-->
स्पॉट किंमत आणि वायदा किमतीचे संमीलन (कन्व्हर्जन्स) म्हणजे काय?

स्पॉट किंमत आणि वायदा किमतीचे संमीलन (कन्व्हर्जन्स) म्हणजे काय?

स्पॉट किंमत आणि वायदा किमतीचे संमीलन (कन्व्हर्जन्स) म्हणजे काय?
प्रसाद केरकर, मुंबई. 
Published on 12 Mar-2012 ARTHPRAVA
क मोडिटी फ्यूचर्स काँट्रॅक्ट जसे मुदतपूर्तीच्या नजीक येतात, तसे त्या कमोडिटीच्या स्पॉट किमतीच्या समतुल्य वायदा किंमत येऊ लागते, यालाच स्पॉट किंमत आणि वायदा किमतीचे सम्मीलन (कन्व्हर्जन्स) म्हटले जाते. 
काँटँगो मार्केटमध्ये बेसिसची कक्षा अरुंद बनल्यास त्याचा लाभार्थी कोण ठरतो? 
मार्केटमध्ये वायदा किंमत ही स्पॉट किमतीपेक्षा नेहमीच अधिक राहत असल्याने बेसिसची कक्षा अरुंद होण्यातून शॉर्ट हेजर (शॉर्ट हेजर हा कमॉडिटीचे वायदा विक्री व्यवहार करून तीच कमोडिटी कॅशने खरेदी करीत असतो) लाभार्थी ठरतो. 
काँटँगो मार्केटमध्ये बेसिसची कक्षा रुंदावल्यास त्याचा लाभार्थी कोण ठरतो? 
काँटँगो मार्केटमध्ये बेसिसची कक्षा रुंदावण्यातून लाँग हेजर (लाँग हेजर हा कमोडिटीचे वायदा खरेदी व्यवहार करून तीच कमोडिटी प्रत्यक्ष बाजारात विकत असतो) लाभार्थी ठरतो. 
बॅकवर्डेशन मार्केटमध्ये बेसिसची कक्षा अरुंद बनल्यास त्याचा लाभार्थी कोण ठरतो? 
बॅकवर्डेशन मार्केटमध्ये बेसिसची कक्षा अरुंद होण्यातून लाँग हेजर लाभार्थी ठरतो. 
बॅकवर्डेशन मार्केटमध्ये बेसिसची कक्षा रुंदावल्यास त्याचा लाभार्थी कोण ठरतो? 
बॅकवर्डेशन मार्केटमध्ये बेसिसची कक्षा रुंदावण्यातून शॉर्ट हेजर लाभार्थी ठरतो. 
‘पिरॅमिडिंग’ या सं™ोचा अर्थ काय? 
बाजारातील कोणत्याही खुल्या पवित्र्यातून (ओपन पोझिशन्समधून) मार्क-टू-मार्केटद्वारे कमावलेल्या नफ्यातून अतिरिक्त काँट्रॅक्ट्सची खरेदी करणे याला ‘पिरॅमिडिंग’ म्हटले जाते. हे मुळात सट्टेबाजीच्या डावपेचातून घडत असते. 
एमसीएक्स ट्रेडर वर्क स्टेशन (टीडब्ल्यूएस) द्वारे कोणत्या ऑर्डर्स नोंदवता येतात? 
एमसीएक्सच्या टीडब्ल्यूएसद्वारे दिल्या जाणार्‍या ऑर्डर्स या एक तर किंमत अथवा वेळसापेक्ष परिस्थितिजन्य असतात. किंमतसापेक्ष ऑर्डर्सचे पुन्हा लिमिट, ऑर्डर्स, मार्केट ऑर्डर्स आणि स्टॉप लॉस ऑर्डर्स असे वर्गीकरण केले जाऊ शकते. तर वेळसापेक्ष ऑर्डर्सचे डे ऑर्डर्स, गुड-टिल-डेट ऑर्डर्स आणि तत्काळ वा रद्दबातल ऑर्डर्स असे वर्गीकरण केले जाऊ शकते. 
ट्रेडिंग प्रणालीद्वारे ऑर्डर्सची अंमलबजावणी कशी केली जाते? 
एमसीएक्सच्या टीडब्ल्यूएसवर ‘बेस्ट बाय ऑर्डर’ (सवरेत्तम किंमत बोली असलेली) ही ‘बेस्ट सेल ऑर्डर’शी (सर्वात किमान किमतीला विक्रीला खुली झालेली) किंमत-वेळ प्राधान्याच्या तत्त्वावर जुळवली जाते. 
लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर यातील फरक काय? 
ज्या किमतीला खरेदी वा विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे, त्यापेक्षा अनुक्रमे कमी किंवा जास्त किंमत ठरवून देण्याची मुभा लिमिट ऑर्डरमुळे प्राप्त होते. दुसर्‍या बाजूला मार्केट ऑर्डर म्हणजे प्रत्यक्षात ऑर्डर दिली जात असताना बाजारात जी किंमत असते तीवरच समाधान मानणे होय. जर त्या विशिष्ट कमोडिटीत जर त्या समयी कोणता व्यवहारच झालेला नसेल, तर ट्रेडिंग प्रणालीत अंतिम व्यवहार झालेली किंमतच मार्केट ऑर्डर म्हणून ग्राह्य धरली जाते. 
स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे काय? 
नुकसान टाळले जावे यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर दिली जाते, जी मुळात कमोडिटीच्या वायदा किमतीतील प्रतिकूल हालचालींच्या पार्श्वभूमीवर अवलंबली जाते. या प्रकारची ऑर्डर ट्रेडिंग प्रणालीत प्रलंबित वा सुप्त ठेवली जाते आणि जोवर त्या विहित पातळीपर्यंत किंमत पोचत नाही, तोवर ऑर्डर लागू होत नाही. प्रचलित व्यवहार स्थितीतून अधिक नुकसान न होता हात मोकळे करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. 
डे ऑर्डर आणि गुड-टिल-डेट ऑर्डर यातील फरक काय? 
डे ऑर्डर्स या त्या विशिष्ट ट्रेडिंग डेपुरत्याच अवलंबल्या जातात. डे ऑर्डर ज्या दिवशी दिल्या जातात, त्या दिवशी व्यवहार बंद होण्याच्या वेळेपूर्वी अमलात न आल्यास आपोआप रद्दबातल ठरतात, तर गुड-टिल-डेट ऑर्डर या त्या ऑर्डरमध्ये दिल्या गेलेल्या दिवसापर्यंत आणि त्या विशिष्ट काँट्रॅक्टच्या अंतिम दिवशी व्यवहार बंद होईतोपर्यंत जेव्हा केव्हा निश्चित केलेली किंमत पातळी गाठली जाईल तेव्हापर्यंत अमलात येतात. 
काँट्रॅक्ट स्पेसिफिकेशन, करारविषयक तपशीलातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? 
हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यातून एक्स्चेंजवर व्यवहार होणार्‍या संबंधित कमोडिटीवर तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रतवारीविषयक निकष निश्चित केलेले असतात. कोणत्याही काँट्रॅक्ट किंवा करारात कमोडिटी फ्यूचर्सची मानके ही व्यवहारविषयक तपशील, काँट्रॅक्टचा कालावधी किंवा अंतिम मुदत, गुणवत्ता-प्रतवारीचे निकष, डिलिव्हरीची पद्धत आणि त्याचा तपशील आदी निकषांचा तपशील असतो. एक्स्चेंजवर होणार्‍या व्यवहारांच्या यशस्वी पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या शक्य त्या सर्व बाबींचा यात समावेश केला जातो. जसे ट्रेडिंग लॉट किती असावा, निश्चित केलेली किंमत, ऑर्डरचे आकारमान, टिक साइझ, डेली प्राइसचे लिमिट, माजिर्न आणि ओपन पोझिशन्स, डिलिव्हरीची सेंटर्स, सौदापूर्तीची किंमत व प्रक्रिया, टेंडर/डिलिव्हरी कालावधी, कर-प्रणाली, कायदेशीर बाबी वगैरे सर्वांचा यात समावेश होतो. 
prasadkerkar73@gmail.com

0 Response to "स्पॉट किंमत आणि वायदा किमतीचे संमीलन (कन्व्हर्जन्स) म्हणजे काय?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel