-->
कर्करोगाचे वाढते प्रमाण

कर्करोगाचे वाढते प्रमाण

सोमवार दि. 18 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कर्करोगाचे वाढते प्रमाण
गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णात झपाट्याने वाढ झाली आहे. ही स्थिती केवळ आपल्याच देशातील नाही तर जागतिक पातळीवरील आहे. मात्र आशिया खंडात हे प्रमाण जास्त आहे. कर्करोगाची लागण होऊन नव्याने तयार होणार्‍या रुग्णांपैकी निम्मे आशिया खंडातले असतात़. आशिया खंडात जगाची 60 टक्के लोकसंख्या राहते. तिथल्या कर्करुग्णांचे प्रमाण 50 टक्के आह़े. जगातील अवघे नऊ टक्के लोक युरोप खंडात राहतात़. तेथे रुग्णांचे प्रमाण 23.4 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 20.3 टक्के एवढे आह़े. अमेरिकेत जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 13.3 टक्के लोकसंख्या आहे आणि रुग्ण 20 टक्के तर मृत्यू 14.4 टक्के असे प्रमाण आहे. जगातील तीन लाख महिलांना गर्भाशयाच्या कर्करागामुळे मृत्यू होत़ो. तसेच कर्करोगाचे अन्य प्रकार लक्षावधींचा बळी घेतात. ही आकडेवारी आंगावर काटा आणणारी आहे. कर्करोग अनेक प्रकारचा असत़ो त्यापैकी सर्वाधिक प्रमाण फुफ्फुस, स्तन आणि घसा यांच्या कर्करोगाचे आह़े  हे कर्करोग आघाडीचे तीन प्रकारात मोडतात. एकूण कर्करोग बळींपैकी एक तृतीयांश या तीन प्रकारांमुळे होतात़. गेल्या वर्षी फुफ्फुस आणि स्त्रीयांच्या स्तनाच्या कर्करोगाचे नवे रुग्ण प्रत्येकी सुमारे 21 लाख आढळले आणि त्यांनी एकूण कर्करुग्णांपैकी 11.6 टक्के संख्या व्यापली होत़ी. त्यानंतर घशाच्या कर्करोगाचे नवे रुग्ण 18 लाख होते. हे तिस़र्‍या क्रमांकावर आणि 13 लाख प्रोस्ट्रेट कर्करोगाचे चौथ्या क्रमांकावर होत़े. पाचव्या क्रमांकाची व्याप्ती 10 लक्ष पोटाच्या कर्करोगांची होत़ी. पोटाच्या कर्करोगाची संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आणि स्त्रियांचे कमी होत़े. धुम्रपानामुळे हा रोग होतो तसेच अनेकदा प्रदूषणही त्याला कारणीभूत आहे. एकूण कर्करुग्णांपैकी या प्रकाराने ग्रासलेल्यांपैकी पुरुष 14.5 टक्के आणि महिला 8.4 टक्के आढळल्या. याच प्रकारच्या कर्करोगाने मृत्यू झालेले पुरुषही 22 टक्के होत़े. स्तनाचा रोग स्त्रियांमध्ये होतो आणि एकूण कर्करुग्ण महिलांपैकी 24.2 टक्के त्याने त्रस्त असतात, परंतु तो बरा होण्याचे प्रमाणही जास्त आह़े. पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात हा रोग आढळल्याल यात शंभर टक्के बरे होण्याची खात्री दिली जाते. तरीही कर्करोग ग्रस्त महिलांपैकी 15 टक्के बळी याच प्रकारातील असतात़. जगातील 185 पैकी 154 देशात महिलांमध्ये या प्रकारच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव सर्रास आढळला आहे. या पाठोपाठ रुग्ण स्त्राी, पुरुषांपैकी जास्त व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू पावतात़. मात्र कर्करोग्रस्त महिलांच्या मृत्यूचे यातील प्रमाण जास्त आह़े. भारतात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होत़ो. स्तनाचा कर्करोग झालेल्या भारतीय महिलांपैकी निम्म्या मृत्यूमुखी पडतात़. तंबाखूशी संबंधित विकारामुळे दररोज 2500 भारतीय मृत्यू पावतात़. 2018 मध्ये या मृतांची संख्या 3,17,928 एवढी वाढली होत़ी. भारतात 22.50 लाख लोक कर्करोगाचे रुग्ण आहेत़ दरवर्षी भारतात 11 लाख 57 हजार 294 व्यक्तींमध्ये कर्करोग आढळतो. 2018 साली 4 लाख 13 हजार 519 पुरुष आणि 3 लाख 71 हजार 302 स्त्रीया मिळून एकूण 7 लाख 84 हजार 821 भारतीयांचा कर्करोगाने मृत्यू होत़ो. 2018 या वर्षातील कर्करोगासंबंधी अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केल़ा. त्यानुसार, दरवर्षी 1 कोटी 81 लाख नवे कर्करुग्ण आढळतात आणि दरवर्षी 96 लाख लोक या विकाराने मृत्यूमुखी पडतात़. गेल्या काही वर्षात कर्करोगाचे प्रमाण झापाट्याने का वाढले याविषयी काही ठोस कारणे सांगता येत नाहीत. काही तज्ज्ञांच्या मते यापूर्वीही कर्करोग हा होताच, परंतु तो ओळखला जात नव्हता. त्यामुळे अनेकदा रुग्णाला कर्करोगाचे निदान न झाल्यामुळे अन्य कोणत्या तरी रोगाची लक्षणे दिसल्यामुळे त्यात मृत्यू झाल्याची नोंद असे. पर्यावरणवाद्यांच्या दाव्यानुसार, वाढते प्रदूषण, औद्योगिकीकरण यामुळे कर्करोग वाढला आहे. परंतु नेमके हेच कारण आहे असे ठामपणाने सांगता येत नाही. तंबाखू सेवनामुळे किंवा धुम्रपानामुळे कर्करोग होतो असे सांगितले जाते, मात्र तंबाखू सेवन न करणार्‍यांनाही कर्करोग झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. भाज्या, फळे यांच्या पिकांवर मारल्या जाणार्‍या किटकनाशकांमुळे कर्करोग होतो असेही बोलले जाते. त्यामुळे कर्करोग नेमका कशामुळे होतो हे ठामपणाने सांगितले जात नसले तरीही आपली बदलती जीवनशैली, औद्योगिकीकरण, व्यसनाधीनता हीच त्याची प्रमुख कारणे आहेत. पूर्वी ज्यावेळी दारिद्याचे प्रमाण जास्त होते त्यावेळी टी.बी. रोगाने लोक मरत असत. आता टी.बी. हा मध्यमवर्गीतही सापडतो, मात्र त्यावर हमखास बरी होणारी औषधे आहेत. आशिया, आफ्रिकेतील लोकांतील कर्करोग होण्याची कारणे दारिद्रयात दडली आहेत़. तर युरोप अमेरिकेत ती चंगळवादी जीवनशैली आणि अति औद्योगिकीकरणात दडली आहेत़. कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे हे खरेच आहे, त्याचबरोबर पूर्वी कर्करोग झाला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ असे समजले जाई, आता कर्करोगांतील बर्‍याच लोकांचे प्राण वाचू लागले आहेत. सध्या तरी कर्करोगाचे हे वाढते प्रमाण चिंतादायक आहे. भविष्यात ज्यावेळी यावर संशोधन होईल व टी.बी.प्रमाणे कोणत्याही प्रकारतील कर्करोगाचेही रुग्ण शंभर टक्के बरे होतील तो सुदीन समजावा.
---------------------------------------------------------------------

0 Response to "कर्करोगाचे वाढते प्रमाण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel