पर्यटकांची पसंती अलिबागला
मंगळवार दि. 26 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख
------------------------------------------------
पर्यटकांची पसंती अलिबागला
2017 सालाला निरोप द्यायला जेमतेम आठवडा आहे व सर्वत्र गुलाबी थंडीने शाल पांघरलेली असताना शनिवार, रविवार व सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी कोकणासह अलिबाग समुद्रकिनार्याला पसंती दिली आहेे. शनिवारपासून पर्यटकांची अलिबाग समुद्रकिनारी प्रचंड गर्दी झाली आहे.त्यातच अलिबाग महोत्सव आयोजित केला असल्याने त्यात दुधात साखड पडावी असा आयता योग पर्यटकांसाठी चालून आला आहे. सध्या पर्यटकांनी संपूर्ण कोकण गजबजले असताना पर्य्टक मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागला पसंती देत आहेत. त्यामुळे अलिबागचा संपूर्ण किनारा पर्यटकांनी गजबजून गेला होता. पर्यटक उंट, घोडा तसेच मोटार बाईकवर स्वार झाले तर काही पर्यटकांनी स्पीड बोटमधून समुद्र सफरीचा आनंद घेतला. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने राबविलेल्या विविध सोयीसुविधांमुळे पर्यटक बिनधास्तपणे समुद्रात पोहण्याचा आनंद घेत होते. डिसेंबर महिन्याचा शेवटचा शनिवार, रविवार तसेच नाताळनिमित्त सोमवारी शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. काही पर्यटक शुक्रवारीच अलिबागकडे निघाले. तर काही पर्यटक शनिवारी सकाळी अलिबागकडे आले. सकाळपासून पर्यटकांची गर्दी अलिबाग समुद्रकिनारी होऊ लागली. शनिवारीही पर्यटकांनी समुद्रकिनारा फुलून गेला होता. थंडीचे वातावरण असल्याने सर्वत्र गारवा जाणवत असल्याने काही पर्यटकांनी तिखट चमचमीत मसालेदार खाणे खाणे पसंतकेले. त्यामुळे मांसाहारी पदार्थांची मेजवानी खाण्याकडे अनेकांचा कल होता. पर्यटकांना अलिबाग समुद्रकिनारी बसण्यासाठी नगरपालिकेने चांगली सोय केल्याने पर्यटकांनी त्या ठिकाणी बसून समुद्राच्या लाटा, निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतला. अति उत्साहामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अलिबाग नगरपालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या जीव रक्षकांनीही पर्यटकांनी सर्तक राहण्याचे आवाहन केले. पर्यटकांना धोक्याचे चाहूल लागावी यासाठी किनार्यापासून काही अंतरावर खांब रोवून झेंडे लावण्यात आले होते. जेणेकरून होणारी दुर्घटना टाळण्यास मदत होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाळा संपला की पर्यटन उद्योग भरभराटीला येण्यास प्रारंभ होतो. त्यात नाताळ व थर्टीफर्स्टसाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक अलिबाग व एकूणच कोकणात येत असतात. परंतु, यावर्षी थर्टीफर्स्टच्या आधीच्या आठवड्यातच जोडून तीन दिवस सुट्टी आल्याने नागाव किनार्यावर तुफान गर्दी पर्यटकांनी केल्यामुळे हंगामाचा शेवट आनंददायी होण्याची सुचिन्ह दिसत आहेत. पर्यटनाचा हा हंगाम आतापर्यंत तसा कभी खुशी कभी गम असाच होता. मात्र वर्षाच्या शेवटी हंगामाने जोर धरला आणि पर्यटकांनी नागावमध्ये गर्दी केली. सलग तीन दिवस शासकीय कार्यालयांना व खाजगी शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणात हजेरी लावली. राज्यभरातील पर्यटकांची पसंती रायगडसह कोकणातील किनारपट्टी व पर्यटनस्थळाला असल्याने गेल्या दोन दिवसात हजारो गाड्यांच्या ताफ्यासह लाखो पर्यटक कोकणात दाखल झाल्याने मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हाऊसफुल्ल झाला होता. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत होत्या. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पेण-वडखळ येथे वाहतूक पोलीसांची चांगलीच दमछाक झाली. वाहतूक कोंडीत बेशिस्त वाहन चालकही भर घालत होते. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे अर्धवट राहीलेले काम तसेच काही ठिकाणी खराब असलेला रस्ता यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. पनवेल ते पेण मार्गापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्याचबरोबर वडखळ नाका हा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू असल्याने पेण ते वडखळ या मार्गावर गेले दोन दिवस वाहनांची मोठी वर्दळ निर्माण झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवस सलग सुट्या आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याची कल्पना जिल्हा प्रशासनाला असतानाही वाहतूक कोंडीच्या पूर्वनियोजनासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत गेली. यामध्ये रेतीचे डंपर, लोखंडी क्वॉईल नेणारे ट्रेलर, अवजड गाड्या सर्रासपणे महामार्गावर धावत असल्याने शनिवार, रविवार गेले दोन दिवस या अवजड गाड्या बंद केल्या असत्या, तर वाहतूक कोंडीचा भार काहीसा कमी झाला असता व पोलीस प्रशासनावरही ताण कमी पडला असता. मात्र, तसे न झाल्याने या अवजड वाहतुकीचाही मोठा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागल्याने कोकणात जाणार्या हजारो पर्यटकांच्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सध्याच्या या वाहतूक कोंडीच्या वातावरणात मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरण किती महत्वाचे आहे, हे वारंवार पटत होते. सरकारच्या दाव्यानुसार, येत्या वर्षात हे काम पूर्ण होईल, मात्र त्या गतीने कामाला वेग दिसत नाही. कोकणाच्या पर्यटनाच्या विकासात मुंबई-पुण्याशी कोकणाला जोडले जाणारे रस्ते हे चारपदरी असण्याची आवश्यकता आहे. पुण्याचा महामार्ग असला तरीही खोपोलीतून पेण मार्गे अलिबाग व कोकणात येण्यासाठीचा मार्ग हा चांगला होण्याची गरज आहे. पर्य्टनाच्या माध्यमातून कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कोकणात पर्यावरण बिघडविणे मोठे प्रकल्प आणण्यापेक्षा पर्यटनासाठी प्रयत्न केल्यास व चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास कोकण राज्याच्या तिजोरीत चांगली भर घालू शकते. त्यादृष्टीने सध्या हाती घेतलेले मुंबई-मांडवा रो-रो सेवा, न्हवा शेवा-शिवडी फ्लायओव्हर, अलिबाग-विरार महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गाचे दुपरीकरण हे प्रकल्प तातडीने मार्गी लागले पाहिजेत. यातून कोकणातील पर्यटन वाढेल व त्यातून रोजगार निर्मितीला हातभार लागेल.
-----------------------------------------------------------------

0 Response to "पर्यटकांची पसंती अलिबागला"
टिप्पणी पोस्ट करा