-->
रेंगाळलेला मॉन्सून

रेंगाळलेला मॉन्सून

मंगळवार दि. 25 जून 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
रेंगाळलेला मॉन्सून
दहा जूनच्या आसपास नियमीत हजेरी लावणारा पाऊस यंदा जवळपास पंधरा दिवसांनी लांबला आहे. त्यामुळे चिंता वाटू लागणे स्वाभाविकच आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक आहे. त्याचवेळी कोकणातून सुरुवात होणारा पाऊस यावेळी केवळ रत्नागिरीलाच येऊन थांबला आहे. अजून पूर्ण कोकण पावसाने ओलेचिंब झालेले नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी देखील पावसाच्या आगमनाची वाट पहात आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात पाऊल संपूर्ण कोकणात हजेरी लावेल व आपले अस्तित्व दाखवेल अशी अपेक्षा आहे. रविवारपर्यंतचा विचार करता केवळ कोकणाच पावसाची यावेळी वाट पहावी लागत आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग मान्सूनने व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, नगर औरंगाबाद करीत नागपूरपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यात पाऊल आपले अस्तित्व दाखवून देईल असा हवानाम खात्याचा अंदाज आहे व तो खरा ठरावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. केरळात यावेळी आठवडाभर उशीरा मान्सून आला होता. त्यातच अरबी समुद्रात वायू हे चक्रिवादळ आल्यामुळे त्याचा परिणाम झाला व मोसमी पाऊल विलंबाने येणार हे सुचित झाले. चक्रिवादळामुळे वार्‍याचा वेग मंदावला त्याचबरोबर बाष्प ओढून नेन्याने पाऊस लांबला होता. परंतु एवढे दिवस पाऊस लांबेल असे वाटले नव्हते. 1972 सालानंतर ही पहीलीच वेल आहे की, कोकणात पाऊस लांबला आहे. कोकणात खरे तर पावसाचे पहिल्यांदा आगमन झाल्यावर लगेचच मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास सुरु होतो. आता मान्सूनची उत्तरेकडील वाटचाल आता जोरात सुरु झाली असून पश्‍चिम भागापेक्षा पूर्व भारतातील मान्सूनचा प्रगतीचा वेग चांगला आहे. शनिवारपर्यंत मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्‍चिम बंगाल, बिहार ही राज्ये व्यापली आहेत तर छत्तीसगढ, उत्तरप्रदेशाातील काही भागात पाऊस पोहोचला आहे. गेल्या 12 वर्षातील पावसाची ही सर्वात कमी वेगाची प्रगती आहे. त्यामुळे यावेळी सरकार, शेतकरी, शहरी लोक या सर्वांनाच चिंतेने घेरले आहे. परंतु यावेळी पावसाचे धीमेगतीने प्रगती आहे, हे नक्की. गेल्या चार दिवसात मात्र पावसाने दहा राज्ये आपल्या आवाक्याखाली आणली आहेत. बंगालच्या उपसागरातून 700 किमी अंतराचा प्रवास करीत मान्सून रविवारी वाराणसीत पोहोचला. येथेही हा पाऊस तब्बल दहा दवस उशीराने पोहोचला आहे. मुंबईत तर 10 जूनच्या आसपास पोहोचणारा पाऊस यावेळी अजून पोहोचला नाही, परिणामी पावसाचा तब्बल पंधरा दिवसांचा लेट मार्क लागला आहे. वाराणसीत पावसाने आपला पाऊल ठेवल्यामुळे आता येत्या काही दिवसात तो संपूर्ण उत्तरप्रदेश व्यापेल असा अंदाज आहे. जून महिन्यात पडलेला पावसाचा विचार करता सरासरीच्या सुमारे 44 टक्के कमी झाला आहे. मात्र हाच पाऊस पुढील महिन्याभरात आपली सर्व मागची सरासरी भरुन काढून सर्वांना धक्का देईल असा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरीही अनेक भागात तो सरासरी गाठेल असाही अंदाज आहे. देशाचा विचार करता पावसाची सरासरी कमी होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त झाला आहे. महाराष्ट्रासह जवळपास दहा राज्यात पावसाने आपले अस्तित्व दाखविल्यामुळे आता अनेक भागात दुष्काळी भागात दिलासा लाभला आहे. अर्थात हा दिलासा तात्पुरता आहे. त्याचबरोबर जी अनेक भागात पावसाच्या विलंबामुळे जी रोगराई निर्माण झाली आहे त्यालाही आळा बसू शकेल. येत्या दोन दिवसात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व दक्षिण गुजरातच्या भागात पाऊस आपले अस्तित्व दाखवेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाचे या भागात आगमन होईल असा अंदाज जो बांधला गेला आहे तो करा होतो का ते पहावे लागेल. मात्र अजूनही दिल्ली व त्या आजूबाजूंच्या राज्यात कधी पाऊस पोहोचेल हे आत्ता काही सांंगता येणार नाही अशी स्थिती आहे. यंदा पावसाला नेमका उशीर कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झालेले नाही. जून महिन्यातील पावसाची सरासरी तब्बल 44 टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु एवढी कमतरता पहिल्याच महिन्यात होईल असा अंदाज कुणीच बांधला नव्हता. यंदा अल् नियोचा प्रभाव असणार आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असेल असाही अंदाज हवामान खात्याचा आहे. यावेळी सरकारी हवामान खाते व हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी खासगी संस्था या दोघांनीही सरासरी पावसाचे प्रमाण कमी पाहिले असे म्हटले आहे. मात्र त्यांच्या प्रमाणाच्या आकड्यात एकमत नाही. हवामान खाते चांगला पाऊस पडेल असे म्हणते मात्र सरासरीपेक्षा कमी होईल असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी असेल हे आत्ताच दिसू लागले आहे. सध्या तरी अजून दोन दिवस कोकण व मुंबईकरांना पावसाचा इन्तजार करण्यावाचून काही पर्याय नाही.
--------------------------------------------------------

0 Response to "रेंगाळलेला मॉन्सून"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel