-->
आता आपण जी.पी.आर.एस.मध्ये स्वयंपूर्ण

आता आपण जी.पी.आर.एस.मध्ये स्वयंपूर्ण

संपादकीय पान सोमवार दि. ०२ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता आपण जी.पी.आर.एस.मध्ये स्वयंपूर्ण
नुकत्याच सोडण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आपण आता जी.पी.आर.एस. यंत्रणेमध्ये संयंपूर्ण झालो आहोत. देशातील विज्ञान व तंत्रज्ञानातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरावा. उपग्रह प्रक्षेपणाच्या तंत्रज्ञानात आपण गेल्या दोन दशकात स्वयंपूर्ण झालोच होतो. परंतु आता आपण जी.पी.आर.एस. प्रणालीसाठी जे सात उपग्रह अवकाशात सोडणार आहोत त्यातील पहिला उपग्रह यशस्वीरित्या सोडल्याने या तंत्रज्ञानात यशस्वी झालो आहोत. याचा सर्वच भारतीयांना मनापासून अभिमान वाटेल. या उपग्रहांचे उपयुक्त आयुष्य सुमारे दहा वर्षांचे असल्याने इस्रोने बॅकअप म्हणून आणखी दोन स्थितीदर्शक उपग्रह तयार ठेवण्याचे नियोजन केले आहे. या प्रणालीत पृथ्वीभोवती ३६ हजार कि. मी. उंचीवर भ्रमण करणारे सात उपग्रह, भूभागावरील देखरेख आणि नियंत्रण करणारे नेटवर्क आणि लाभार्थीचा प्रत्येकी एक छोटा रिसिव्हर यांचा समावेश होतो. आजवर गेली कित्येक वर्षे अमेरिकेतर्फे जी.पी.,आर.एस. ही सेवा विनाशुल्क पुरविली जात होती. याचा उपयोग इतर देशांप्रमाणे भारतातील मोटारचालक, खलाशी, विमानचालक, व्यावसायिक कंपन्या व सर्वसामान्य नागरिक घेत आहेत. शिवाय व्यापार, विज्ञान, संशोधन, मोबाईल फोनद्वारे दळणवळण, सर्वेक्षण आणि नकाशे बनविणे ही नागरी क्षेत्रातील उपयोगांची उदाहरणे आहेत. सैन्याला शत्रू प्रदेशात स्वतःचे स्थान ओळखणे, शत्रूच्या लक्ष्यांचा अचूक मागोवा घेणे, क्षेपणास्त्रांना अचूक मार्गदर्शन इत्यादी महत्त्वाचे लष्करी फायदे या यंत्रणेमुळे मिळू शकतात. जगात अमेरिकेच्या जीपीएस सेवेप्रमाणे रशियाची ग्लोनास (ग्लोबल नॅव्हीगेशनल सॅटेलाइट सिस्टिम) ही जागतिक स्तराची प्रणाली आहे, तर चीन आणि जपान या देशांच्या प्रादेशिक पातळीवरच्या स्थितीदर्शक प्रणाली त्या देशातील लोकांसाठी उपलब्ध आहेत. युरोपची यासंबंधीची प्रणाली अजून अंमलात यायची आहे. मात्र त्याअगोदरच आपण आपली प्रणाली विकसीत केली आहे. अवकाशातील उपग्रहांच्या कक्षांची मांडणी अशा प्रकारे केलेली असते, की पृथ्वीवरील यंत्रणाव्याप्त प्रदेशाच्या कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही क्षणाला या प्रणालीतील चार उपग्रह दिसू शकतात. उपग्रहांचे स्वत:चे ठिकाण आणि अचूक वेळ ही माहिती आणि प्रकाशाचा वेग यांच्या योगे पृथ्वीवरील रिसिव्हर उपग्रहांपासूनचे स्वत:चे अंतर याची गणना करतो. त्या अंतरातल्या फरकाचा उपयोग करून त्याच्यामध्ये असलेल्या संगणकाच्या साह्याने स्वतःच्या स्थानाबद्दल अचूक माहिती आणि वेळ प्राप्त होते. जी.पी.आर.एस. जी जगातील सध्याची उपलब्ध असलेली या क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रणा समजली जाते. जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यातील रस्ता, गाव यातून शोधता येऊ शकते. या यंत्रणेचा जसा सर्व जनतेला उपयोग होतो तसेच लष्करालाही मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. केवळ उपग्रह उभारला म्हणजे कार्य संपले असे नव्हे तर त्यासाठी या यंत्रणेला अविरतपणे कार्यरत ठेवण्यासाठी भूमीवरचे जाळेही तयार करावे लागते. देशाच्या अवकाश कार्यक्रमाने हा उपग्रह आपल्याला आधुनिकतेच्या नव्या शिखरावर नेणारा आहे.

Related Posts

0 Response to "आता आपण जी.पी.आर.एस.मध्ये स्वयंपूर्ण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel