-->
कार्यकर्त्वृत्वाचा गौरव

कार्यकर्त्वृत्वाचा गौरव

संपादकीय पान शनिवार दि. 28 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
कार्यकर्त्वृत्वाचा गौरव
देशाच्या राजकीय व सामाजिक पटलावर गेली सहा दशकाहून जास्त काळ आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे शरद पवार व सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत अग्रभागी असलेले आप्पासाहेब धमार्र्धिकारी यांचा पद्म पुरस्काराने सरकारने केलेला गौरव हा त्यांच्या आजवरच्या कार्याला दिलेली योग्य पावतीच म्हणावी लागेल. शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदापासून ते संरक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी अनेक जबाबदारीचे पदे सांभाळली आहेत. त्यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याचा आज देशात गौरवाने उल्लेख होतो. त्यामुळे त्यांचा पद्मविभूषण देऊन केलेला सन्मान हा महाराष्ट्रासाठी मानाचा तुरा आहे. याकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहिले पाहिजे. शरद पवार हे निश्‍चितच राजकीय व्यक्ती आहेत व 24 तास राजकारण करणार्‍यांत त्यांचा समावेश होतो. परंतु त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून केले समाजकार्य ठसठसशीतपणे दिसते. त्याचबरोबर स्वच्छतादूत म्हणून संपूर्ण राज्यात ज्यांचा गवगवा आहे त्या आप्पासाहेबांचा सरकारने पद्मश्री देऊन सन्मान करणे हे देखील त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची सरकारने घेतलेली दखल आहे. त्यांचे पिताश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजप्रबोधनाची सुरु केलेली ही चळवळ आप्पासाहेबांनी आणखी खोलवर समाजापर्यंत पोहोचविली. गेली चार दशकाहून जास्त काळ त्यांचे कार्य अविरतपणाने सुरु आहे. मितभाषी असलेले आप्पासाहेब हे कधीही प्रसिध्दीच्या झोतात नसतात. आज त्यांच्या लाखो अनुनयांनी त्यांच्या कार्याची दिक्षा घेऊन आपल्यात बदल करवून घेतला आहे. समाजातून मद्यपान संपुष्टात यावे यासाठी त्यांची ही दुसरी पिढी आपले आयुष्य झटत आहे. त्यांच्या समाजप्रबधनातून आज लाखो लोकांना व्यसनांपासून मुक्ती लाभली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "कार्यकर्त्वृत्वाचा गौरव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel