-->
ट्रम्प-मोदी आणि भारत

ट्रम्प-मोदी आणि भारत

रविवार दि. 29 जानेवारी 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
ट्रम्प-मोदी आणि भारत
----------------------------------------
एन्ट्रो- गेले सहा-सात वर्षे अमेरिका मंदीच्या छायेत आहे व त्यातून बाहेर पडण्याचा ओबामा यांनी देखील प्रयत्न केला मात्र त्यांना पूर्णपणे यश आले नाही. यासाठी यावर उपाय म्हणजे अमेरिकेने म्हणजे अमेरिकन भांडवलदारांनी आपले हित पहिले जपून नंतर जगाचा विचार केला पाहिजे, हे सुत्र ट्रम्प यांनी मांडले. मंदीच्या छायेत होरपळलेल्या अमेरिकननांना हे म्हणणे पटले व ट्रम्प यांच्या विचारांना पाठिंबा मिळाला. मात्र एक बाब लक्षात घेेतली पाहिजे की, आज चीन वा जर्मनीला शत्रुस्थानी ठेवून अमेरिकेचा व्यवसाय वाढण्याची शक्यता नाही, उलट हे दोन देश अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आणू शकतात. अमेरिकी हातांना काम ही ट्रम्प यांची दुसरी घोषणाही सुलभीकरणाचा मामला आहे. अमेरिकेतील उद्योगधंद्यांनी आता डिजिटल क्रांतीच्या पुढची पायरी गाठली आहे. या उद्योगधंद्यांना अतिकुशल कामगारांची गरज आहे. अमेरिकेत गेली तीन-चार दशके लोक आळशी झाले आहेत. खरे तर गुणवत्तेला प्राधान्य देणे हे अमेरिकेचे वैशिष्ट्य आणि त्यामुळेच अमेरिका श्रीमंत झाली. गुणवत्तेच्या आधारावरच तेथे जगातून लोक आले व वसले. त्यांच्या श्रमातून, कष्टातून अमेरिका उभी राहिली. यातून अनेकांनी बौध्दीक संपत्तीच्या जोरावर अमेरिकेला जगाच्या एका उंचीवर नेले...
----------------------------------------
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या दोन दिवसात ज्या प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरुन संभाषण केले त्यात देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा समावेश होता. ट्रम्प हे अमेरिकेच्या पचनी पडणारे नसेल तरीही जे काही त्यांना वाटते ते स्पष्टपणे बोलणारे आहेत. त्यांना भारताचे पंतप्रधान जवळचे वाटले त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे. यातून मोदी व ओबांना यांनी उभय देशांतील संबंध ज्या एका उंचीवर नेले होते त्याला एक नवी भरारी मिळणार आहे हे स्पष्ट झाले आहे. आपल्या प्रचाराच्या धुराळ्यात ट्रम्प यांनी चीन, मेस्किको, जपान, सौदी अरेबिया यांच्यावर फार कडवट टीका केली होती. मात्र त्यांनी भारतावर टीका न करता भारतीय समुदायांचे कौतुक केले होते. अर्थात अमेरिकेत भारतिय मोठ्या संख्येने राहातात, त्यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी ही स्तुती केली असावी असे वाटत होते. मात्र आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका भारताविषयी कशी राहाते त्यावर बरीचशी गणिते अवलंबून राहाणार आहेत. त्यांनी भारतावर होणार्‍या अतिरेकी कारवायांचा निषेधही स्पष्ट शब्दात केला होता. ऑक्टोबर मध्ये आपल्या प्रचार सभेत ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारतीयांपुढे बोलताना आपण व्हाईट हाऊसमध्ये गेल्यास अमेरिका हा भारताचा निश्‍चितच चांगला मित्र राष्ट्र होईल अशी भूमिका घेईन असे आश्‍वासन दिले होते. आता ते भारताविषयी सकारात्मक भूमिका घेताना पाकिस्तानशी कशा प्रकारचे संबंध ठेवतात त्याला महत्व आहे. ट्रम्प यांनी आपले सहकारी निवडताना भारतापेक्षा पाकिस्तानाविषयी जास्त माहिती असलेले निवडले आहेत. तर चीनवर टीका करणार्‍यांची नियुक्ती व्यापार विषयी सल्लागारपदी केली आहे. तर चीनच्या राष्ट्रांध्यक्षांचे मित्र म्हणून ओळखल्या गेलेल्या व्यक्तीला चीनमध्ये राजदूत म्हणून पाठविले आहे. भारतीय वंशांच्या विविध व्यक्तींच्या नियुक्त्या तयंनी केल्या आहेत. त्यांच्या सल्लागारांमध्ये इंद्रा नियुगी व सीमा वर्मा यांचा समावेश आहे. अमेरिकेला इस्लामिक दहशतवादाचा मोठा धोका आहे हे ट्रम्प यांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर सर्व ख्रिश्‍चन जगताला हा धोका आहे, असे ते सांगतात. रशियाचे अध्यक्ष पुतीन यंच्याबरोबर त्यांची वैयक्तिक मैत्री जरुर आहे, मात्र या वैचारिक गाभ्यामुळे त्या मैत्रीला एक नवे कोंदण मिळाले आहे. त्यांच्या या भूमिकेचा भारताला निश्‍चितच फायदा होईल. मात्र त्यांनी अमेरिका फर्स्ट चा दिलेला नारा भारतातील अमेरिकेची गुंतवणूक मंदावणारी ठरणार किंवा नाही ते काळच ठरविल. आत्ताचा ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्टचा नारा हा त्यांच्या भल्यासाटी असला तरी अमेरिकन भांडवलदारांना तो परवडणारा नाही. तसेच ट्रम्प यांनी लोकप्रियता मिळवण्यासाठी स्वदेशीचे सुलभीकरण केले आहे व ते अमेरिकेच्याच अंगाशी येऊ शकते. 1930पर्यंत अमेरिकेने स्वत:ला जगापासून दूर ठेवले होते. दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिकीकरणाला चालना देण्याची आवश्यकता अमेरिकेच्या भांडवलदारांना वाटू लागली. गेली सत्तर वर्षे जगाची जी व्यवस्था लागलेली आहे त्यात अमेरिकेचा वाटा मोठा आहे. मग ते शीतयुध्दाचा काळ असो किंवा त्यानंतरचा सोव्हिएत युनियनच्या अस्तंगानंतरचा काळ असो. जागतिकीकरणामुळेच अमेरिका अतिश्रीमंत झाली. या जागतिकीकरणाचा अन्य अनेक देशांनाही फायदा झाला. आता मात्र ट्रम्प यांना जागतिकीकरण नकोसे वाटू लागले आहे. याबद्दलची त्यांची मते काही प्रगल्भ नाहीत. गेले सहा-सात वर्षे अमेरिका
मंदीच्या छायेत आहे व त्यातून बाहेर पडण्याचा ओबामा यांनी देखील प्रयत्न केला मात्र त्यांना पूर्णपणे यश आले नाही. यासाठी यावर उपाय म्हणजे अमेरिकेने म्हणजे अमेरिकन भांडवलदारांनी आपले हित पहिले जपून नंतर जगाचा विचार केला पाहिजे, हे सुत्र ट्रम्प यांनी मांडले. मंदीच्या छायेत होरपळलेल्या अमेरिकननांना हे म्हणणे पटले व ट्रम्प यांच्या विचारांना पाठिंबा मिळाला. मात्र एक बाब लक्षात घेेतली पाहिजे की, आज चीन वा जर्मनीला शत्रुस्थानी ठेवून अमेरिकेचा व्यवसाय वाढण्याची शक्यता नाही, उलट हे दोन देश अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आणू शकतात. अमेरिकी हातांना काम ही ट्रम्प यांची दुसरी घोषणाही सुलभीकरणाचा मामला आहे. अमेरिकेतील उद्योगधंद्यांनी आता डिजिटल क्रांतीच्या पुढची पायरी गाठली आहे. या उद्योगधंद्यांना अतिकुशल कामगारांची गरज आहे. अमेरिकेत गेली तीन-चार दशके लोक आळशी झाले आहेत. खरे तर गुणवत्तेला प्राधान्य देणे हे अमेरिकेचे वैशिष्ट्य आणि त्यामुळेच अमेरिका श्रीमंत झाली. गुणवत्तेच्या आधारावरच तेथे जगातून लोक आले व वसले. त्यांच्या श्रमातून, कष्टातून अमेरिका उभी राहिली. यातून अनेकांनी बौध्दीक संपत्तीच्या जोरावर अमेरिकेला जगाच्या एका उंचीवर नेले. अमेरिकन भांडवलदारांनी आपला विस्तार दुसर्‍या महायुद्दानंतर जगात केला आणि जग काबीज करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना बहुतांशी यश आले. मात्र गेल्या काही वर्षात अमेरिकन लोक ढिले पडू लागले. त्यांच्या सुस्ती आली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवे असलेले कुशल व बुद्धिमान मनुष्यबळ अमेरिकेत मिळू शकले नाही. त्यामुळे विदेशातील तंत्रज्ञ व उच्च शिक्षित तेथे आले व वसले, हे विसरता येणार नाही. तसेच अमेरिकेतील लोकांना नोकरी देणे हे तेथील कायद्यामुळे फार महाग पडते. कारण जगात अन्य देशातील कुशल मनुष्यबळ स्वस्तात उपलब्ध आहे. 2018पर्यंत अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला 10 लाख अभियंते लागणार आहेत. हे कुशल मनुष्यबळ ट्रम्प कोठून पैदा करणार? कारण आता उच्च शिक्षणात अमेरिकन फारच मागे पडले आहेत. त्यातूनही अमेरिकी हातांना काम दिले तर उत्पादने खूप महाग होतील व जगातील स्पर्धेत ती टिकणार नाहीत. म्हणजे फटका अमेरिकी उद्योगांनाच बसेल. त्यांच्या नफ्यावर परिणाम होतील व या कंपन्या जागतिक स्पर्धेत टिकाव धरु शकणार नाहीत. जागतिक अर्थकारणाची व राजकारणाची गुंतागुंत ट्रम्प यांना लक्षात आलेली नाही असे नाही, परंतु अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी याच प्रश्‍नावर भर देऊन मते मिळविली. ज्या प्रकारे आपल्याकडे नरेंद्र मोदींनी काळा पैसा देशात आणण्याच्या संदर्भात निवडणुकीच्या प्रचारात आश्‍वासने दिली होती तसेच अच्छे दिन आणण्याचा वादा केला होता तसेच काहीसे ट्रम्प यांचे झाले आहे.  आता मोदींना आपली आश्‍वासनांची पूर्तता करणे कटीण जाते आहे, ट्रम्प यांचे काय होते ते लवकरच समजू लागेल.
---------------------------------------------------------

0 Response to "ट्रम्प-मोदी आणि भारत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel