-->
पावसाकडे डोळे

पावसाकडे डोळे

संपादकीय पान गुरुवार दि. ०२ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पावसाकडे डोळे
जलाशयातील पाण्याचे थंबही संपलेली अवस्था व दुष्काळाचा प्रचंड भार असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या ५ ते ६ दिवसांत रिमझिम पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, गोव्याच्या दिशेने मान्सून सरकतोय. त्यामुळे येत्या ७ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मकरंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात पावसाला अनुकूल बदल दिसून येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेले तापमान आणि हवेतील वाढलेले बाष्पाचे प्रमाण यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा कोकणात सरासरीपेक्षा १५ टक्के जास्त, तर विदर्भात ६ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात सरासरी पाऊस होईल, असा अंदाज सध्यातरी आहे. तसेच जूनमध्ये कमी पाऊस होईल, मात्र जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार आहे. सध्यातरी बळीराजाचे सर्व डोळे पावसाकडे लागले आहेत. गेल्या दोन वर्षात पावसाने पूर्णपणे दगा दिला होता. अल् नियोचा गेल्या दोन वर्षात प्रभाव वाढल्याने पाऊस कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. यंदा मात्र अल् नियोचा प्रभाव कमी झाला आहे असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. अर्थात यंदा गेल्या दोन महिन्यांपासूनच पाऊस चांगला पडणार आहे, असे भविष्य वर्तविले जात होते. यंदा हे भविष्य खरे ठरो, अशी अपेक्षा करुया. अन्यथा यंदा जर गेल्या वर्षीसारखा पाऊस पडला तर अतिशय वाईट दिवसांना सामोरे जावे लागेल. मात्र यंदा अशी स्थिती येणार नाही अशी अपेक्षा आपण करुया. कोकणात यंदा सरासरीपेक्षा १५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणाच्या दृष्टीने ही खबर चांगली असली तरीही ज्या मराठवाडा व विदर्भ या दुष्काळी भागात सरासरी एवढा पाऊस पडणार आहे ही बातमी सर्वात सुखकारक ठरावी. केरळात मान्सून दाखल झाल्याने आपण पहिला टप्पा तरी पार केला आहे. आता हा मान्सून गोव्याच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीवर हा पाऊस पोहोचायला आठवडा लागेल,असे दिसते. जुलै व ऑगस्ट महिन्यात यंदा मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे त्या काळात हवामान विभागाची खरो कसोटी लागणार आहे. कारण मुसळधार पावसाची आगावू सूचना देण्यात ते कितपत यशस्वी होतात त्यावर बरेचसे अवलंबून राहिल. सध्यातरी पावसाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत व पाऊस लवकरच पडावा ही इच्चा.
------------------------------------------------------------------------------  

0 Response to "पावसाकडे डोळे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel