वैमानिक, सतारवादक, फर्डे वक्ते दिनेश त्रिवेदी

प्रसाद केरकर, मुंबई (10/03/12) PRATIMA
दि नेश त्रिवेदी यंदा रेल्वे अर्थसंकल्प कसा मांडतात, त्यात कोणत्या तरतुदी असतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उच्चश्ििक्षत, अनेक छंद जोपासणारा राजकारणी, फर्डा वक्ता अशी त्रिवेदी यांची ओळख देशाला आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणाचा असलेला स्वभाव यंदाच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीत जाणवेल असा अनेकांचा होरा आहे. ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेची आठ वर्षे भाडेवाढ केली नव्हती; परंतु यंदा ही परंपरा खंडित करून भाडेवाढ करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दिनेश त्रिवेदी हे पश्चिम बंगालमधील असले तरी त्यांचे मूळ हे गुजराती आहे. हिरालाल आणि ऊर्मिला त्रिवेदी यांच्यापोटी जन्मलेल्या दिनेश यांचा जन्म कराचीचा. फाळणीच्या वेळी ते भारतात आले सुरुवातीला काही काळ गुजरातमध्ये आणि नंतर दिल्लीत स्थिरावले. काही काळाने त्रिवेदी कुटुंब कोलकात्याला गेले आणि तेथेच त्यांनी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात त्यांचे वडील एच.सी.सी. या कंपनीत नोकरीला होते. हिमाचल प्रदेशातील बोर्डिंग स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर कोलकात्याच्या सेंट झेव्हियर महाविद्यालयातून त्यांनी कॉर्मस शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी वीस हजार रुपयांचे कर्ज काढले आणि टेक्सास विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्यासाठी ते रवाना झाले. त्यांना विमान चालवण्याची आवड असल्याने भारतात परतल्यावर भारतीय हवाई दलात दाखल झाले आणि विमान चालवण्यास शिकले; परंतु त्यांनी ही हवाई दलातील सेवा काही पुढे कायम ठेवली नाही. विमान चालवण्याबरोबरच त्यांना सतार वादनाची आवड होती. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होण्याचा विचार केला होता.
अमेरिकेत असताना त्यांनी काही काळ नोकरी केली होती. 1984 मध्ये त्यांनी विमान कंपनी सुरू करण्याचा विचार केला; परंतु यात त्यांना काही विशेष यश आले नाही. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी ग्राहक संरक्षण केंद्र सुरू केले. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आणि राजकारणातच यापुढील करिअर करण्याचे निश्चित केले. 1990 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि जनता दलात प्रवेश केला. 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाचे ते महासचिव झाले. 1990 ते 2008 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. अशा प्रकारे लोकसभेवर नियुक्त होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. त्या वेळी त्यांची आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. 2011 मध्ये त्यांनी अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती; परंतु राजीनामा काही दिला नाही.
ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या आणि त्रिवेदी यांना रेल्वेमंत्रिपदाची बढती मिळाली. रेल्वेमंत्री होताच त्यांनी रेल्वेचे भाडे निश्चित करण्यासाठी रेल्वे नियंत्रक स्थापन केले. ममतादीदींनी या प्रस्तावाला यापूर्वी विरोध केला होता. अशाप्रकारे त्यांनी मंत्रिपद स्वीकारताच पक्षाच्या विरोधात धोरण हाती घेतल्याने ममतादीदींची नाराजी ओढावून घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी रेल्वेला निधी उपलब्ध न करून दिल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातील एका सदस्यांनी खुद्द पंतप्रधानांवर टीका करणे ही गंभीर बाब होती. त्रिवेदी हे पक्षाच्या धोरणाच्या पलीकडे जाऊन रेल्वेची विकासकामे हाती घेतील, अशी चर्चा आहे. रेल्वे हे खाते राजकारणापासून दूर ठेवण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. आता ते खरोखरीच काही क्रांतिकारी पाऊल रेल्वे अर्थसंकल्पात उचलतात की, त्यांच्या घोषणा केवळ हवेतच विरणार हे समजेलच.
- prasadkerkar73@gmail.com

0 Response to "वैमानिक, सतारवादक, फर्डे वक्ते दिनेश त्रिवेदी"
टिप्पणी पोस्ट करा