संपादकीय पान मंगळवार दि. ३ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
शास्त्रीय संगितातील एका पर्वाची अखेर
----------------------------------
जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी (८६) यांचे रविवारी मुंबईत किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एका पर्र्वाची अखेर झाली आहे, असे म्हणावे लागेल. धोंडूताई कुलकर्णी या कणखर व्यक्तिमत्वाच्या गायिका होत्या. केशरबाई केरकर, उस्ताद भुर्जी खॉं, लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतले. अखेरपर्यंत त्यांनी परंपरागत गायिकीची कास सोडली नाही. निधनाच्या आधी दोन महिन्यांपर्यंत त्या शिकवत होत्या. त्यांचे गाणे विद्वत्तापूर्ण आणि शुद्ध आकाराचे होते असे म्हटले जाई आणि ते खरेच होते. त्यांनी वेळोवेळी ते आपल्या गाण्यातून सिध्द करुन दाखविले आहे. कोल्हापूरमध्ये सन १९२७ मध्ये जन्मलेल्या धोंडूताई कुलकर्णी यांना गोड गळ्याची निसर्गदत्त देणगी लाभली होती. वयाच्या आठव्या वर्षी त्या आकाशवाणीवर पहिल्यांदा गायल्या होत्या, पण त्यांना शास्त्रीय संगीताचे वेड त्याहीआधी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच लागले होते. संगीत आराधना हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी खर्या अर्थाने आपले संगीतशिक्षण सुरू केले. पुढे दहा वर्षे त्यांनी भुर्जी खॉंसाहेब यांच्याकडे जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रशुद्ध गायकीचे धडे घेतले. लक्ष्मीबाई जाधव आणि नंतर सुरश्री केसरबाई केरकर यांच्याकडेही संगीत आराधना करून त्यांनी जयपूर घराण्याची शास्त्रशुद्ध गायकी आत्मसात केली. केसरबाईंचे शिष्यत्व स्वीकारलेल्या धोंडूताईंनी १९६२ ते ७१ या काळात त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. संगीत आराधना हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याची प्रतिज्ञा धोंडूताईंनी केली होती. आपल्याला केवळ संगितासाठीच वाहून घ्यायचे आहे असा निश्चय करुन त्यांनी विवाह देखील केला नाही. त्यांनी कधीही गाण्याचा बाजार मांडला नाही की ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा मोह धरला नाही. आकाशवाणीसह त्यांनी देशाच्या अनेक शहरात संगीताच्या मैफिली केल्या. वयाची ८० वर्षे ओलांडली असली तरीही त्यांनी संगीताचा रियाज नियमितपणे करीत. ज्ञानाची प्रक्रिया अखंडपणे सुरूच असते, त्याला कधी पूर्ण विराम देता येत नाही असे धोंडूताई सांगत. जयपूर-अत्रौली घराण्याची वैशिष्ट्ये असलेल्या ख्याल, भजन, गायकीच्या बंदिशी सादर करणे यात त्यांचा हातखंडा होता. गाण्यावर असलेली अढळ निष्ठा, प्रेम, अपार मेहनतीमुळे प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. आदर्श घालून देणारं व्यक्तिमत्त्व धोंडूताईंच्या गाण्यात लक्ष्मीबाई जाधव यांच्या गाण्याच्या स्पष्ट खुणा दिसत. तरी त्यांनी केसरबाई, भुर्जी खॉंसाहेब यांच्याकडून घेतलेल्या शिकवणुकीला आपल्या गाण्यातून वाव दिला. म्हणूनच अल्लादिया खॉंसाहेबांकडून आलेले तालाचे खंड धोंडुताईंनी आत्मसात केले होते. राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, यावर्षीचा चतुरंग संगीत सन्मान आदी अनेक मानाच्या पुरस्कारांवर धोंडूताईंनी आपले नाव कोरले होते. गायक आदित्य खानवे आणि ऋतुजा लाड आदी शिष्य त्यांची गायकीची परंपरा पुढे चालवत आहेत. शिस्तबद्ध गाणे धोंडूताई जयपूर घराण्याच्या मोठ्या गायिका होत्या. अत्यंत शुद्ध आणि शिस्तबद्ध त्यांची गायकी होती. त्यांच्या गायिकीच्या तुलनेत त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही हे महाराष्ट्राचे दुदैव म्हटले पाहिजे. आपल्या गाण्यातून त्यांनी खर्या अर्थाने जयपूर घराण्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. अशा प्रकारच्या गायिका पुढील काळात होणे नाही. तत्यांनीजो रियास करुन या क्षेत्रात नाव कमविले तसे कष्ट घेण्याची ताकद नवीन पिढीतील गायकांत नाही. त्यांच्या जाण्याने जयपूर घराण्याचा एका वारसाची अखेर झाली तर आहेच शिवाय शास्त्रीय संगितातील एका महान पर्वाची अखेर झाली आहे.
------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा