-->
राम नामाचा पुन्हा जप

राम नामाचा पुन्हा जप

संपादकीय पान गुरुवार दि. २१ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राम नामाचा पुन्हा जप
सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा राम नामाचा जप सुरु केला आहे. अर्थातच येत्या वर्षात उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रामाची व राम मंदिराची आठवण झाली आहे. बरोबर २५ वर्षापूर्वी भाजपाने रामाच्या नावाने राजकारण सुरु केले आणि त्यांना त्यात कधी यश आले. परंतु आता जनता त्यांच्या या राजकारणास समजून चुकली असल्याने पुन्हा एकदा रामा नामाचा जप त्यांच्यासाठी आगामी निवडणुकीत फारसा काही फायदेशीर ठरेल असे दिसत नाही. प्रभू रामचंद्र या नावाची मोहिनी देशातील बहुसंख्य लोकांना आहे, पण राजकारणाकरिता राम किती वापरायचा, याच्या मर्यादा भाजपाने पाळल्या नाहीत आणि त्यामुळे अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या भावनात्मक मुद्याभोवती राजकारण गुंफत ठेवून ३०-४० वर्षे एकच विषय उगाळला गेला. त्यातूनच बाबरी मशिद पाडण्यात आली. गेल्या २५ वर्षात त्या घटनेनंतर दोन समाजातील फाटलेली मने अजून सांधलेली नाहीत. आता तर भाजपाला केंद्रात सत्ता एकहाती मिळाल्याने त्यांना हिंदुराष्ट्राची स्वप्ने पडू लागली आहेत. उत्तरप्रदेशसारखे ८५ खासदार असलेले मोठे राज्य आपल्या ताब्यात आले तर देशातील एक गठ्ठा मतांची एक खाण आपल्या हातात येते, हे राजकारण भाजपाला ठावूक आहे. त्यामुळेच त्यांनी रामनामाचा जप करण्यास आतापासून प्रारंभ केला आहे. सुब्रम्हण्यमस्वामी यांना आता त्यांनी या कामी म्होरक्या बनविले आहे. त्यांच्या जोडीला भाजपाचे साधू असलेले काही खासदार स्वामींची री ओढतच असतात. मात्र रामाचे हे चलनी नाणे भाजपाचे एकदाच चालले. २५ वर्षे त्यामुळेच भाजपाची सत्ता उत्तरप्रदेशात नाही. कल्याणसिंह हे बाबरी मशिद पाडली त्यावेळी मुख्यमंत्री होते व नंतर त्यांनी पक्ष सोडला व आता पुन्हा माघारी पक्षात आले आहेत. गेल्या काही वर्षात मुलायमसिंग यादव-अखिलेश यादव व मायावती यांची अलटून पालटून ,त्ता आली आहे. त्यामुळे भाजपावरचा विश्‍वास जनतेचा नाही. गेल्या वेळी मोदी लाटेत त्यांना भऱघोस यश मिळाले हे वास्तव असले तरीही त्यानंतर झालेल्या निवडणुकीत चक्क पंतप्रदांनाच्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकात भाजपाला अपयश आसे आहे. अशा स्थितीत भाजपाला यश मिऴणे कठीणच आहे. सध्याचे वर्षही झटकन संपून जाईल आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवून निवडून गेले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडणार आहे. बिहारमध्येही तशीच जबाबदारी होती. परंतु त्यात मोदी यांचे नाक आपटले. अर्थात यावेळी नरेंद्र मोदी कोणतीही संधी सोडणार नाहीत. समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करण्यापासून ते राम नामाचा जप अशा सर्व बाबी करुन जीवाची बाजी मोदी लावणार आहेत. त्याचीच सुरुवातच म्हणून त्यांनी स्वामी यांनी राम मंदिर उभारणीबाबत बोलते केले आहे. वाजपेयींची सहा वर्षे आणि मोदींचे दीड वर्ष, या काळात भाजपाला मंदिर बांधता आले नाही. त्यामुळे खरे तर त्यांना मंदीर बांधायचे नाही, फक्त त्या नावावर मते मागायची. आता तर त्यांनी गावागावात मंदिर बांधायची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांना किमान सात वर्षे पाहिजे आहेत. उत्तरप्रदेशात प्रत्येक गावात मंदिर बांधण्यापेक्षा एक चांगली शाळा व आरोग्य केंद्र उबारल्यास तेथील जनता खर्‍या अर्थाने भाजपाला दुवा देईल. परंतु अशा व्यवहारातल्या बाबी न करता लोकांना मंदिराच्या नावावर झुलवत ठेवायचा धंदा भाजपाने सुरु केला आहे. यावेळी उत्तरप्रेदशातील जनता केवळ राम मंदिराच्या प्रश्‍नावर मते देणार नाही तर लोकसभा निवडणुकीपूर्वी जी मोठी-मोठी आश्‍वासने भाजपाने व मोदींनी दिली होती त्याचे काय झाले, याबाबत जाब विचारणार आहेत. भ्रष्टाचार मुक्ती, काळा पैसा देशी आणणार, स्वस्ताई या मुद्यावर नरेंद्र मोदींनी निवडणुकीत मोठे रण माजविले होते. या सर्व प्रश्‍नांची त्यांच्याकडे चुचकीसरशी उत्तरे आहेत असे वातावरण त्यावेळी तयार झाले होते. अशा स्थितीत या सरकारने सत्तेत आल्यावर फारसे काही विशेष करुन दाखविलेले नाही. जनतेचे प्रश्‍न तसेच आहेत. त्यामुळे त्याचा जाब जसा बिहारच्या जनतेने विचारला तसाच जाब आता पुढील वर्षी उत्तरप्रदेशातील जनता विचारणार आहे. म्हणून या सर्व प्रश्‍नांचा जनतेला विसर व्हावा यासाठी राम नामाचा जप भाजपाने सुरु केला आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जनता आता दुधखुळी राहिलेली नाही.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "राम नामाचा पुन्हा जप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel