संशयाची सुई आता नेमकी कुठे?
संपादकीय पान शुक्रवार दि. ०३ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
संशयाची सुई आता नेमकी कुठे?
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्षे झाल्यावरही खुनी सापडत नाहीत म्हणजे खरे तर हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे त्याचबरोबर सरकारलाही ही बाब लाजीरवाणी आहे. दुसर्या अर्थाने सरकार या खुन्यांना पाठीशी घालीत आहे, असे म्हणावे लागेल. कारण आजवर ज्या ज्या तपास यंत्रणांनी या खूनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संशयाची सुई सनातन संस्थेकडे येऊन ़थांबली आहे. त्यानंतर कोणतीच संस्था खुन्याला पकडू शकलेली नाही. मात्र यातील ज्या फरारांना घोषीत केले आहे त्यांच्या संपर्कात आम्ही आहोत असे सनातनचे वकील पुनाळेकर हे सांगतात, अगदी पत्रकार परिषदेत सांगतात. जर हे फरार आरोपी सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत तर पोलिस त्यांना पकडण्यासाठी का मागे पुढे पाहत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून याचा अर्थ स्पष्ट आहे की, खुन्यांना सरकारी यंत्रणेचे भय वएाटत नाही. किंबहुना त्यांना सरकारचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे, हे उघडच आहे. डॉ. दाभोलकरांच्या कुटुंबियांनी ज्यावेळी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरवठा केला त्यावेळी न्यायव्यवस्थेने त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी पावले टाकली आहेत, ही एक चांगली बाब म्हटली पाहिजे. आता शेवटी मागच्या सुनावणीत तपास यंत्रणेला न्यायाधीशांनी धारेवर धरुन यासंबंधी ठोस तपास करा व गुन्हेगारांचा शोल लावा असे आदेश दिल्यावर ही यंत्रणा हालू लागली. शेवटी याचाच भाग म्हणून बुधवारी सनातनच्या पतनवेल, पुण्याच्या कार्यालयावर छापे टाकले. यातून नेमके पुरावे हाती काही आले का, ते जाहीर झालेले नसले तरी सी.बी.आय. न्यायालयात स्पष्टीकरण करेल. कारण आता हे तपासाचे प्रकरण न्यायालयाच्या दारी गेले आहे. आजवर पोलिसांपासून ते आजवर सी.बी.आय. या सर्वांनी जे तपास केले आहेत ते सर्व सनातनच्या दारात येऊन थांबले आहेत. केवळ डॉ. दाभोलकरच नव्हे तर कॉ. पानसरे, कलबुर्गी या सर्वांच्याच हत्या या एकाच मार्गाने झालेल्या आहेत व त्यामुळे त्यांचे मारेकरी हे देखील सारखेच असण्याची शक्यता जास्त आहे. या तिघांच्या हत्या या राजकीय आहेत व ते ज्या विचारांचे पाईक होते तो विचार संपविण्यासाठी झालेल्या या हत्या आहेत, हे आता पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्यांची ओळख पटल्याचा दावा आम आदमी पक्षाचे (आप) आशिष खेतान यांनी केला. डॉ. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था व त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागरण समितीनेच केली आहे, असा दावा खेतान यांनी ट्विटरवरून केला आहे. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी अद्याप काहीही तपास होऊ शकला नाही. पुणे पोलिसांना तपास करण्यात अपयश आल्याने सध्या हा तपास सीबीआयकडे वर्ग आहे. पनवेल येथील डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व पुण्यात सारंग अकोलकर यांच्या घरी सीबीआयने छापे मारले. हे दोघेही सनातन संस्थेचे साधक असल्याचे सांगितले जात आहे. खेतान हे काही तपास करणारे नाहीत. मात्र त्यांनी जे नाव फोडले आहेत त्यादृष्टीने तपास करुन हे खुनी सापडतील का त्याचा विचार सी.बी.आय. करु शकते. आता सनातनवर छापे टाकल्यामुळे काही तरी नवीन पुरावे हाती लागू शकतात. याचे नेमके काय झाले याकडे सार्या महाराष्ट्राचे लक्ष आहे हे नक्की.

0 Response to "संशयाची सुई आता नेमकी कुठे?"
टिप्पणी पोस्ट करा