4oct 2013 EDIT
भ्रष्टाचारमुक्तीचा फार्स
अखेर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हुकुमानुसार वागावेच लागले आणि दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणार्या वटहुकुमाला मागे घेणे भाग पडले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान विदेशात असताना पत्रकारांशी एका प्रश्नाला उत्तर देताना हा वटहुकुम फाडून फेकून दिला पाहिजे असे वक्तव्य केले होते. शेवटी आपलेच म्हणणे खरे आहे हे राहुल गांधींनी दाखवून दिले. राहुल गांधींनी असे वक्तव्य केल्यावर पंतप्रधान राजीनामा देतील आणि आपला आत्मसन्मान टिकवतील असा अंदाजही खोटा ठरला. या प्रकरणाच्या निमित्ताने गांधी घराण्याने काही गोष्टी पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. यातील सर्वात पहिली बाब म्हणजे कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी सत्तेवर असली तरीही सत्तेच्या केंद्रभागी गांधी घराण्याचे असलेले महत्त्व कुणालाच नाकारता येणार नाही. कोणताहीमहत्त्वाचा निर्णय हा गांधी घराण्याच्या संमतीशिवाय कॉँगे्रसमधील किंवा आघाडीतील अन्य पक्षांना घेता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अगदी राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर या वटहुकुमाबाबत कितीही हवेत बाण सोडले तरीही नंतर मुकाट्याने आदेश मान्य केला. खरे तर हा वटहुकुम काढण्यापूर्वी कॉँग्रेस पक्षात तसेच मंत्रिमंडळातही चर्चा झाली होती. अगदी भाजपापासून सर्व पक्षांनी याला संमत्तीही दिली होती. कॉँग्रेस पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी या वटहुकुमाला आक्षेप घेऊ शकले असतेही. परंतु त्यांनी तसे काही केले नाही. राहुल गांधींनी आपले म्हणणे पक्षाच्या बैठकीत मांडले असते तर ते उचित ठरलेही असते. परंतु त्यांनी तसे ते जाणून बुजून केले नाही आणि आपला पक्षावरचा वरचष्मा दाखविण्यासाठी जाहीर वक्तव्य करुन हा वटहुकुम मागे घ्यायला भाग पाडले. म्हणजे आपण सत्तेत सहभागी नाही असे भासवित असताना सत्ताबाह्य केंद्र मात्र आपल्या ताब्यात ठेवायचे हे राहुल गांधींच्या कृत्रीतून स्पष्ट दिसले. एकीकडेराहुल असे वक्तव्य करीत असताना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मात्र पंतप्रधांच्या बाजूने उभे असल्याचादेखावा केला. म्हणजे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आपल्या हातातील कळसुत्री बाहुले केले असल्याचे सोनिया आणि राहुल या दोघांनीही जाहीरपणे दाखवून दिले. अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांना राजकारणापेक्षा अर्थकारणातले जास्त समजते व त्यात जास्त रस आहे हे आपण समजू शकतो. मात्र आपला झालेला अपमानही समजत नाही याचे आश्चर्य वाटते. खरे तर त्यांना एका क्षणात राजीनामा देऊन आपल्याला खुर्चीचा मोह नाही, असे दाखवून देता आले असते. त्यांनी जर राजीनामा दिला असता तर कॉँग्रसे पक्षाची अडचणीची स्थिती झाली असती आणि मनमोहनसिंग आपला सन्मान राखून पायउतार झाले असते. पंतप्रधानांच्या गोटातील लोक म्हणतात की, जर त्यांनी राजीनामा दिला असता तर गुन्हेगार्यांचे समर्थन केल्याचा संदेश गेला असता. परंतु हा त्यांचा काही एकट्याचा निर्णयनव्हता. पक्षात व मंत्रिमंडळात चर्चा करुन घेतलेला हा निर्णय होता. आता मात्र त्यांनी राहुल गांधींना हिरो होण्याची संधी या निमित्ताने दिली आहे. यातूनराहुल गांधींनी आपली प्रतिमा एक राजकारणात स्वच्छतेची मोहीम राबविणार्यांपैकी आपण एक आहोत अशी निर्माण केली. अशी एकट्या व्यक्तीची प्रतिमा स्वच्छ असली म्हणून सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचे दाखविता येत नाही. आज कॉँग्रेस पक्ष संपूर्णपणे भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हाऊन निघाला आहे. अशा स्थितीत राहुल गांधीनी अशा प्रकारे वटहुकुमाला विरोध केल्याने पक्षाची प्रतिमा उजळेल असे नाही. अर्थात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचीही याहून काही वेगळी स्थिती नाही. भाजपाने कितीही मोठा आव आणला तरी त्यांच्यात आणि कॉँग्रेसमध्ये फार काहीच फरक नाही. भाजपाला भ्रष्टाचारामुळेच कर्नाटकातील आपली सत्ता गमवावी लागली आहे. असा भ्रष्टाचारी विरोधी पक्ष कॉँग्रेसशी या मुद्यावर लढू शकतच नाही. देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची या दोघांचीही राजकीय ताकद आणि इच्छाही नाही. हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारमुक्तीचा फार्स करीत आहेत आणि हा वटहुकुम मागे घेतल्याने या फार्सचा तिसरा अंक संपला आहे. राहुल गांधींचा हा फार्स चांगला वटलाय आणि आम जनता यावर खूष होईल व आगामी निवडणुकीत आपल्याला मतदान करील अशी जर कॉँग्रेसची समजूत असेल तर तो भ्रम ठरेल, यात काहीच शंका नाही. कॉँग्रेसने आता हा वटहुकुम अव्हेरल्याने राजकीय गणिते काही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लालूप्रसाद यादव यांची रवानगी जेलमध्ये झाल्याने कॉँगे्रसचा साथी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जवळ जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुष्यभर कॉँग्रेस विरोधाचा जप करुन राजकारण केलेल्या जनता दल (युनायडेड)ला कॉँग्रेसच्या दावणीला बांधायला नियती भाग पाडेल असेच दिसते. अशा प्रकारे आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर कॉँग्रेसच्या घोळक्यात काही नवीन मित्र सामील होतील, अशी अपेक्षा आहे. लोकभावनेचा आदर राखतराहुल गांधींनी या वटहुकुमाला विरोध केला असे चित्र तयार करुन कॉँग्रेसने देश भ्रष्टाचारमुक्त आपण करणार आहोत असे कितीही वारे तयार केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण गेल्या दहा वर्षात सर्वाधिक भ्रष्टाचारी प्रकरणे कॉँग्रेसच्याच राजवटीत झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचारामुक्तीचा हा फार्स उघड झाला आहे.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा