-->
केवळ दिखावाच!

केवळ दिखावाच!

गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
केवळ दिखावाच!
अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांचा बराच गाजावाजा झालेला दोन दिवसांचा दौरा अखेर संपला. या दौर्‍यातून देशाचा फायदा काय झाला असा जर कुणी प्रश्‍न विचारला तर उत्तर देणे कठीणच आहे. कारण या दौर्‍यात पंतप्रधान मोदी व राष्टाध्यक्ष ट्म्प यांना मिळालेली प्रसिध्दी व एकमेकांनी केलेली स्तुती या व्यतिरिक्त काहीच साध्य झाले नाही. देशाला त्या काडीमाञ फायदा झाला नाही. खरे म्हणजे ज्यावेळी एखाद्या महासत्तेचा प्रमुख आशिया खंडातील भारतासारख्या एका विकसनशील देशाला भेट देतो त्यावेळी उभय देशांमध्ये भरपूर करार-मदार, संशोधन विषयक सहकार्य, गुंतवणुकीचे प्रस्ताव, आयात-निर्यात वाढविण्यावर सहकार्य करार अपेक्षीत असतात. परंतु असे काहीच झाले नाही. ट्म्प यांनी कोणताही करार करणार नाही असे अगोदरच जाहीर केले होते. का तर निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणे. परंतु संरक्षण विषयक तीन अब्ज डॉलरचा करार माञ केला. अर्थातच हा करार म्हणजे अमेरिकेच्या शस्ञास्ञ कंपन्यांची भर करणारा आहे हे सांगावयास कुणी मोठ्या तज्याची गरज नाही. हा करार तीन अब्ज डॉलरचा असल्याने एकूण आता अमेरिकन कंपन्यांचे संरक्षण विषयक करार आता तब्बल 20 अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. अमेरिकन कंपन्यांच्या मालाची विक्री करण्यासाठीच हे ट्म्प महाशय भारतात आले होते की काय अशी शंका यावी. ट्म्प यांना या वर्षात निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. आता अमेरिकेने भारताला व्हिसा देताना हात आखडता घेतला असला तरीही सध्या असलेला मूळ भारतीय मोठ्या संख्येने आहे. यात गुजराथींची संख्या तर त्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे मोदींच्या निवडणूक प्रचाराचा जसा हाऊ डी मोदी म्हणून नारळ फोडला गेला तसा नमस्ते इंडिया म्हणत मोदींनी ट्म्प यांच्या प्रचाराचा नारळ गुजरातमध्ये फोडला. खरे तर ट्म्प त्यासाठीच भारत दौर्‍यावर आले होते. भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेला पूर्वाश्रमीचा मध्यमवर्ग व आता अमेरिकेत स्थायिक होऊन सुखवस्तू झालेल्या वर्गाला त्यांना आपल्याकडे खेचायचे आहे. अर्थात गेल्या निवडणुकीत यांची एकगठ्ठा मते ट्म्पच्या रिपब्लिकन पक्षाला मिळाली होतीच. ट्म्प यांचे राजकारण हे खरे तर (राज ठाकरे यांच्या धर्तीवर) मूळच्या अमेरिकनानांचे संरक्षण करणारे होते. त्यामुळे एक दोन पिढ्यांपासून स्थायिक झालेल्या भारतीय लोकांची त्यांना फारशी भीती वाटत नव्हती. माञ नव्याने भारतातून तेथे गेलेल्या तरुणांना ट्म्प यांच्या राजकारणांमुळे आपली हकालपट्टी होते की काय अशी भीती वाटत होती. परंतु हकालपट्टी झाली नसली तरी व्हीसा मिळणे कठीण झाले आहे. तसेच काही कंपन्यांनी आऊटसोर्स्ंगही थांबविले. आता मोदींची स्तुती करुन हा वर्ग खूष होईल असे ट्म्प यांना वाटते. त्यासाठीच त्यांनी नागरिकत्व कायद्यापासून सर्वच बाबींची मुक्तकंठाने स्तुती केली. भारतात येणारा प्रत्येक अमेरिकन राष्टाध्यक्ष पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांवर टीका करतो व भारताचा सॉफ्ट कॉर्नर मिळवितो. ट्म्प यांनी याहून काही वेगळे केले नाही. आज पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाला आहे, त्यांच्याकडे शस्ञास्ञ खरेदी करण्याची क्षमताच राहिलेली नाही. अशा स्थितीत भारताला आपण मजबूत करीत असल्याचे दाखवित ट्म्प यांनी भारताच्या गळ्यात तीन अब्ज डॉलरची शस्ञे घातली आहेत. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांच्या विरोधात दम देऊन भारतीयांच्या टाळ्या मिळविल्या. जर खरी ट्म्प यांच्यात हिमत असेल तर त्यांनी पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवावी तसेच वेळ पडल्यास पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे उध्दस्त करण्याचे धाडस दाखवावे. परंतु ते तसे करणार नाहीत. कारण ट्म्प यांचे व एकूणच अमेरिकेचे दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांना भारताला शस्ञसज्ज करुन आपपला व्यवसाय करायचा आहेच तसेच हा प्रदेश सतत अशांतही ठेवायचा आहे. कारण त्यात अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. मोदींनाही सध्या ट्म्पसारख्या नेत्याला भारतात आणून आपण किती जागतिक दर्जाचे नेते आहोत हे दाखविण्याची गरज आहे. मोदी सर्व धर्मियांसाठी चांगले काम करतात हे ट्म्प यांनी सर्टिफिकेट देणे सध्याच्या काळात मोदींच्याही फायद्याचे आहे. ट्म्प यांनी आपल्या दिल्ली दौर्‍यात जरा चौकशी केली असती तर तर नागरिकत्वाच्या प्रश्‍नावरुन दिल्ली किती धुमसते आहे ते त्यांना समजले असते. पण तसे करण्याचे धाडस ट्म्प करणार नाहीत. कारण त्यांचा या दौर्‍याचा उद्देशच वेगळा होता. अमेरिकेचे भारताशी व्यापारी संबंध हे शीत युध्द संपल्यावर फुलू लागले. त्यापूर्वी भारताचा सर्वात मोठा व्यापारी संबंधांचा मिञ हा त्यावेळचा सोव्हिएत युनियन होता. परंतु हा देशच जगाच्या नकाशावरुन फुसला गेल्यावर भारताला अमेरिकेशी दोस्ती करणे ही काळाची गरज होती. आय.टी. उद्योग देशात झपाट्याने वाढल्यावर अमेरिका भारताच्या अजून जवळ आला. आता तर भारतीय कंपन्या तेथे आपला चांगला जम बसवून अमेरिकनांना नोकर्‍या देत आहेत. त्यामुळे गेल्या तीन दशकात भारताचे चांगले व्यापारी व उद्योजकीय संबंध अमेरिकेशी प्रस्थापित झाले आहेत. परंतु त्या कंपन्यांना भेडसाविणारे जे प्रश्‍न आहेत, प्रामुख्याने व्हिसा देण्याचा प्रश्‍न ट्म्प दौर्‍यातून काही मार्गी लागलेला नाही. ट्म्प यांचा दौरा पर पडला असला तरी देशाचा विचार करता आपल्या खिशात काहीच पडले नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. केवळ उभय नेत्यांच्या प्रसिध्दीचा देखावाच झाला. त्यात मोदी-ट्म्पना शंभर टक्के गूण मिळाले यात काही शंका नाही. परंतु देशाचे हित काही साधले गेले  नाही हे दुर्दैवच.
--------------------------------------

0 Response to "केवळ दिखावाच!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel