-->
विराटला निरोप

विराटला निरोप

संपादकीय पान गुरुवार दि. २० ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विराटला निरोप
येत्या वर्षाच्या अखेरीस आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेला अखेरचा निरोप दिला जाणार आहे. गेली तब्बल ३० वर्षे सेवेत असणार्‍या विराटने आपले समुद्रावर अधिराज्य स्थापन केले होते. भारत सरकारने १९ एप्रिल १९८६ रोजी ब्रिटिश नौदलाकडून तिला पंधरा दशलक्ष पौंड रक्कम मोजून विकत घेतले. त्याआधीही २५ वर्षे ती ब्रिटिश नौदलाच्या सेवेत होती. अर्थात, त्यावेळी तिचे नाव हर्मिस होते. १९८२ मधील ब्रिटन आणि अर्जेंटिनामध्ये झालेल्या फॉकलंड युद्धात हर्मिसने मोठा लौकिक कमावला होता. त्यावेळी भारतीय नौदलाने जुनी युध्दनौका खरेदी केल्याबद्दल बरीच टिका झाली होती. मात्र विराटने आपले सामर्थ्य सिध्द केले आहे. विराटबाबतीत सांगायचे झाले तर नव्याने भारतीय युद्धनौकांच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या या युध्दनौकेने दुरुस्तिनंतर अक्षरश: कात टाकली. तिचे पहिले कमांडिग ऑफिसर कॅप्टन विनोद पसरिचा यांच्या नेतृत्वाखाली त्या युद्धनौकेची वेगवान दुरुस्ती आणि नूतनीकरण पार पडले. अल्पावधीच तिचे रुपडे पालटून गेले व विराटचा पर्नजन्म झाला. सर्वार्थाने नवीकोरी, तरुण, ताज्या दमाची, शक्तिमान अशी विराट युद्धनौका. विमानवाहू युद्धनौकेची अस्त्र म्हणजे तिच्याकडे असलेली महागडी, शक्तिमान आणि घातक अशी युद्धविमाने. विराटच्या ताफ्यातील संहारक अस्त्र होती ती म्हणजे, सी हॅरिअर  एमआरएस-५१ ही लढाऊ विमाने. या विमानाची सरळसोट आकाशगामी झेप डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. शस्त्रास्त्रांची ने-आण करणारे आणि अष्टपैलू कामगिरी बजावणारे सी किंग हेलिकॉप्टरांचा ताफा हे विराटचे आणखी एक वैशिष्ट्य होते. सर्वसाधारणपणे एक हजार टन वस्तुमान हलविण्याची जहाजाची क्षमता ही एका विमानाच्या बरोबरीची मानली जाते. विराटची क्षमता ही २८ हजार टन वस्तुमानाची आहे. त्यानुसार, विराटच्या ताफ्यात २८-३० लढाऊ विमाने कार्यरत असू शकतात. विराटच्या पाठोपाठ भारतीय नौदलाने अनेक प्रकारच्या युध्दनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या. तर आता तर आपण स्वत: युध्दनौका बांधण्यास सुरुवात केली आहे, परंतु विराटची शान व दरारा काही औरच होता. आपल्या कठीण काळात विराटने अनेकदा मोलाचा हातभार आपल्या नौसेनेला दिला आहे. आज त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
-----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "विराटला निरोप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel