-->
म्युच्युअल फंड तेजीत

म्युच्युअल फंड तेजीत

संपादकीय पान शनिवार दि. २८ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
म्युच्युअल फंड तेजीत
गेले सहा महिने भारतीय शेअर बाजारात जरी मोठे चढउतार अनुभवण्यास मिळत असले, तरी गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाकडे ओढा झपाट्याने वाढत असून, एप्रिल २०१६च्या अखेरीस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने १४.२२ लाख कोटी रुपयांचा उच्चांक नोंदविला आहे. आजवरची म्युच्युअल फंडातील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंडात नियमीत गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन लाभ मिळू शकतो हे आता गुंतवणूकदारांना पटले आहे. त्यामुळेच या गुंतवणउकी वाढल्या आहेत. एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांच्या इक्विटी आणि डेट अशा दोन प्रकारांत तब्बल १ लाख ७० हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे. हा देखील गेल्या दशकभरातील उच्चांकच ठरला आहे. सोन्याचे दर गेल्या पाच वर्षात घसरते असल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून गुंतवणूकदारांची पसंती असलेल्या गोल्ड ईटीएफ योजनेला मात्र गळती लागली आहे. मार्च महिन्यात केंद्र सरकारने फिक्स्ड इन्कम देणार्‍या विविध योजनांतील व्याजदरात कपात केली. त्यामुळे नाराज झालेल्या अनेक लोकांनी म्युच्युअल फंडाला पसंती दिल्याचे दिसते. या ग्राहकांनी पसंती ही प्रामुख्याने मर्यादित काळात उत्तम परतावा देणार्‍या योजनांना दिल्याचे दिसते. तर याचसोबत सध्या बाजारात पडझड सुरू असल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण होतानाच अनेक उत्तम कंपन्यांचे समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध झाले आहेत. याचा दीर्घकालीन फायदा घेण्याच्या दृष्टीने अनेक लोकांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटी योजनांत सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या लिक्वीड, डेट, इक्विटी अशा विविध घटकांनी सरासरी १२ ते १८ टक्क्यांच्या दरम्यान परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या ग्राहकसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांत केवळ मेट्रो शहरांतील ग्राहकांचीच संख्या अधिक नाही, तर आता यामध्ये द्वितीय श्रेणी व नागरी तसेच ग्रामीण भागांतील गुंतवणूकदारही झपाट्याने सहभागी होताना दिसत आहेत. बँकांच्या व्याजाचे दर घसरणीला लागल्यामुळे लोकांनी म्युच्युअल फंडांचा पर्याय स्वीकारुन चांगाला परतावा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील बँकींग व्यवसायातील ठेवी यामुळे अजूनतरी कमी झालेल्या नसल्या तरी भविष्यात हा धोका आहेच.
----------------------------------------------------

0 Response to "म्युच्युअल फंड तेजीत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel