-->
वाढत्या आत्महत्या

वाढत्या आत्महत्या

संपादकीय पान मंगळवार दि. १२ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --

--------------------------------------------
वाढत्या आत्महत्या
प्रत्युषा बॅनर्जी या अभिनेत्रीने केलेल्या आत्महत्येनंतर सर्वच समाजमन ढवळून निघाले आहे. अर्थात ही काही अलिकडच्या काळातील पहिलीच आत्महत्या नव्हे. पंरतु अशा प्रकारे आत्महत्या करण्याकडे प्रामुख्याने तरुणांचा कल वाढल्याने एक प्रकारची चींता व्यक्त होणे स्वाभाविक आहे. माणसास ज्यावेळी जगणे मुष्कील होते, आता आयुष्य कसे जागायचे, सर्वच पातळ्यांवर अंधार दाटतो त्यावेळी माणूस आत्महत्येच्या वाटेने जातो. आत्महत्या ही आयुष्यात संघर्ष करुन लढण्याएवजी त्यातून काढलेला पळ असतो असे आपण कितीही म्हटले तरी ज्याच्यापुढे अनेक प्रश्न उभे असतात त्याला आयुष्य संपविण्याशिवाय कोणताही मार्ग नाही असेच वाटते आणि तो आयुष्य संपवितो. मानसशास्त्रज्ञांच्या  सांगण्यानुसार, गेल्या काही वर्षात १५ ते ३५ या वयोगटातील आत्महत्या वाढल्या आहेत. खरे तर हेच वय संघर्षाचे असते आणि एखादा कोणता पराभव झाल्यावर त्यातून हरुन जाऊन हे तरुण आत्महत्येकडे वळतात. आत्महत्या रोखण्यासाठी काही शहरातून हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. याचा एक चांगला परिणाम दिसून आला आहे. जर एखाद्या तरुणाने नैराश्येत येऊन आत्महत्या करण्याचा विचार केला व त्याअगोदर त्याने या हेल्पलाईनशी संपर्क साधला तर त्याचे प्राण वाचतात असे अनेकदा आढळले आहे. सध्याच्या काळात कौटुंबिक समस्या, त्यातून निर्माण झालेले तणाव, यश-अपयश, घटस्फोट यातून होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या काही वर्षात घटस्फोटाचे प्रमाण ३० टक्के एवढे झाले आहे आणि भविष्यात ही एक मोठी सामाजिक समस्या होणार आहे. घटस्फोट घेताना वा घेतल्यानंतर ज्या परिणामांना तोंड घ्यावे लागते त्याची सक्षमता सध्याच्या तरुणांमध्ये नाही. त्यामुळेच हे तरुण आत्महत्या करतात. पूर्वी आपल्याकडे एकत्रीत कुटुंब पध्दती होती. त्यामुळे घरात एखाद्या प्रश्नी चर्चा व्हायची आता तशी चर्चा करण्याचा प्रश्न तयार होत नाही. आता तरुण सोशल मिडियाला एवढे बांधलेले असतात की त्यांना एखाद्या प्रश्नावर चर्चा करायला मित्र, नातेवाईक, किंवा एखादा जवळचा माणूस नसतो. त्यांचे सगळेच जीवन आता ऑनलाईन झालेले असते. यातूनही अनेक प्रश्न निर्माण होतात. जर एखाघ्याने आपली समस्या सांगितली तर त्याचे मन मोकळे होते, त्या चर्चेतून समस्या सुटण्यास वाव निर्माण होतो. यातून अनेकांचे जीव वाचले आहेत. जपानमध्ये पूर्वी जगात सर्वाधिक आत्महत्या व्ह्यायच्या. आता आपल्याकडे हा प्रश्न भेडसावू लागला आहे. अन्यथा आपल्याकडे जगातील सर्वाधिक आत्महत्या होण्याचा धोका आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "वाढत्या आत्महत्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel