-->
भागभांडाराची उत्तमरीत्या विभागणी केल्यास

भागभांडाराची उत्तमरीत्या विभागणी केल्यास

भागभांडाराची उत्तमरीत्या विभागणी केल्यास 
Published on 05 Mar-2012 BUSINESS PAGE
प्रसाद केरकर, मुंबई
भागभांडाराची उत्तमरीत्या विभागणी (डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ) केल्यास ही गुंतवणूक जोखीममुक्त असेल काय? 
उत्तम विभाजित भागभांडाराची गुंतवणूकही सर्व प्रकारच्या जोखमांपासून मुक्त असेलच असे म्हणता येणार नाही. कारण सिस्टिमॅटिक अर्थात नियोजनात्मक जोखमेचा धोका हा अटळ आणि तो सर्वांसाठी एकसारखाच असतो. 
हेजिंगचा सर्वात मुख्य फायदा कोणता? 
प्रत्यक्षात बाजारात असलेल्या कोणत्या जिनसाशी (कमोडिटी) निगडित असलेली किंमत जोखीम र्मयादित राखण्यात वा कमी करण्यात हेजिंग मुख्यत: उपयुक्त ठरते. कोणत्याही तयार उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती हेजिंगमुळे गोठवल्या जातात व स्थिर राहतात. त्यामुळे नफ्याची हमी कायम राहते. 
‘स्प्रेड ट्रेडिंग’ म्हणजे काय असते? 
स्प्रेड ट्रेडिंगमध्ये एकाच ऑर्डरमध्ये ट्रेडिंग मेंबरला एकाच कमोडिटीच्या दोन वेगवेगळ्या मुदतपूर्ती असलेल्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये प्रवेशाची मुभा मिळते. स्प्रेड कॉन्ट्रॅक्ट्समध्ये ट्रेडिंग करून त्याला दूरची मुदतपूर्ती असलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगळा आणि मुदतपूर्तीनजीक असलेल्या कॉन्ट्रॅक्टसाठी त्याच्या नेमका उलटा असा विरोधार्थी पवित्रा घेता येतो. एकाच कॉन्ट्रॅक्टद्वारे सरळसोट ट्रेडिंग पवित्रा घेण्यापेक्षा यातील जोखीम निश्चितच कमी आहे. 
विदेशी चलन जोखीम काय असते? 
जागतिक बाजारपेठेतील चलनांच्या विनीमय दरातील चढउतारांमुळे गुंतवणूक मालमत्तेला संभवणार्‍या जोखमेला विदेशी चलन जोखीम म्हटले जाते. 
कमोडिटी मार्केटच्या संदर्भात बेसिसचा अर्थ काय? 
बेसिसचा अर्थ विशिष्ट कमोडिटीची स्पॉट किंमत आणि त्याच कमोडिटीजच्या वायदा किमतीतील तफावत असा आहे. कमोडिटी मार्केटमधील विद्यमान किंमत म्हणजे स्पॉट किंमत आणि वायदा किंमत म्हणजे विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये (भविष्यात सुपूर्द करण्यासाठी) निश्चित केली गेलेली वायदा किंमत होय. 
‘बेसिस’ ऋण केव्हा आणि धन केव्हा असते? 
एखादा फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट्सच्या कालखंडात, कमोडिटीची स्पॉट किंमत ही वायदा किमतीपेक्षा कमी राहिल्यास बेसिस ऋण वा नकारात्मक ठरते. पण त्याउलट स्पॉट किंमत ही वायदा किमतीपेक्षा अधिक राहिल्यास बेसिस धन वा सकारात्मक होते. 
बेसिसचे सुदृढीकरण होत आहे असे आपण केव्हा म्हणू शकतो? 
जेव्हा कमोडिटीच्या कॅश अथवा स्पॉट किमतीपेक्षा तिची वायदा किंमत वाढतच राहते तेव्हा बेसिसचे सुदृढीकरण होत असल्याचे म्हटले जाते. 
बेसिस कमकुवत होत असल्याचे केव्हा म्हटले जाते? 
जेव्हा कमोडिटीची कॅश अथवा स्पॉट किंमत आणि वायदा किंमत यातील अंतर नगण्य वा अत्यल्प असते तेव्हा बेसिसची कक्षा अरुंद होत असल्याचे म्हटले जाते. 
बेसिसची कक्षा व्यापक होत असल्याचे केव्हा म्हटले जाते? 
जेव्हा कमोडिटीची कॅश अथवा स्पॉट किंमत आणि वायदा किंमत यातील अंतर खूपच अधिक असते तेव्हा बेसिसची कक्षा रुंदावत असल्याचे म्हटले जाते. 
जेव्हा बाजारात कमोडिटीजच्या पुरवठय़ात तुटवडा असतो तेव्हा ‘बेसिस’चे काय होते? 
पुरवठय़ाच्या टंचाईच्या काळात कमोडिटीची कॅश किंमत ही वायदा किमतीपेक्षा वाढतच जाते आणि बेसिस जोखीम धन बनत जाते. 
बाजारात कमोडिटीजच्या पुरवठय़ात तुटवडा सुधारतो आणि मागणी-पुरवठा स्थिती सामान्य होते तेव्हा ‘बेसिस’चे काय होते? 
मागणी-पुरवठय़ाची किंमत जशी सामान्य होते तसे कमोडिटीची कॅश/स्पॉट किंमत ही वायदा किमतीच्या बरोबरीने येऊ लागते आणि अर्थातच बेसिस जोखीम कमजोर बनते. 
कोणत्याही कमोडिटीच्या अवाजवी पुरवठय़ाच्या संदर्भात ‘बेसिस’ची स्थिती कशी असते? 
जेव्हा बाजारात कोणत्याही कमोडिटीचा पुरवठा खूपच वाढतो (उमद्या पिकामुळे, आयात वगैरे कारणामुळे) तेव्हा स्पॉट किमती या वायदा किमतीपेक्षा खाली गेल्याने बेसिस जोखीम कमजोर बनते. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "भागभांडाराची उत्तमरीत्या विभागणी केल्यास"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel