-->
रातराणीस ब्रेक लागे!

रातराणीस ब्रेक लागे!

संपादकीय पान मंगळवार दि. २३ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रातराणीस ब्रेक लागे!
महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या कोकणातील रातराणी गाडयांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. एरवी रात्रीच्या वेळी कमी वाहतूक कोंडी आणि वेगवान वाहतूक यांमुळे भरभरून जाणार्‍या बसगाडयांमधील प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे. रात्री प्रवास करण्याऐवजी दिवसाच प्रवास करण्याला प्रवासी पसंती देत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. महाडच्या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसगाडया वाहून गेल्या होत्या. या गाडयांच्या सापडलेल्या सांगाडयांवरून आतमधील एकही प्रवासी वाचला असण्याची शाश्वती नाही. तसेच काही प्रवाशांचे मृतदेह अपघात स्थळापासून १०० किलोमीटर लांब आढळले होते. राजापूर आणि जयगड या दोन्ही ठिकाणांहून सुटलेल्या या एसटीच्या गाडयांमध्ये एकूण २९ प्रवासी असल्याचा अंदाज होता. रात्रीचा प्रवास प्रवाशांसाठी नेहमीच आरामदायक आणि वेगवान ठरला आहे. तसेच अनेकांना मुंबईत दिवसभर कामे करुन परत रात्री बसून दुसर्‍या दिवशी आपल्या गावी परतणे शक्य होत असते. मात्र सध्यातरी प्रवाशांमध्ये रातराणीबाबत मनात भीती बसली आहे. दापोली, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड आदी आगारांमधून रात्री निघणार्‍या गाडयांमधील प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे. याआधी या गाड्यांमधून सुमारे ५० ते ६० प्रवासी प्रत्येक बसमध्ये प्रवास करत होते. या आगारांमधील उत्पन्नात गेल्या १५ दिवसांमध्ये १५ टक्के घट झाली आहे. ही चिंतादायक बाब असली तरीही काही काळाने पुन्हा रातराणी फुल्ल होतील अशी अपेक्षा आहे. महाडच्या सावित्री नदीवरील घटना ही दुदैवी असून अशा घटना फारच अपवादात्मक स्थितीत घडत असतात. यात एस.टी.च्या कर्मचार्‍यांची काहीच चूक नाही. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थही नाही. अर्थात सध्या ही घटना ताजी अशल्यामुळे लोकांना भीती वाटणे स्वाभाविक आहे. एस.टी. असो की विमान अपघात हे अपवादात्मक स्थितीत होत असतात. गेल्या दीड वर्षापूर्वी मलेशियाहून जाणारे एक विमान गायब झाले होते ते अजूनही सापडलेले नाही. असे झाले तरीही विमान प्रवास काही लोकांचा कमी झालेला नाही, होणारही नाही. एस.टी.चा एकूण प्रवासाचा पल्ला पाहता खूपच सुरक्षित आहे. मात्र सध्या रातराणीस ब्रेक लागला आहे. तो हंगामी काळ ठरो हीच अपेक्षा.
------------------------------------------------------

0 Response to "रातराणीस ब्रेक लागे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel