-->
रायगडातील धरणे तुडुंब

रायगडातील धरणे तुडुंब

शनिवार दि. 08 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
रायगडातील धरणे तुडुंब
कोकणात यांदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणारे हा हवामानखात्याचा अंदाज खरा ठरणार असे दिसत आहे. कारण रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 157 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची आणि लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची पाणी साठयात मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असणारी 13 धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3 हजार 142 मिलीमिटर पाऊस पडतो. जुन महिन्यात जिल्ह्यातील सरासरी पावसाचे प्रमाण हे 643 मिलीमिटर असते. यावर्षी मात्र जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 1014 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे, पाटबंधारे प्रकल्प यांच्यातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागची रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 13 धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. पाच धरणे 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. धरणांमध्ये 75.08 टक्के पाणी साठा आहे. रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घाटवड, कवळे, उन्हेरे, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील वरंध, खिडवाडी, कोथुर्डे, खैरे, खालापूर तालुक्यातील भिलवले, पनवेल तालुक्यातील मोरबे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. सध्या सर्व धारणांमध्ये मिळून 51.252 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. 75.08 टक्के पाणी साठा आहे. रायगड जिल्ह्यात  3142.64 मिमीच्या सरासरीने  50282.31 मिमी पाऊस दरवर्षी पडतो. यंदा 4 जुलपर्यंत 1014.16 मिमीच्या सरासरीने  एकूण 16228.1 पाऊस पडला आहे. सरासरीच्या 32.27 टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी 4 जुलैपर्यंत 1072.45 मिमीच्या सरासरीने 17159.20 मिमी पाऊस पडला होता. अजून पावसाचे तीन महिने शिल्लक आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसे झाल्यास रायगड जिल्ह्याला तरी यंदा पाण्याच्या दुर्भीक्षास तोंड द्यावे लागणार नाही असेच दिसते. तरी अजूनही मार्च महिन्यापासून रायगड जिल्ह्याच्या काही तालुक्यात पाण्याच्या टंचाईच्या झळा लागतात. त्यासाठी पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "रायगडातील धरणे तुडुंब"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel