महागाईत भर
संपादकीय पान शुक्रवार दि. ०३ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महागाईत भर
नुकतीच सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात घसघशीत वाढ केली आहे. सरकार म्हणेल की, जागतिक पातळीवर कच्चे तेल महाग झाल्याने या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारचे हे म्हणणे काही चुकीचे नाही. मात्र गेल्या दोन वर्षात जगात पेट्रोलियमच्या किंमती झपाट्याने उतरल्या होत्या त्यावेळी मात्र त्या गतीने पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती काही उतरल्या नव्हत्या, असे सरकारला विचारावेसे वाटते. गेल्या दोन वर्षात पेट्रोलियमच्या किंमतीेनी ३० डॉलर प्रति बॅरल असा नवा निचांक पाहिला होता. त्यापूर्वी या किंमती १३० डॉलरवरुन उतरत होत्या. प्रत्येक घसरणीला खरे तर सरकारने खनिज तेलांच्या किंमती उतरविल्या अशत्या तर या देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असता. परंतु मोदी सरकारने तसे काही केले नाही. त्यामुळे जगात खनिज तेल विक्रमी किंमतीवर घसरले असले तरीही त्याचा फायदा जनतेला काहीच झाला नाही. नरेंद्र मोदी सरकराने महागाई संपविण्याची केवळ घोषणाच केली. मात्र प्रत्यक्षात महागाईच वाढत गेली आहे. त्यातच आता सेवा करात झपाट्याने वाढ करण्यात आली आहे. सरकारने हा सेवा कर आता १५ टक्क्यांवर नेला आहे. त्याचबरोबर ०.५ टक्के कृषी कल्याण कर आणला आहे. हा कर आपल्याकडे आता नव्याने सुरु करण्यात आला आहे. या मार्गाने तिजोरीत वर्षाला पाच हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे. याचा अर्थ आता प्रवास, चित्रपट, हॉटेल, वीज, विवाह समारंभासाठी घेतल्या जाणार्या सेवा अशा सर्वच सेवा महाग झाल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १२.३६ टक्के असलेला सेवा कर आधी १४ टक्के केला, त्यात ०.५ टक्के स्वच्छ भारत सेसची भर पडली आणि आता तर तो १५ टक्के झाला आहे. याचा अर्थ सरकारी तिजोरी भरण्यासाठी सेवा करासारखा सोपा मार्ग सरकार निवडते आहे. अप्रत्यक्ष कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडणार आसली तरी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला सरकारने मारला आहे. यातून महागाई वाढतच जाणार आहे.
----------------------------------------------------------------------

0 Response to "महागाईत भर"
टिप्पणी पोस्ट करा