रेम कुणालाच मिळाले नाही. सचिन हा खरोखरीच उत्कृष्ट खेळाडू, एक चांगला माणूस आहे. म्हणूनच त्याच्यात लोकांनी देवत्व पाहिले. सचिनचा हा मोठेपण आता भविष्यात तो पॅव्हेलियनमध्ये गेला तरी टिकणार आहे. कारण त्याची निवृत्ती ही वयाच्या चाळीसाव्या वर्षी असली तरीही प्रत्येकाला चटका देणारी ठरली आहे. सचिनच्या या यशापोटी अनेक पालकांना वाटते की आपल्या मुलानेही सचिनच व्हावे. परंतु क्रिकेटच्या प्रशिक्षण शिबीरात जाऊन सचित घडत नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे. सिचनसारखा खेळाडू हा शतकातून एखादाच होतो. निवृत्तीनंतर सचिन करणार काय असा प्रश्‍न आपल्याला पडेल. परंतु सचिनने केवळ समालोचन करण्यापेक्षा खेळाडू घडविण्याकडे लक्ष दिल्यास त्याचा देशाला फायदा होईल. क्रिकेट आणि बॉलिवूड हे असे दोन विषय आहेत की जे देशाची सीमा देखील झुगारुन देतात. भारत-पाकिस्तानात कितीही वैमनस्य असले तरी या दोन क्षेत्रात भारतीयांच्या ज्या देवता म्हणजे अमिताभ बच्चन, शाहरुखखान, सलमान खान असो किंवा सचिन आहेेत त्यांनाही पाकिस्तानात तेवढाच मान-सन्मान आदर मिळतो. त्यामुळे क्रिकेटने भारत-पाक संबंधातली दरी बुजविण्याचे मोठे काम गेेल्या काही वर्षात केले आहे. आणि यात सचिनची भूमिका फार मोलाची ठरली आहे. केवळ पाकिस्तानातच नव्हे तक क्रिकेटची मायभूमी असलेल्या लंडनमध्ये सचिनला जो मान मिळतो त्याने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. सचिनने स्वत:चे अनेक विक्रम केले आणि क्रिकेटच्या जगतात देशालाही एका नव्या रांगेत नेऊन बसविले. सचिनचा हा मोठेपणा आपल्याला कितीही महान वाटत असला तरी त्याने मात्र आपल्या एक सर्वसामान्य समजले आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन याने एका कार्यक्रमात सचिन बरोबर असताना माझ्या शेजारी सचिनच असला पाहिजे असा हट्ट पुरविला होता. अमिताभचा हा हट्ट जरुर पुरविण्यात आला परंतु यातून सचिनचे मोठेेपण ठळकपणे दिसते. अशा या सचिनचा खेळ आपल्याला १४ नोव्हेंबरच्या सामन्यानंतर पुन्हा पहावयास मिळणार नाही. सचिनने बॅट मॅन केली असली तरीही त्याचे आजवरचे विक्रम क्रिकेटप्रमेमींच्या हृदयात कायमचे राहातील यात शंका नाही.
----------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel