-->
रेल्वेचे स्वतंत्र विद्यापीठ कशासाठी?

रेल्वेचे स्वतंत्र विद्यापीठ कशासाठी?

संपादकीय पान मंगळवार दि. २३ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रेल्वेचे स्वतंत्र विद्यापीठ कशासाठी? 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लवकरच रेल्वे विद्यापीठाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा आपल्या रत्नागिरी दौर्‍यात केली. अर्थात निवडणूकपूर्व प्रचारात नरेंद्र मोदी यांनी ज्या अनेक घोषणा केल्या होत्या त्यातील ही एक महत्वाची घोषणा होती. आता त्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी पावले पडत आहेत. रेल्वे विद्यापीठाची घोषणा कितीही आकर्षक वाटत असली तीरीही अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन करणे फारसे व्यवहार्य वाटत नाही. अशा प्रकारे रेल्वे विद्यापीठ स्थापन रोजगार निर्मितीला हातभार लावणार आहे. मात्र असे करण्यापेक्षा सध्या असलेल्या देशातील विद्यापीठातच रेल्वेचे एक केंद्र सुरु केल्यास त्याचा मोठा उपयोग होईल. कारण रेल्वे विद्यापीठ स्थापन करुन या सर्व अभ्यासक्रमाचे केंद्रीकरण या विद्यापीठातच होईल. त्यापेक्षा देशातील काही मोजक्या विद्यापीठात रेल्वेने रोजगार निर्मितीसाठी केंद्र सुरु केल्यास व त्याला रेल्वेने सक्रिय पाठबळ दिल्यास विद्यार्थ्याांना जास्त उपयोग होऊ शकतो. कारण विविध विद्यापीठात असे केंद्र सुरु केल्यास त्याचे विकेंद्रीकरण होईल व विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ ही सोय उपलब्ध होऊ शकेल. सध्या देशात विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिलेली देशात एकूण ७६१ विद्यापीठे आहेत. ही विद्यापीठे २९ राज्ये व तीन केंद्रशासीत प्रदेश यात विभागली गेली आहेत. देशातील सर्वाधिक विद्यापीठे ही राजस्थानात म्हणजे ७२ एवढ्या मोठ्या संख्यने आहेत. तर तामीळनाडूत सर्वाधिक अभिमत विद्यापीठे २७ एवढी आहेत. आपल्याकडे केंद्रीय पातळीवरील, राज्य पातळीवरील, अभिमत, खासगी अशा प्रकारची विद्यापीठे आहेत. आता नव्याने विदेशी विद्यापीठे येऊ घातली आहेत. अर्थात यासंबंधी सरकारने परवानगी देऊन तीन वर्षे लोटली असली तरीही एकही विद्यापीठाने भारतात आपले केंद्र सुरु करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याशिवाय आपल्याकडे १८ आय.आय.टी., ३२ इंडियन स्कूल ऑफ माईन्स, राज्याच्या वित्तसहाय्याने उभ्या राहिलेल्या १८ तांत्रिक संस्था आहेत. त्याशिवाय आपल्याकडे कृषी विद्यापीठे व कृषी विकास केंद्रे ही वेगळी आहेत. आपल्या शेजारच्या चीनचा विचार तेथे सुमारे २२०० महाविद्यालये व विद्यापीठे आहेत. अर्थात चीनशी तुलना करता आपल्याकडे फारच कमी संख्येने विद्यापीठे आहेत. तसेच खासगी विद्यापीठे आता कुठे आकार घेऊ लागली आहेत. तर विदेशी विद्यापीठे आता कुठे येण्याच्या मनस्थितीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कोलकाता व मुंबई विद्यापीठाची स्थापना ही २४ जानेवारी १८५७ साली करण्यात आली. मात्र एवढी जुनी विद्यापीठे असूनही त्यांचा समावेश जगातील आघाडीच्या शंभर विद्यापीठात नाही ही दुदैवाची बाब आहे. ही पार्श्‍वभूमी मुद्दाम देण्याचे कारण की, आपल्याकडे मोठ्या संख्येने विद्यापीठे आहेत, मात्र त्यांचा दर्ज्या कितपत आहे, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. यात आता रेल्वेच्या नवीन विद्यापीठाची भर पडणार आहे. जगात अशा प्रकारची रेल्वे असल्याचे कुठे एैकिवात नाही. मात्र तरीही आपण हे धाडस करीत आहोत. रेल्वे हे विद्यापीठ चांगल्यारितीने चालवू शकेल का? असा सवाल आहे.

0 Response to "रेल्वेचे स्वतंत्र विद्यापीठ कशासाठी? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel